डिसेंबर १७ : पहिले भारतीय कसोटी शतक

लाला अमरनाथांचे पदार्पणातील शतक आणि पदार्पणात शतक काढणार्‍या भारतीयांचा तपशील.



१७ डिसेंबर १९३३ रोजी कसोटी सामन्यांमधील भारतीयाचे पहिलेवहिले शतक आले. ज्या फलंदाजाने सर्वप्रथम भारताकडून तीन-अंकी धावसंख्या गाठली त्या फलंदाजाचा हा पदार्पणाचा सामना होता. सामना होता इंग्लंडविरुद्ध बॉम्बेच्या जिमखाना ग्राऊंडवर आणि तो फलंदाज होता लाला अमरनाथ. (तपशिलासाठी पहा : फ्लॅशबॅक ११ सप्टेंबर)
पदार्पणाच्या कसोटीत शतक नोंदविण्याची कामगिरी आजवर बारा भारतीयांना जमलेली आहे :

<१. लाला अमरनाथ

<२. दीपक शोधन

<३. ए जी कृपालसिंग

<४. अब्बास अली बेग

<५. हनुमंत सिंग

<६. गुंडाप्पा विश्वनाथ

<७. सुरेंदर अमरनाथ

<८. मोहम्मद अझरुद्दीन
पहिल्या डावात ११० धावा. पुढच्या सलग दोन कसोट्यांमध्येही शतके. एकूण ९९ कसोट्यांमधून २२ शतके.

<९. प्रवीण आमरे

<१०. सौरव गांगुली

<११. वीरेंदर सेहवाग

<१२. सुरेश रैना

— डॉ. आनंद बोबडे

 

Author