विनोदी अभिनेते व रंगकर्मी सतीश तारे

पुण्यात वडिलांच्या नाटकांतून अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या सतीश तारे यांनी आपल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वामुळे लेखन, दिग्दर्शन, अभिनय, गायन, नाटय़निर्मिती अशा नाटकाच्या सगळ्याच प्रांतात मुक्त मुशाफिरी केली. ‘ऑल लाइन क्लीअर’ या सस्पेन्स कॉमेडीद्वारे त्यांनी लेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर प्रथम पदार्पणातच आपली नाममुद्रा उमटविली.

सतीश तारे सतीश यांचे वडील जयंत तारे नाटय़कर्मी असल्यामुळे बालनाटय़ांपासूनच त्यांच्या रंगभूमीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली. जयंत तारे पुण्यात ‘फुलराणी’ ही बालरंगभूमी चालवायचे.

पुण्यात वडिलांच्या नाटकांतून अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या सतीश तारे यांनी आपल्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वामुळे लेखन, दिग्दर्शन, अभिनय, गायन, नाटय़निर्मिती अशा नाटकाच्या सगळ्याच प्रांतात मुक्त मुशाफिरी केली. ‘ऑल लाइन क्लीअर’ या सस्पेन्स कॉमेडीद्वारे त्यांनी लेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर प्रथम पदार्पणातच आपली नाममुद्रा उमटविली.

‘ उत्स्फूर्त लवचिकता, हजरजबाबीपणा, विनोदाची अंगभूत उत्तम जाण आणि भान, जबरदस्त टायमिंग सेन्स या गुणांमुळे त्यांनी अल्पावधीतच नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या तिन्ही माध्यमांत आपले स्थान निर्माण केले. ‘श्यामची मम्मी’, ‘जादू तेरी नजर’, ‘आम्ही बिघडलो’, ‘असा मी असामी’, ‘शुभ बोले तो नारायण’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘सगळं कसं गुपचूप’, ‘चल घेऊन टाक’, ‘रात्रीच घोटाळा झाला’, ‘गोलगोजिरी’ इत्यादी त्यांची नाटके गाजली. ‘नवरा माझा नवसाचा’, ‘वळू’, ‘बालक पालक’, ‘नवरा माझा भवरा’ आदी चित्रपटांतूनही त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेत त्यांनी रंगविलेली ‘माऊली’ ही व्यक्तिरेखा घराघरांत पोहोचली. ‘सारेगम’ व रिअॅलिटी शोज्मधूनही त्यांनी आपली छाप पाडली. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या गायनातील हुन्नरही प्रकट केला.

अभिनेत्याबरोबरच लेखक आणि गायक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. ‘सारेगमप’मधून ते गायक म्हणून प्रेक्षकांच्या समोर आले होते. सतीश तारे यांना विविध प्रकारची वाद्ये वाजवता येत होती.

सतीश तारे यांचे ३ जुलै २०१३ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →