देवत्व

देवा दाव रे, दाव रे, दाव रे
देवरूप तुझे ते संचारलेले।।धृ।।

संतजन सारे तुझेच उपासक
असुरांचा, एकची तू संहारक
अराजक, अनितीचे जीवघेणे
सार दूर जे इथे नित्य माजलेले।।

तूच निधर्मी, निष्पाप रे उद्गाता
तूच रे बुध्द, येशू, ईश्वर अल्ला
उखड, उखड रे सारेच निर्दयी
धर्मांधीबीज जगती अंकुरलेले।।

कर निर्दालन त्या साऱ्या दुष्टांचे
वाजीव रे डमरू, सौख्यशांतीचे
नान्दू दे रे, ते रामराज्य सुखाचे
देवा दावरे देवत्व तुझे संचारलेले।।

-- वि.ग.सातपुते. (भावकवी)

9766544908

रचना क्र. ८७.

२० - ३ - २०२२.



देवा दाव रे, दाव रे, दाव रे
देवरूप तुझे ते संचारलेले।।धृ।।

संतजन सारे तुझेच उपासक
असुरांचा, एकची तू संहारक
अराजक, अनितीचे जीवघेणे
सार दूर जे इथे नित्य माजलेले।।

तूच निधर्मी, निष्पाप रे उद्गाता
तूच रे बुध्द, येशू, ईश्वर अल्ला
उखड, उखड रे सारेच निर्दयी
धर्मांधीबीज जगती अंकुरलेले।।

कर निर्दालन त्या साऱ्या दुष्टांचे
वाजीव रे डमरू, सौख्यशांतीचे
नान्दू दे रे, ते रामराज्य सुखाचे
देवा दावरे देवत्व तुझे संचारलेले।।

— वि.ग.सातपुते. (भावकवी)

9766544908

रचना क्र. ८७.

२० – ३ – २०२२.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29665 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →