क्रीम ऑफ चिकन सूप

साहित्य: पाव किलो चिकन, पाव कप घोटलेली मलई १ कप दूध, २ टीस्पून कॉर्नफ्लोअर, पाव टीस्पून किसलेले आले, पाव टिस्पून गरम मसाला - लवंग, दालचिनी, काळेमिरे यांची पावडर मीठ, मिरेपूड चवीप्रमाणे.

कृती: वेळ: ४५ मिनिटे चिकन स्वच्छ धुवून घ्या. ३-४ कप पाण्यात आल व गरम मसाला घालून शिजवून घ्या. थंड झाल्यावर चिकन पिसेस मधील हाडे बाजूला काढून सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवून घ्या. नंतर हे एकजीव झालेले मिश्रण मोठ्या गाळणीने गाळून घ्या. गाळलेल्या मिश्रणात मीठ घालून ते उकळत ठेवा. दूध व कॉर्नफ्लोअर यांची पेस्ट करून त्यात टाका व हे मिश्रण उकळू द्या. सूपाचा घट्टपणा कमी करण्यासाठी अंदाज घेऊन थोडे पाणी टाका.

गरम सूप बाऊलमध्ये वाढल्यानंतर वरून थोडे क्रीम किंवा घोटलेली मलई घाला, थोडी मिरेपावडर पसरवा.

साहित्य: पाव किलो चिकन, पाव कप घोटलेली मलई १ कप दूध, २ टीस्पून कॉर्नफ्लोअर, पाव टीस्पून किसलेले आले, पाव टिस्पून गरम मसाला – लवंग, दालचिनी, काळेमिरे यांची पावडर मीठ, मिरेपूड चवीप्रमाणे.

Author