जादूगार तूं देवा

जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार

आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार ।।धृ।।

ढग काळे काळे

जमवितोस सगळे

गर्जती वादळे

कडाडूनी विजा, पर्जन्य होई भयंकर ।।१।।

जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार

आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार

तळपते ऊन

दग्ध होई जीवन

जाई वाळून

तेज वाढूनी सूर्याचे, दाह करी फार ।।२।।

जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार

आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार

कड्याक्याची थंडी

भरुनी हुडहुडी

देहाला सिकूडी

गारठूनी जाती, ज्याना नसे घर ।।३।।

जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार

आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार

सुख तुंची देतो

दुःख तूंची देतो

लक्ष्य तूं वेधतो

चमत्काराविणा कसे, आस्तित्व भासणार ।।४।।

जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार

आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०



जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार

आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार ।।धृ।।

ढग काळे काळे

जमवितोस सगळे

गर्जती वादळे

कडाडूनी विजा, पर्जन्य होई भयंकर ।।१।।

जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार

आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार

तळपते ऊन

दग्ध होई जीवन

जाई वाळून

तेज वाढूनी सूर्याचे, दाह करी फार ।।२।।

जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार

आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार

कड्याक्याची थंडी

भरुनी हुडहुडी

देहाला सिकूडी

गारठूनी जाती, ज्याना नसे घर ।।३।।

जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार

आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार

सुख तुंची देतो

दुःख तूंची देतो

लक्ष्य तूं वेधतो

चमत्काराविणा कसे, आस्तित्व भासणार ।।४।।

जादूगार तूं देवा, दाखवी चमत्कार

आठवण येण्या तुझी, करितो हाः हाः कार

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29638 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →