दु:खाने शिकवले

रंग बदलले ढंग बदलले, साऱ्या जीवनाचे

बदलणाऱ्या परिस्थितीने, तत्व शिकवले जगण्याचे....१,

कैफ चढूनी झेपावलो, नभात स्वच्छंदे

यश पायऱ्या चढत असतां, नाचे मनीं आनंदे....२,

धुंदीमध्यें असता एका, अर्थ न कळला जीवनाचा

आले संकट दाखवूनी देयी, खरा हेतू जगण्याचा....३,

दु:खामध्ये होरपळून जाता, धावलो इतरांपाठीं

अनेक दु:खे दिसून येता, झालो अतिशय कष्टी....४,

दु:ख आपले निवारण्याते, आनंद वाटे मनीं

इतर जणांची दु:खे हाटविता, द्विगुणीत गेला होऊनी....५

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०



रंग बदलले ढंग बदलले, साऱ्या जीवनाचे

बदलणाऱ्या परिस्थितीने, तत्व शिकवले जगण्याचे….१,

कैफ चढूनी झेपावलो, नभात स्वच्छंदे

यश पायऱ्या चढत असतां, नाचे मनीं आनंदे….२,

धुंदीमध्यें असता एका, अर्थ न कळला जीवनाचा

आले संकट दाखवूनी देयी, खरा हेतू जगण्याचा….३,

दु:खामध्ये होरपळून जाता, धावलो इतरांपाठीं

अनेक दु:खे दिसून येता, झालो अतिशय कष्टी….४,

दु:ख आपले निवारण्याते, आनंद वाटे मनीं

इतर जणांची दु:खे हाटविता, द्विगुणीत गेला होऊनी….५

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author