दोन मनें द्या प्रभू

आपल्याला इच्छा आहे | प्रभू तुमच्या नामस्मरणाची | परंतू ऐकून घ्या |कहाणी आमच्या अडचणींची ।।



आपल्याला इच्छा आहे

प्रभू तुमच्या नामस्मरणाची

परंतू ऐकून घ्या

कहाणी आमच्या अडचणींची ।।

नाम घ्यावे मुखीं

रात्रंदिनीं एकचित्ताने

सार्थक होईल तेव्हां

आमची तप:साधने ।।

परि संसार पाठी,

लावला आहेस तूं

गुरफटल्यामुळें त्यांत

साध्य न होई हेतू ।।

मला पाहिजे दोन्हीं

संसारात राहून ईश्वर

एकात गुंततां मन

दुसरे न होई साकार ।।

दे मजला प्रभू

मनाची एक जोडी

संसारांत राहून मी

घेईन प्रभूत गोडी ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

Author