साहित्य: ५-६ लाल पिकलेले टोमॅटो, चवीप्रमाणे मीठ व साखर, फोडणीसाठी १ टे.स्पून साजूक तूप, पाव टी स्पून जिरे, ३ लसूण पाकळ्या.
कृती: वेळ: : १० मिनिटे टोमॅटो धुऊन मोठ्या फोडी कराव्यात. पाच कप पाणी पातेल्यात घेऊन मंद गॅसवर उकळत ठेवावे. त्यात टोमॅटोच्या फोडी टाकून अंदाजे तीन कप पाणी होईपर्यंत उकळवावे. गार झाल्यावर मोठ्या गाळणीने गाळावे. गाळलेल्या पाण्यात मीठ, साखर घालून उकळी आणावी. साजूक तुपाच्या फोडणीत लसूण व जिरे घालून सुपाला फोडणी द्यावी.
आजारी माणसासाठी हे सूप चांगले, कारण या सूपामुळे तोंडाला रुची येते तसेच हे सूप पचायलाही हलके असते. अख्खे जिरे आवडत नसल्यास जिऱ्याची पावडर फोडणीत घालता येईल.