दिवेलागण

ही सायंकाळ
ती खग माळ
उंच उडते
सांज सकाळ

पश्चिम वात
उधळी रात
हा सुखावतो
मनामनात

येता घरात
ही तेलवात
दिवेलागण
या देव्हाऱ्यात

दिवा लावला
तम सरला
शुभंकरोती
नाद घुमला

वृंदावनाशी
दिप लावशी
नित्य घरात
लक्ष्मी वसशी

-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक



ही सायंकाळ
ती खग माळ
उंच उडते
सांज सकाळ

पश्चिम वात
उधळी रात
हा सुखावतो
मनामनात

येता घरात
ही तेलवात
दिवेलागण
या देव्हाऱ्यात

दिवा लावला
तम सरला
शुभंकरोती
नाद घुमला

वृंदावनाशी
दिप लावशी
नित्य घरात
लक्ष्मी वसशी

— सौ.माणिक शुरजोशी
नाशिक

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →