फू बाई फू फेम अभिनेता संतोष मयेकर

सिडेनहैम महाविद्यालयात त्या स्नातक असून त्यांनी बॉलीवुड मध्ये पार्श्वगायिका म्हणून ५० हून अधिक चित्रपटासाठी व १० हून अधिक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत.



फू बाई फू फेम अभिनेता संतोष मयेकर यांचा जन्म २३ जून १९६६ रोजी झाला.

संतोष मयेकर यांनी आपल्या दर्जेदार अभिनयाने मराठी रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर त्यांनी विविध भूमिका साकारल्या. त्यांनी प्रामुख्याने नाटकांमध्ये विनोदी अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली होती होती. त्यांचे मालवणी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. मच्छिंद्र कांबळी यांच्या निधनानंतर संतोष मयेकर यांनी ‘वस्त्रहरण’चे अडीचशेहून अधिक प्रयोगात काम केले. ‘वस्त्रहरण’ या तुफान लोकप्रिय नाटकात त्यांची तात्या सरपंचाची भूमिका जोरदार गाजली होती. ‘भय्या हातपाय पसरी’ या नाटकातील उत्तर भारतीयाच्या भूमिकेबद्दल त्याचं प्रचंड कौतुक झाले होते.

संतोष मयेकर यांनी ऑल द बेस्ट, प्रेमा तुझा रंग कसा, विच्छा माझी पुरी करा, टाइम प्लीज, वाऱ्यावरची वरात आदी नाटकांतही उत्तम अभिनय केला होता.

२०१७ मध्ये राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटविणाऱ्या ‘दशक्रिया’ या चित्रपटातील त्यांची भूमिका होती. सोबतच देवाशप्पथ खोटे सांगेन, चष्मे बहाद्दर, गलगले निघाले, सत्य सावित्री, सत्यवान, सातबारा कसा बदलला, आयपीएल-इंडियन प्रेमाचा लफडा, आर्त आदी गाजलेल्या चित्रपटांतही त्यांनी काम केले होते. दूरचित्रवाणीवरील फू बाई फू या रिॲ‍लिटी शोमधून त्यांनी विशेष छाप पाडली होती.

नाट्यदर्पण पुरस्कार, नाट्य परिषदेचा पुरस्कार, संस्कृती कलादर्पण आदी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.

संतोष मयेकर यांचे निधन २ ऑक्टोबर २०१८ रोजी झाले.

Author