छडी लागे छम् छम्, विद्या येई घम् घम्
छम् छम् छम् । छम् छम् छम् । धृ. ।।
मोठ्या मोठ्या मिशा डोळे एवढे एवढे लाल
दंताजीचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम ।
छम् छम् छम् ॥१॥
तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण
पचापचा शिव्या देई खाता खाता पाने
मोर््या मूर्खा, गोप्या गध्या देतो सर्वा दम ।
छम् छम् छम् ॥२॥
तोंडे फिरवा, पुस्ती गिरवा, बघू नका कोणी
हसू नका, रडू नका, बोलू नका कोणी
म्हणा सारे एकदम, ओम नम: सिद्धम् ।.
छम् छम् छम् ।॥३॥।
Post Views: 21