एकांताच्या गुढ किनारी

एकांताच्या गुढ किनारी
वादळ आठवांचे घोंगावते

आयुष्य सारे सारे हिशोबी
अलवार अंतरात उलगड़ते

क्षणाक्षणांचे स्मृतीकारंजे
भारूनी नभांगणा सजविते

नीरव , नि:शब्दी नीरवता
मन , मनान्तराला सावरीते

सृष्टिचे रूप सुंदर मनोहारी
लोचनातुनी अविरत तरळते

लडिवाळ , लहर प्रीतरंगली
शब्दागंधल्या गीतास गुंफिते

एकांताच्या या गुढ किनारी
मुग्धगीत मनांतरा भुलविते

-- वि. ग. सातपुते. (भावकवी)

9766544908

रचना क्र. १४४.

२८ - ५ - २०२२.



एकांताच्या गुढ किनारी
वादळ आठवांचे घोंगावते

आयुष्य सारे सारे हिशोबी
अलवार अंतरात उलगड़ते

क्षणाक्षणांचे स्मृतीकारंजे
भारूनी नभांगणा सजविते

नीरव , नि:शब्दी नीरवता
मन , मनान्तराला सावरीते

सृष्टिचे रूप सुंदर मनोहारी
लोचनातुनी अविरत तरळते

लडिवाळ , लहर प्रीतरंगली
शब्दागंधल्या गीतास गुंफिते

एकांताच्या या गुढ किनारी
मुग्धगीत मनांतरा भुलविते

— वि. ग. सातपुते. (भावकवी)

9766544908

रचना क्र. १४४.

२८ – ५ – २०२२.

Author