naral batatyache patis (tikiya)

नारळ बटाट्याचे पॅटिस (टिकिया) – Recipe



साहित्य : – ४ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, २ चमचे तांदुळाची पिठी किंवा मैदा, अर्ध्या नारळाचा कीस, अर्धा चमचा मीठ, अर्धा इंच आले, २ हिरव्या मिरच्या, ३ चमचे चिरलेली कोथिंबीर, १ चमचा लिंबाचा रस, २ मोठे चमचे रिफाईंड तेल.

कृती :- नारळाचा कीस, आले, मिरच्या, कोथिंबीर व मीठ घालून मिक्सरमधून बारीक वाटावे. लिंबाचा रस घालून ढवळावे. नंतर उकडलेले बटाटे चांगले हातानेच चुरावेत. त्यात तांदुळाची पिठी व थोडे मीठ घालून चांगले मळावे.

लहान लिंबाएवढे त्याचे भाग करावेत. प्रत्येक भागाची हातावर पारी करून त्यात प्रथम केलेली चटणी घालावी. नंतर त्यावर दुसरी पारी ठेवून कडा चांगल्या दाबून घ्याव्या व गरम तेलात मंद आचेवर तांबूस होईपर्यंत परताव्या. हे लहान पॅटीस एका डिशमध्ये घालून चांगले मांडून ठेवावेत.
बाजूला एका बाऊलमध्ये टोमॅटो सॉस ठेवावे.

Author