ज्ञानेंद्रियं
जीभ सांगे
चव कशी
रसनेची
तह्रा खाशी
घ्राणेंद्रिय
आहे खास
पदार्थांचा
घेई वास
स्पर्शज्ञान
महत्वाचे
त्वचासांगे
मर्म त्याचे
दृष्टीविना
कसा जगू
सृष्टी सारी
नेत्री बघू
कर्णेंद्रिय
सान जरी
ऐकण्याचे
कामकरी
इंद्रीयात
सर्वश्रेष्ठ
ज्ञानेंद्रीयं
आहे ज्येष्ठ
— सौ.माणिक शूरजोशी
नाशिक
Author
Post Views: 12