साहित्य: – दीड वाटी मैदा, १ अंडे, अर्धा चमचा बेकिंग पावडर, ३ मोठे चमचे किसलेले चीज, थोडे दूध, अर्धा चमचा मिरपूड.
कृती: – वरील सर्व साहित्य एकत्र करावे. अंडे फोडून बीट करावे व ते त्यात मिसळावे. हे सर्व मिश्रण चांगले फेसावे. जरूर वाटल्यास थोडे पाणी घालावे. जितके जास्त फेटू तितकी भजी हलकी होतात. कढईत तेल तापवून चमच्याने हे मिश्रण त्यात घालून पकोडे तळावेत. सॉसबरोबर खाण्यास द्यावे.
Author
Post Views: 10
