होळीत जाळा दुष्ट भाव

एकत्र येऊं सारेजण
विसरुन जाऊ भेदभाव

जाळून टाकू होळीमध्यें
दुष्ट असतील ते स्वभाव //धृ//

ऐष आरामांत राहून
देह झाला मलीन

शरीर सुखासाठी करती
नाना खटपटी

आज आहे सण होळीचा
नष्ट करा ऐहिक भाव

जाळून टाकू होळीमध्यें
दुष्ट असतील ते स्वभाव //१//

मन असे चंचल भारी
सर्व दिशेने घेई भरारी

राग लोभ अहंकार
मनाचे तर हे विकार

टाकता मलीनता मनाची
पेटलेल्या होळीकडे, घे धांव

जाळून टाकू होळीमध्यें
दुष्ट असतील ते स्वभाव //२//

विसरुनी चाललो मानवता
प्रत्येक बघतो स्वार्थता

विश्वासाचे आपले नाते
विसरुन गेले सारे ते

निस्वार्थी बुद्धीने आतां
जाणा इतर मनाचे ठाव

जाळून टाकू होळीमध्यें
दुष्ट असतील ते स्वभाव //३//

-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



एकत्र येऊं सारेजण
विसरुन जाऊ भेदभाव

जाळून टाकू होळीमध्यें
दुष्ट असतील ते स्वभाव //धृ//

ऐष आरामांत राहून
देह झाला मलीन

शरीर सुखासाठी करती
नाना खटपटी

आज आहे सण होळीचा
नष्ट करा ऐहिक भाव

जाळून टाकू होळीमध्यें
दुष्ट असतील ते स्वभाव //१//

मन असे चंचल भारी
सर्व दिशेने घेई भरारी

राग लोभ अहंकार
मनाचे तर हे विकार

टाकता मलीनता मनाची
पेटलेल्या होळीकडे, घे धांव

जाळून टाकू होळीमध्यें
दुष्ट असतील ते स्वभाव //२//

विसरुनी चाललो मानवता
प्रत्येक बघतो स्वार्थता

विश्वासाचे आपले नाते
विसरुन गेले सारे ते

निस्वार्थी बुद्धीने आतां
जाणा इतर मनाचे ठाव

जाळून टाकू होळीमध्यें
दुष्ट असतील ते स्वभाव //३//

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Author