जागतिक गुलाबजाम दिवस

मुघल बादशहा शहाजहानच्या दरबारी असलेल्या एका शाही आचाऱ्याने पारशी आणि तुर्की मिष्ठानांच्या आधारावर काही स्थानिक हलवाईंच्या मदतीने गुलाबजामची निर्मिती केली होती.



भारतीय पक्वानात गुलाबजामचे स्थान हे मोठे आहे. इतिहासात गुलाबजाम संदर्भातील अनेक रंजक तथ्यांचे वर्णन करण्यात आले आहे. गुलाबजामच्या उगमाची कथा देखील इतकीच रंजक आहे. मुघल बादशहा शहाजहानच्या दरबारी असलेल्या एका शाही आचाऱ्याने पारशी आणि तुर्की मिष्ठानांच्या आधारावर काही स्थानिक हलवाईंच्या मदतीने गुलाबजामची निर्मिती केली होती.

पर्शियन बमियाह आणि तुर्कीश तुलांबा हे दोन गोड पदार्थ देखील बहुतांश गुलाबजामशी साधर्म्य साधणारे आहेत. ते पदार्थ देखील मऊ असतात आणि त्यांना देखील साखरेच्या पाकाच्या माध्यमातून गोडवा प्रदान करण्यात येतो. फक्त गुलाब जाम हा थंड असेल तर वाढला जातो आणि ते गरमा गरम वाढले जातात, हाच काय तो मूळ फरक आहे. ह्या परदेशी पदार्थांची प्रेरणा घेऊनच मुघल आचाऱ्यांकडून गुलाबजामचा आविष्कार केला गेला होता.

गुलाबजामचा परिवारात एक अजून प्रकार आहे, जो भारतातील बहुतांश लोकांचा लाडका आहे. तो म्हणजे काला जाम अथवा काला जामुन. काळ्या आणि जांभळ्या रंगाचा हा गुलाबजाम नेहमीपेक्षा जास्त गोड असतो आणि अधिक तापमानावर तयार केला जातो. भारताच्या बहुतांश भागात हा काला जामुन सहज उपलब्ध होतो.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author box (non-admin, WP author exists)
लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →