जन्मभूमीपासून दूर, मातृभूपासून वंचित

जन्मभूमीपासून दूर,मातृभूपासून वंचित,
लहान मुलासारखाच मी, तिच्यासाठी सदैव सद्गदित,---!!!

उठे स्मृतींचे मोहळ,
स्मरणांच्या माशा डंसत,
भारतीय म्हणून मी,----
झुरतो तिच्यासाठी अविरत,---!!!

थांबे ना कुणासाठी काळ ,
मागेमागे धावे मन,
आलो जेव्हा परदेशात,
उदास होतो आत उरांत,---!!!!

खडी करण्या कारकीर्द,
मनात होती खूप उमेद,
आईपासून तुटले मूल ,
सारखी जिवा वाटत खंत,--!!!

नीतिमंत तो भारतीय ,
असे नाव काढाया सज्ज, संस्कारांचा असे प्रश्न,
संस्कृतीचा पाईक अत्यंत,--!!!

वाटे मज अभिमान,
एक भारतीय म्हणून,
चांगले तेवढेच घेत ,
भारतीय मी कर्तृत्ववान,--!!!

कवटाळीत उराशी स्वप्न,
एक दिवस तिथे येईन,
करत आपल्या जनांचा उद्धार,
देशां, माझ्या समृद्ध करेन,--!!!

© हिमगौरी कर्वे.



जन्मभूमीपासून दूर,मातृभूपासून वंचित,
लहान मुलासारखाच मी, तिच्यासाठी सदैव सद्गदित,—!!!

उठे स्मृतींचे मोहळ,
स्मरणांच्या माशा डंसत,
भारतीय म्हणून मी,—-
झुरतो तिच्यासाठी अविरत,—!!!

थांबे ना कुणासाठी काळ ,
मागेमागे धावे मन,
आलो जेव्हा परदेशात,
उदास होतो आत उरांत,—!!!!

खडी करण्या कारकीर्द,
मनात होती खूप उमेद,
आईपासून तुटले मूल ,
सारखी जिवा वाटत खंत,–!!!

नीतिमंत तो भारतीय ,
असे नाव काढाया सज्ज, संस्कारांचा असे प्रश्न,
संस्कृतीचा पाईक अत्यंत,–!!!

वाटे मज अभिमान,
एक भारतीय म्हणून,
चांगले तेवढेच घेत ,
भारतीय मी कर्तृत्ववान,–!!!

कवटाळीत उराशी स्वप्न,
एक दिवस तिथे येईन,
करत आपल्या जनांचा उद्धार,
देशां, माझ्या समृद्ध करेन,–!!!

© हिमगौरी कर्वे.

Author