चूक

चिंतनपर कविता



भावना शब्दात पकडू नका
शब्द एकमेकात मिसळतील
आणि भावना त्यातून निसटतील.

भावनांना कागदात बांधू नका
फाटका कागद फक्त हाती राहील
अन् भावना खाली सांडून जातील. .

भावना डोळ्यातही आणू नका
डोळे कोरडेच राहातील
भावना अश्रूंबरोबर वाहून जातील.

— श्री.उदय विनायक भिडे

Author