एक झाड

एक झाड
सारखं माझ्या स्वप्नांत येत राहतं
अक्षरांनी लगडलेलं
मी वेचतो,मी तोडतो
मी जमवतो खुप अक्षरे
आणि
बनवतो निरनिराळे शब्द त्यांचेपासून
माळेसारखी ओवून
वाचकासाठी ठेवतो
काही माझ्यासाठीही.....

कुणी म्हणतात
याला कविता
कुणी गझल
आणि
कुणी काहीही!

-- श्रीकांत पेटकर



एक झाड
सारखं माझ्या स्वप्नांत येत राहतं
अक्षरांनी लगडलेलं
मी वेचतो,मी तोडतो
मी जमवतो खुप अक्षरे
आणि
बनवतो निरनिराळे शब्द त्यांचेपासून
माळेसारखी ओवून
वाचकासाठी ठेवतो
काही माझ्यासाठीही…..

कुणी म्हणतात
याला कविता
कुणी गझल
आणि
कुणी काहीही!

— श्रीकांत पेटकर

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →