साहित्य: -१ वाटी मक्याचे दाणे (ताजे) १ वाटी हरबऱ्याची भिजवलेली डाळ, १ चमचा लालतिखट, १ मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, १ मोठा चमचा ब्रेड क्रम्बस्, १ चमचा आले-लसूण पेस्ट,
१ किसून शिजवलेले गाजर, परतण्याकरिता तेल, चवीप्रमाणे मीठ.
कृती: -मक्याचे दाणे व भिजविलेली हरवऱ्याची डाळ मिक्सरमधून जरा भरड काढावी. त्यामध्ये उरलेले सर्व साहित्य एकत्र करून लिंबाएवढे गोळे करून मध्यभागी दाबून कटलेटस् तयार करावेत. आकार हवा तसा करता येतो. चौकोनी, लांबट गोल वगैरे. नॉनस्टिक पॅनवर हे कटलेटस् दोन्ही बाजूंनी चांगले लालसर परतावेत. गरमच सर्व्ह करावेत. फारच चविष्ट लागतात.
