गर्भातील आत्मा

मातेच्या उदरांत असतां, जाण असते त्या जीवाला,

प्रभूचाच मी अंश आहे, सांगत असतो तो सर्वाला...१

सो s हं चा निनाद सतत, कानास आमच्या ऐकूं येतो,

'तो' मीच आहे शब्दाने, आत्म्याचेच अस्तित्व सांगतो...२

मातेच्या उदरांतूनी बाहेरी, पडतां स्वतंत्र जन्म मिळे,

नाश पावूनी साऱ्या स्मृति, स्वत:सहित विसरे सगळे....३

आतां त्याचा निनाद ‘को..हं’, प्रश्न युक्त तो भरला असे,

“मी कोण आहे ?” विचारी सर्वां, उलघडा त्यास होत नसे.....४

जाणून घेण्या स्वत: विषयीं, सारे आयुष्य खर्च करती

पूनरपि येतां स्मृति त्याला, प्रभूमय हे सारे भासती .... ५

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

मातेच्या उदरांत असतां, जाण असते त्या जीवाला,

प्रभूचाच मी अंश आहे, सांगत असतो तो सर्वाला…१

सो s हं चा निनाद सतत, कानास आमच्या ऐकूं येतो,

‘तो’ मीच आहे शब्दाने, आत्म्याचेच अस्तित्व सांगतो…२

मातेच्या उदरांतूनी बाहेरी, पडतां स्वतंत्र जन्म मिळे,

नाश पावूनी साऱ्या स्मृति, स्वत:सहित विसरे सगळे….३

आतां त्याचा निनाद ‘को..हं’, प्रश्न युक्त तो भरला असे,

“मी कोण आहे ?” विचारी सर्वां, उलघडा त्यास होत नसे…..४

जाणून घेण्या स्वत: विषयीं, सारे आयुष्य खर्च करती

पूनरपि येतां स्मृति त्याला, प्रभूमय हे सारे भासती …. ५

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Author