रायगड जिल्ह्याचा ” जिल्हा पक्षी ” म्हणून नुकताच जाहीर झालेला.
२०२०च्या सप्टेंबरमध्ये भर पावसात फार्म जवळच राहणाऱ्या , विविध दुर्मिळ पक्ष्यांच्या अधिवासाची आणि सवयींची भरपूर माहिती असलेल्या समाधान पवार या तरूणाबरोबर कर्नाळ्याचे जंगल तुडवत ,निसरड्या वाटांवरून तोल आणि पाण्यापासून कॅमेरा सावरत या पक्षाच्या घरट्यासमोर पोचलो. याचे घरटे मातीचा उभा बंधारा किंवा डोंगराच्या उभ्या उतारावर बिळात असते. कॅमेरा तयार ठेऊन अडोशामागून निसर्गाच्या या अतिसुंदर कलाकृतीची वाट पाहत होतो. काही क्षणातच तोंडात पिल्लांसाठी भक्ष्य घेऊन ही नीळी पिवळी ज्योत समोर ठाकली. पोझ दिल्यासारखी थांबून सूर मारून एका क्षणात बिळात गडप झाली आणि काही सेकंदात पुन्हा वेगात बाहेर पडली.
बिळात आणले जाणारे भक्ष्य सुरवातीला लहान लहान किडे , चतुर , टोळ असे असते. पिल्ले जसजशी मोठी होतात तसतसं मोठ्या आकाराचे भक्ष्य आणले जाते. नर मादी दोघेही विना खंड , पिल्लांसाठी खाणे आणत असतात.
आम्ही गेलो तो दिवस पिल्लांचा एकोणीस / विसावा असावा. भक्ष्याच्या आकारावरूनही पिल्ले मोठी झाल्याचा अंदाज येत होता नशीबात असेल तर घरट्या
बाहेर प्रथमच आलेल्या पिल्लाचा फोटो काढण्याची संधी मिळेल या आशेने जोर धरला. आणि काय आश्चर्य …! घरट्याच्या बिळाच्या तोंडाशी निळसर पिवळी चोच डोकाऊ लागली. प्रथमच बाहेरचे जग पाहणारे बावरलेले डोळे दिसले. कॅमेरा फोकस करेपर्यंत बाळराजे पहिल्यावहिल्या उड्डाणात आमच्या समोरच येऊन बसले. आईवडिलांनी तात्काळ वरच्या फांदीवर येऊन त्याला साद घातली. आणि ती जोडी झाडांमागे गेली. आईवडिलांच्या मागोमाग पिल्लूही गेले. असं म्हणतात की बाहेर पडल्याबरोबर आईवडील पिल्लाला एखादे भक्ष्य दाखवतात. त्याने ते बरोबर उचलले की त्याला त्याच्या बळावर मोकळ्या जगात सोडून आपला त्याच्याशी संबंध तिथेच संपवतात.
Indeed it was a blessed day that offered me a chance to click an ODKF chick , moments after it fledged out.
वेळेअभावी ज्यांना पुस्तके वाचणे जमत नाही ते पुस्तकातील आशय ऑडिओ स्वरूपात ऐकू शकतात. नेत्रहीनावांसाठी सुद्धा ऐकून ज्ञान मिळवता येते. पण सगळाच आशय ऑडिओ स्वरूपात उपलब्ध नसतो. नेत्रहीनांसाठी अशी खास व्यवस्था प्राची गुर्जर यांनी त्यांच्या ‘यशोवाणी’ या स्वयंसेवी गटामार्फत गेल्या पंधरा वर्षांपासून दृष्टिबाधित व्यक्तींसाठी ध्वनिमुद्रित वाचनसेवा विनामूल्य देशभर पुरवली आहे. […]
दिवाळी जवळ आली रे आली की रामजी शेठजींचा मूड एकदम बिघडायचा. एक माणूस म्हणून ते चांगले होते पण पदरचा पैसा गेला की त्यांचा जीव कासावीस होत असे. गणपती उत्सवाला शेकड्यांनी वर्गणी द्यायला लागायची. […]
ह. ना. आपटेंनी अनेक पुस्तकांना प्रस्तावनाही लिहिल्या. ह. ना. आपटेंनी साहित्याच्या अनेक प्रांतांत मुशाफिरी केली असली, तरी ते गाजले त्यांच्या कादंबरी लेखनामुळेच. बारा सामाजिक व अकरा ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्या सर्वच लोकप्रियही झाल्या. पण त्यांचे नाव आजतागायत गाजत राहिले, ते त्यांच्या ‘पण लक्षात कोण घेते?’ या कादंबरीमुळे. ही कादंबरी मराठी साहित्याच्या वाटचालीतील मैलाचा दगड बनून राहिली. […]