दीपोत्सव

आली मांगल्याची दीपदिवाळी
सुखसौख्याला सजवित आली
उत्सवांचा राजा, सण दिवाळी
दीपोत्सवी आत्मरंगी रंगरंगली...

स्वर्ग जणु अवनीवरी अवतरला
जणु वसुंधराच तारांगण जाहली
दिव्यत्वाचे, प्रकाशपर्व उधळीत
अमंगळ सारित मांगल्या आली...

सोहळा दीपोत्सवाचा ब्रह्मानंदी
अंगणी संस्कारांची सडारांगोळी
तेजाळीत वात्सल्यतेची नीरांजने
दीपोत्सवी पावित्र्य रुजवित आली...

वसूबारस,धनतेरस,नरकचतुर्दशी
बलिप्रतिपदा,भाऊबीज बंधुत्वाची
पंचदिनी, दीपोत्सवी ही दीपावली
चैतन्या! सजवित मढ़वित आली...

वि.ग.सातपुते.( भावकवी )

( 976654908 )

रचना क्र. २७०

२४/१०/२०२२



आली मांगल्याची दीपदिवाळी
सुखसौख्याला सजवित आली
उत्सवांचा राजा, सण दिवाळी
दीपोत्सवी आत्मरंगी रंगरंगली…

स्वर्ग जणु अवनीवरी अवतरला
जणु वसुंधराच तारांगण जाहली
दिव्यत्वाचे, प्रकाशपर्व उधळीत
अमंगळ सारित मांगल्या आली…

सोहळा दीपोत्सवाचा ब्रह्मानंदी
अंगणी संस्कारांची सडारांगोळी
तेजाळीत वात्सल्यतेची नीरांजने
दीपोत्सवी पावित्र्य रुजवित आली…

वसूबारस,धनतेरस,नरकचतुर्दशी
बलिप्रतिपदा,भाऊबीज बंधुत्वाची
पंचदिनी, दीपोत्सवी ही दीपावली
चैतन्या! सजवित मढ़वित आली…

वि.ग.सातपुते.( भावकवी )

( 976654908 )

रचना क्र. २७०

२४/१०/२०२२

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →