साहित्य: ३ कांदे, २ टी स्पून बटर, १ टी स्पून मैदा, १ चिकन क्यूब, १ तमालपत्र, १ ब्रेड स्लाईस, त्याला पुरेल इतके चीज, मीठ व मिरेपूड.
कृती: वेळ: : २५ मिनिटे कांदा पातळ चिरून बटरवर मऊ होईपर्यंत परतावा. त्यातच मैदा घालून तांबूस रंगाचा होईपर्यंत परतावे. त्यात चिकन क्यूब व पाणी घालावे. चमच्याने ढवळत ते चांगले उकळवावे. उकळी आल्यानंतर त्यात मीठ, मिरेपूड घालावी व पंधरा मिनिटे उकळू द्यावे. नंतर तमालपत्र काढून घ्यावे. ब्रेडच्या स्लाईसला संपूर्ण झाकले जाईल एवढे चीज लावावे व चीज वितळेपर्यंत ओव्हनमध्ये ग्रील करावे. उथळ बाऊलमध्ये सूप ओतून त्यावर ब्रेडचे दोन त्रिकोणी तुकडे करून अलगद ठेवावे. त्यावरून टोमॅटोसॉसचा एक-एक थेंब सोडावा, म्हणजे सूप दिसायलाही छान दिसेल.