दुनियादारी मराठी चित्रपट

सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी ‘ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांचे आहे. या मल्टी स्टार कास्ट चित्रपटात अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, जितेंद्र जोशी, सई ताह्मणकर, उर्मिला कानेटकर, संदीप कुलकर्णी, सुशांत शेलार आणि वर्षा उसगावकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.



आजच्या युवा पिढीला आपलासा वाटलेल्या अशा मनोरंजक “दुनियादारी” या मराठी चित्रपटाच्याच्या प्रदर्शनास आज यशस्वी आठ वर्षे पूर्ण झाली. सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी ‘ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांचे आहे. या मल्टी स्टार कास्ट चित्रपटात अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, जितेंद्र जोशी, सई ताह्मणकर, उर्मिला कानेटकर, संदीप कुलकर्णी, सुशांत शेलार आणि वर्षा उसगावकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. उदय टीकेकर, उदय सबनीस इत्यादींच्याही भूमिका आहेत.

या चित्रपटाला अमितराज यांचे संगीत आहे. टिक टिक वाजते, यारा यारा, जिंदगी जिंदगी, देवा तुझ्या….. या चित्रपटातील ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. सत्तरच्या दशकातील काॅलेज जीवनावर आधारित हा चित्रपट अतिशय रंजक चित्रपट आहे. या चित्रपटाने घवघवीतपणे यश प्राप्त केले आणि या चित्रपटातील युवा कलाकार स्टार झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author