दृष्टांत विवेकी

मनाचिया, शांत डोही
पर्जन्यबिंदू, भावनांचे...

स्वाती, नक्षत्रांत पड़ता
मोती होती शब्दफुलांचे...

गीतात मधुर प्रीतचांदणे
निष्पाप स्पर्श भावनांचे...

हितगुज अव्यक्त अबोल
सहजी उमलते अंतरीचे...

शब्दात गंधाळ भावनांचा
जीवनी श्वास सारे सुखाचे...

सभोवार तृप्तीचे कारंजे
दृष्टांत, विवेकी चिंतनाचे...

मनाचियाच, शांत डोही
परिस्पर्ष सारेच धन्यतेचे...

–वि.ग.सातपुते. (भावकवी)

9766544908

रचना क्र. २१९

२९/८/२०२२



मनाचिया, शांत डोही
पर्जन्यबिंदू, भावनांचे…

स्वाती, नक्षत्रांत पड़ता
मोती होती शब्दफुलांचे…

गीतात मधुर प्रीतचांदणे
निष्पाप स्पर्श भावनांचे…

हितगुज अव्यक्त अबोल
सहजी उमलते अंतरीचे…

शब्दात गंधाळ भावनांचा
जीवनी श्वास सारे सुखाचे…

सभोवार तृप्तीचे कारंजे
दृष्टांत, विवेकी चिंतनाचे…

मनाचियाच, शांत डोही
परिस्पर्ष सारेच धन्यतेचे…

–वि.ग.सातपुते. (भावकवी)

9766544908

रचना क्र. २१९

२९/८/२०२२

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →