(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी

    सध्या झी मराठी वाहिनीवर “घेतला वसा टाकू नको” ही मालिका संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित केली जात होती. त्यात एक गुरुजी कथेच्या सुरुवातीचा भाग विस्तार स्वरूपात सांगत असत. या मालिकेचे सूत्रसंचालन भगरे गुरुजी करत असत. या अगोदर झी मराठी वाहिनीच्या “राम राम महाराष्ट्र” च्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून भगरे गुरुजी ‘वेध भविष्याचा’ या सेगमेंटमधून राशी भविष्य सांगताना दिसले. त्यामुळे भगरे गुरुजी सर्वांच्याच परिचयाचे आहेत.

      April 22, 2022


  • प्रख्यात बासरीवादक पंडित देवेंद्र मुर्डेश्वर

    १९४० साली कर्नाटकातून देवेंद्र मुर्डेश्वर हे तबला शिकण्यासाठी मुंबईत आले. पण त्यांचे प्रेम बासरी वर होते. त्या मुळे त्यांनी बासरी शिकण्यास सुरवात केली. मा.पन्नालाल घोष हे त्यांचे गुरु, पन्नालाल घोष यांच्या मुलीशी देवेन्द्र मुर्डेश्वर यांचा विवाह झाला होता. पन्नालाल घोष यांच्या निधनानंतर मा.देवेंद्र मुर्डेश्वर यांनी मा. पन्नालाल यांचे बासरी वादन पुढे नेले.पन्नासच्या दशकात पं. रवी शंकर यांनी ऑल इंडिया रेडिओ वर वाद्यवृंदासाठी त्यांना आमंत्रित केले, त्या नंतर ते आकाशवाणीत कामाला लागले. देवेंद्र मुर्डेश्वर यांचे २९ जानेवारी २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      January 30, 2017


  • छत्रपती शाहू महाराज

    छत्रपती शाहूमहाराज व भारताचे स्वातंत्र्य यांचे अतूट नाते होते. छत्रपती शाहूमहाराजाचा जन्म २६ जुलै, १८७४ साली कागल थोरली पातीचे जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या घराण्यात झाला. योगायोगाने ते छत्रपती झाले. कोल्हापूरच्या महाराणीने त्यांना दत्तक घेतले. राजकोट येथील संस्थानिकांच्या मुलांसाठी असलेल्या विद्यालयात त्यांच शिक्षण झाले. तेथील फ्रेझर या गुरूच्या शिक्षणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला.

    २ एप्रिल, १८९४ साली त्यांनी कोल्हापूरच्या प्रशासनाची सूत्रे हाती घेतली. २८ वर्षे त्यांनी कोल्हापूरचा कायापालट करण्यात घालविली. १९२२ साली त्यांनी इहलोक सोडला. त्या काळात देशभर कडवे क्रांतिकारक बंड करण्याच्या तयारीत होते. इंग्रज सशस्त्र होते. विवेकानंदांची व्याख्याने अमेरिकेत गाजत होती. पण हा छत्रपती गोरगरीबांचा, दीनदलितांचा राजा होता, विव्दानांचा चाहता होता, कलावंतांचा त्राता होता, समाजसुधारकांचा दाता होता. विव्दानांचा चाहता होता, समाजसुधारकांचा दाता होता, शिक्षणाचा भोक्ता होता, स्थिर चित्ताने धोरण आखणारा नेता होता. उच्चवर्णीय समाजाच्या गुलामगिरीतून गरीबांना मुक्त करणारा सत्ताधीश होता. त्यांने क्षात्रजगदगुरूचे धर्मपीठ स्थापन केले. कुलकर्णी वतन नष्ट करून तलाठी पद निर्माण केले. बलुतेपध्दती नष्ट केली. पूर्वाश्रमीच्या गुन्हेगारांना मुक्त केले.

    महाराष्ट्राच्या इतिहासात ज्या महापुरूषांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते त्यामध्ये राजर्षी शाहु महाराज अग्रभागी आहेत. महाराजांनी मानवतावादी दृष्टीकोन ठेवला. समता प्रस्तापित करण्यासाठी जीवनभर अथक प्रयत्न केले. शेती सुधारणेला प्राधान्य दिले. शेतकर्यांना सवलती दिल्या. नोकरी व्यवसायाच्या संधी सामान्यांना उपलब्ध करून दिल्या. उद्योगधंदे उभे केले.

    २६ जुलै १८७४ हा राजर्षी शाहु महाराज यांचा जन्मदिवस. हा कालखंड इंग्रजी राजवटीचा. स्वातंत्र्यप्रेमाने भारावलेल्या समाजात सुधारणासाठी तळमळीने कार्य करणारे शाहु महाराज हे कोल्हापुर संस्थानातील निःस्पृह, निर्भय आणि लोककल्याणकारी राजे होते. त्यांनी लोकशिक्षणासाठी अनेक संस्था उभारल्या आणि समाजिक सुधारणेच्या चळवळीत जीव ओतला. जनतेचे कल्याण हिच ईश्वर पुजा मानणार्या शाहु महाराजांनी जनतेला वेठीस धरणारी वेठबिगार आणि बलुतेदार पध्दती बंद केली. राखीव घटकासाठी आदेश काढुन राखीव जागांची तरतुद केली.

    शाहु महाराजांनी महार आणि कुलकर्णी वतने नष्ट केली. दुष्काळग्रस्तांना आधार दिला. शेतकर्यांना सर्वोतोपरी मदत केली. तलाव दुरूस्ती केली. पाटबंधारे योजना हाती घेतल्या. आरोग्य केंद्राची निर्मिती केली. विविध जातीतील विद्यार्थीसाठी वस्तीगृहाची सोय केली. राजा हा सर्वव्यापक असावा. त्याला आपल्या राज्यांची संपुर्ण माहिती असावी या विचारांचा पगडा असलेल्या महाराजांनी सामाजिक सुधारणेबरोबर शेतीची सुधारणा करणे छोटे उद्योगधंदे उभारणे शेतकर्यांना सवलती देणे. नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे. यासारखी लोकोपयोगी कामे मोठया तळमळीने केली. केवळ राजा म्हणून ते वागले नाहीत, तर प्रजेचा मित्र म्हणून त्यांनी कार्य केले. शिक्षण हा विकासाचा पाया आहे. हे सुधारणेचे मुलतत्व शाहु महाराजांनी जाणले होते.

      March 12, 2015


  • बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आणि मिस्टर परफेक्टनिष्ट आमीर खान

    आमीरचे पूर्ण नाव मोहम्मद आमिर हुसैन खान. त्यांचा जन्म १४ मार्च १९६५ रोजी झाला. आमीरचा जन्म मुंबई येथे ताहिर हुसैन व झीनथ हुसैन , या चित्रपट निर्माताच्या घरात झाला. आमीर चार भावंडांत सर्वात मोठा, त्याला एक भाऊ अभिनेता फैजल खान आणि दोन बहिणी फरहात आणि निखात खान आहे. पुतण्या इम्रान खान एक समकालीन हिंदी चित्रपट अभिनेता आहे. आमीर खानचे शिक्षणासाठी जे.बी. पेटिट शाळेत. व नंतर त्याने इयत्ता आठवी पर्यंत चे शिक्षण संत ॲन च्या महाविद्यालयात घेतले आणि इयत्ता नववी व दहावी चे शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूल, माहीम येथून पूर्ण केले. गेली अनेक वर्षे बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेला आमीर हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान व लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो. 'यादो की बारात' या सुपरहिट चित्रपटात या चिमूकल्या आमीर खानने बॉलीवूड एण्ट्री केली होती. १९७३ साली आलेल्या यादों की बारात ह्या चित्रपटामध्ये आमीर खानने बाल कलकार म्हणून काम केले होते. पुढील वर्षी, त्याने आपल्या वडीलांच्या निर्मित मधहोश चित्रपटात महेंद्रसिंग संधू ची तरुण भूमीका निभवलि. त्यानंतर १९८४ सालच्या होली ह्या चित्रपटामध्ये देखील त्याची भूमिका होती. कयामत से कयामत तक ह्या १९८८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधून आमिरने जुही चावलासोबत नायकाच्या रूपाने सिनेसृष्टीत पदार्पण केले. ह्या चित्रपटाच्या तूफान यशानंतर आमिरने अनेक दर्जेदार भूमिका करून बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांमध्ये आपले नाव जोडले. आपल्या प्रेमीकेवर होणाऱया बलात्काराचा सूड घेण्याच्या इर्शेने गुन्हेगारी पार्श्वभूमीत खेचला जाणारा आमिर खान 'राख' या क्राईम थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आला होता. भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातील साम्यता दाखवून देणाऱया 'रंग दे बसंती' मधून आमिरने पुन्हा एकदा सामाजिक आणि ऐतिहासिक विषयाला हात घातला होता अभिनयासोबतच आमिरने चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती देखील केली आहे. २०१२ सालच्या सत्यमेव जयते ह्या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा यजमान ह्या नात्याने त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. आजवर आमिरला अनेक फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार मिळाले असून त्याच्या कला क्षेत्रामधील योगदानासाठी भारत सरकारने त्याला २००३ साली पद्मश्री तर २०१० साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. २०११ साली आमिरला युनिसेफने जगातील शिशू आहार सुधारण्याच्या अभियानामध्ये राष्ट्रीय राजदूत ह्या स्वरूपात नियुक्त केले. चित्रपटसृष्टीसोबत आमिरने इतर सामाजिक व राजकीय चळवळींमध्ये योगदान दिले आहे. २००६ साली त्याने मेधा पाटकर चालवित असलेल्या नर्मदा बचाओ आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. आपल्या अनेक वर्षांच्या करिअरमध्ये आमिरने अनेक सिनेमांसाठी लूक बदलले आणि प्रत्येकवेळी तो वेगळ्या अंदाजात दिसला. 'दंगल' या नवीन सिनेमात आमिर कुस्तीवीर महावीर सिंह फोगटच्या भूमिकेत दिसला आहे. या सिनेमासाठी त्याने वजन वाढवून ९० किलो केले होते. आमिरचे सध्या एका सिनेमासाठी ८ कोटी रुपये मानधन आहे. तसेच, आमिर नफ्यात ४० टक्के शेअर्ससुध्दा ठेवतो. तो एका जाहिरातसाठी ४ कोटी रुपये घेतो. त्यांच्याकडे Titan, Godrej सारखे प्रसिध्द ब्रँड्स आहेत.आमिरने 'सत्यमेव जयते' या टीव्ही शोच्या एका एपिसोडसाठी ३ कोटी रुपये घेतले होते. सोबतच, तो टीव्ही शोचा सर्वात महागडा होस्ट बनला होता. आमीर खान आणि किरण राव २००५ मध्ये हे दोघे विवाह बंधनात अडकले होते. आमीर आणि किरण यांची भेट 'लगान' चित्रपटाच्या सेटवर झाली आहे. आशुतोष गोवारिकर यांनी निर्मिती केलेल्या चित्रपट 'लगान' मध्ये किरण राव असिस्टंट डायरेक्टर होत्या. लग्नानंतर किरण राव यांनी 'धोबी घाट' या चित्रपटाचे डायरेक्शन केले. आजाद असे या दोघांच्या मुलाचे नाव आहे. किरण राव आमिर खान याची दूसरी पत्नी आहे. रीना दत्ता ही आमिरची पहिली पत्नी आहे. २००२ मध्ये आमिर आणि रीना यांचा घटस्फोट झाला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 14, 2017


  • प्रसिद्ध मराठी गायक-नट पंडितराव नगरकर

    पूर्ण नाव गोविंद परशुराम नगरकर; परंतु पंडितराव याच नावाने प्रसिद्ध. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१० रोजी झाला. लहानपणापासूनच पंडितरावांचा गायनाकडे कल होता. सुप्रसिद्ध गायक-नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे प्रथम आणि नंतर पुणे येथील भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला. मित्रमंडळीच्या आणि चाहत्यांच्या वर्तुळात पंडितरावांनी गायिलेल्या गीतांचा बोलबाला झाल्यामुळे ओडियन कंपनीने त्यांच्या काही गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्यांपैकी ‘जा के मथुरा’, ‘बोल हसरे बोल प्यारे’, ‘रामरंगी रंगले मन’ इ. गीतांच्या ध्वनिमुद्रिका बऱ्याच लोकप्रिय झाल्या.

    आकाशवाणीच्या मुंबई केंद्राशी त्यांचा संबंध सुरुवातीपासून होता. हरिभाऊ शुक्ल यांच्या मंगला नाटकात काम करून पंडितरावांनी नाट्यसृष्टीत प्रवेश केला. पुढे सुलोचना पालकर हिच्या सहकार्याने पंडितरावांनी १९३४ साली ‘सुलोचना संगीत मंडळी’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली व १९३७ पर्यंत कंपनीच्या नाट्यप्रयोगांत नायकाच्या भूमिका केल्या. संशयकल्लोळ तसेच खाडिलकर यांचे संगीत त्रिदंडी-संन्यास ही नाटके ‘सुलोचना संगीत मंडळी’ करीत असे. त्यांशिवाय मृच्छकटिक, मानापमान, सौभद्र, लग्नाची बेडी, ना. सी. फडक्यांचे संजीवन इ. नाटकेही या संस्थेने रंगमंचावर आणली होती. १९३७ मध्ये कंपनी बंद पडली. नंतर दामुअण्णा जोशी यांच्या ‘कला-विलास’ च्या देहूरोड या नाटकात पंडितरावांनी काम केले. त्यातील ‘मी गातो नाचतो’ हे पंडितरावांचे गाणे खूपच गाजले.

    शेवटी १९७६ मध्ये रांगणेकरांच्या पिकली पाने या गद्य नाटकात त्यांनी भूमिका केली व ही त्यांची शेवटचीच भूमिका ठरली. लग्नाची बेडी, एकच प्याला मधल्या संगीत भुमिका ते शेवटपर्यंत करत होते. मी गातो नाचतो आनंदे.. अशी काही भावगीते पण त्यांनी गायली. व्ही. शांताराम यांच्या अमरभूपाळी या चित्रपटातील होनाजीच्या भूमिकेसाठी पंडितरावांनी न्याय दिला. त्या बोलपटात लता मंगेशकर आणि पंडितराव यांनी गायिलेली ‘घनःश्याम सुंदरा’ ही भूपाळी अविस्मरणीय ठरली. मधुर आवाज, मार्दवता, तल्लीनता आणि भावमधुरता हे त्यांच्या गायनातले उल्लेखनीय गुण होते. पंडितराव नगरकर यांचे २८ जुलै १९७७ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 26, 2017


  • हार्मोनिअम, ऑर्गन वादक आदित्य ओक

    हार्मोनिअम, ऑर्गन वादक आदित्य ओक यांचा जन्म २० डिसेंबर १९७७ रोजी झाला. आदित्य ओक हे वादन क्षेत्रातलं एक आघाडीचं नाव. हार्मोनिअम, ऑर्गन वादनात यांचा हातखंडा आहे. अनेक सिनेमांचं संगीत संयोजनही त्यांनी केलं आहे. खूप लहान वयात पं. गोविंदराव पटवर्धन या हार्मोनिअम वादन क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तीकडून शिकण्याचं भाग्य ओक यांना लाभलं. आदित्य ओक यांचे वडिल डॉ. विद्याधर ओक गोविंदरावांकडे शिकायचे. त्यांना शिकवायला दर शुक्रवारी ते घरी यायचे. वयाच्या दहाव्या वर्षांपासून पुढे आठ वर्षं आदित्य ओक यांना गोविंदरावांकडे प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळाली.

    पं. गोविंदराव पटवर्धन शिकवणीबद्दल आदित्य ओक म्हणतात,''बाबांच्या इच्छेमुळे मी पेटी शिकायला लागलो. वादनाच्या क्षेत्रातलं गुरुजींचं ज्ञान, त्यांची शैली, त्यांचा आवाका संपूर्ण जगाला माहितीये. पण शिक्षक म्हणूनही तितकेच श्रेष्ठ होते. त्यांनी मला शाळेत शिकवतात तसं पुस्तकी पध्दतीने कधी शिकवलंच नाही. ते स्वतः एखादी सुरावट पेटीवर वाजवून दाखवायचे. नाही समजली तर पुन्हा पुन्हा आपल्याला समजेपर्यंत वाजवून दाखवायचे. ती विशिष्ट सुरावटीची जागा त्यांच्यासारखी येईपर्यंत आपण वाजवायची. यामुळे एखादी जागा वाजवून बघायची सवय आपोआप लागली. पुन्हा पुन्हा वाजवायचा कधीतरी फारच कंटाळा यायचा, तेव्हा ते म्हणायचे - ''येईपर्यंत वाजव, म्हणजे कंटाळा निघून जाईल.'' यामुळे न कंटाळता रियाज करायची मला सवय लागली.

    माझं शिकण्यातलं कुतूहल कायम टिकून राहण्यात या सवयीचा भाग मोठा होता. एखादी सुरावट येईपर्यंत मला तिच्याविषयी कुतूहल वाटत राहायचं. बऱ्याचदा रात्री उशिरा ते संगीत नाटकाचा प्रयोग संपवून यायचे आणि त्यानंतर मला शिकवायचे. कधीकधी इतका उशीर व्हायचा की मला झोप अनावर होत असे. मी झोपायला जायचो तेव्हा त्याचं वादन सुरू असायचं. अपरात्री कधीतरी मला जाग यायची, तेव्हाही ते वाजवतच असायचे. त्यांना निद्रानाशाचा विकार होता. पण झोप येत नाही किंवा दमलोय म्हणून त्यांना नुसतंच रिकामं बसलेलं कधी पाहिल्याचं आठवत नाही. जेव्हा जेव्हा मला कंटाळा येतो, तेव्हा गुरुजींचं हेच रूप मी डोळयासमोर आणतो.''

    काही व्यक्तींनी हार्मोनिअमच्या क्षेत्रात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलंआणि त्या व्यक्तींचंच पुढे घराण तयार झालं, अशांपैकीच एक म्हणजे पं. गोविंदराव पटवर्धन आणि त्यांचे तिसऱ्या पिढीतले आपण वारसदार आहोत याचा अत्यंत अभिमान असल्याचं आदित्य ओक सांगतात. ''आपली शैली येणाऱ्या प्रत्येक पिढीकडे संक्रमित होत जाण्यातूनच पुढे घराणे तयार होतं. माझे बाबा डॉ. विद्याधर ओक, मी आणि आता माझी पुढची पिढी गोविंदराव पटवर्धन नावाच्या एका घराण्याचा वारसा पुढे नेत आहोत.''

    आदित्य ओक यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे, तसंच अनेक चित्रपटांचं संयोजनही केलं आहे. 'बालगंधर्व'सारख्या चित्रपटाचं संगीत संयोजन केले आहे. हार्मोनिअम हे या वाद्याचे मूळ नाव असले तरी भारतात बाजा आणि महाराष्ट्रात पेटी या नावाने ते ओळखले जाते. या वाद्यांची जन्मकथा आदित्य ओक 'जादूची पेटी हा कार्यक्रम अतिशय रंजक पणे सादर करतात.
    आज अनेक विद्यार्थी आदित्य यांच्याकडे शिकायला येतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 20, 2018


  • कर्मयोगी बी. व्ही. परमेश्वर राव

    आत्म निर्भर हा शब्द कोव्हीड साथीने आपल्यात रुजवला.पण ही संकल्पना ४०वर्षांपूर्वीच यांनी विशाखापट्टणम जिल्ह्यातील ५०हून अधिक खेडी आत्मनिर्भर करुन ही कल्पना वास्तवात येऊ शकते याचा भक्कम पुरावा दिला होता. अमेरिकेत संशोधन किंवा नोकरीची संधी सोडून मायभूमीत परतून देशसेवा करण्याचा पर्याय निवडल्याबाबत त्यांनी जराही खंत नव्हती. कारण त्यांचे ध्येय पक्के होते. दृष्टी ठाम होती, त्यामुळेच ते असामान्य होते.

      June 9, 2022


  • आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष

    आपल्या कॅमेर्यारने सिनेतारे-तारकांना ग्लॅमर मिळवून देणारे, कलाकारांना नवा चेहरा देणारे असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचा जन्म १६ सप्टेंबर १९५० रोजी झाला. व्यक्तिचित्रण प्रकारातल्या प्रकाशचित्रांसाठी ते विशेष नावाजले जात असत. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट झेविअर्स हायस्कूल आणि पदवी शिक्षण सेंट झेविअर्स महाविद्यायतून झाले होते. आपल्या मितभाषी स्वभावाने, मृदू वाणीने आणि व्यक्तीतील मित्रत्वाचा शोध घेणार्याच दृष्टीने त्यांनी केवळ सिनेजगतातीलच नव्हे तर समाजाच्या विविध प्रांगणातील व्यक्तींना आपल्या मित्रपरिवारात सामावून घेतले होते.

    गौतम राजाध्यक्ष यांना छायाचित्रणासह कलेच्या विविध प्रांतात आवड होती. इतिहास, पुरातत्त्वविद्या, छायाचित्रण, संगीत, इंग्रजी-मराठी साहित्य अशा गोष्टींत रस होता. ते बायो-केमिस्ट्रीतून पदवीधर झाले होते. महाविद्यालयीन काळात त्यांना याच विषयात त्यांना पीएच.डी. करायची होती. सेंट झेविअर महाविद्यालयात त्यांनी दोन वर्षे अध्यापनही केले. त्याच दरम्यान त्यांनी जाहिरात आणि जनसंपर्क या विषयाचा डिप्लोमा केला. त्याच्या प्रकल्पाच्या निमित्ताने १९७७मध्ये त्यांचा संबंध लिंटाजशी आला आणि त्यांना तिथेच नोकरीची संधी मिळाली. फोटोग्राफीेचे तंत्र ते लिंटाजमध्येच शिकले. या काळात त्यांनी लिंटाज इंडियामध्ये मानाच्या जागाही मिळविल्या होत्या. पुढे १९८० पासून १९८७ पर्यंत फॅशन फोटोग्राफर म्हणूनही काम पाहिले. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र काम केले.

    छायाचित्र काढताना ज्यांचे छायाचित्र काढायचे त्यांचे व्यक्तिमत्त्व त्या छायाचित्रात आणण्याचा त्यांचा कसोशीचा प्रयत्न असायचा. म्हणून त्यांची छायाचित्रे बोलकी असत. त्यांना लेखनाचाही चांगला हात होता. शोभा डे यांच्या ‘सेलेब्रिटी’ या मासिकातून त्यांनी लेखनाला सुरुवात केली. सेलेब्रिटींच्या मुलाखती घेताना तेच त्यांची छायाचित्रे काढत असत. त्यांनी ‘चंदेरी’ या पाक्षिकाचे काही काळ संपादनही केले होते. चंदेरीत असताना त्यांना कलाकारांच्या अंतरंगात डोकावते आले. १९९७ मध्ये त्यांचे ‘फेसेस’ हे छायाचित्रांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. यात त्यांनी दुर्गा खोटे, साधना समर्थपासून एैश्वार्या रायपर्यंतच्या ४५ भावमुद्रा टिपल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीच त्यांचे ‘चेहरे’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन लता मंगेशकर यांच्या हस्ते झाले होते. त्यांच्या छायाचित्रांची प्रदर्शनेही रसिकांच्या चांगल्याच स्मरणात आहेत.

    छायाचित्राबरोबरच स्टील फोटोग्राफीचे कामही त्यांच्याकडे आले. अनेक चित्रपटांची त्यांनी स्टील फोटोग्राफी केली आहे. शालीन, सुसंस्कृत, सुशील, सदा हसमुख आणि मदतीला सदैव तत्पर असलेल्या गौतम राजाध्यक्ष यांना ऑपेरा संगीताची फार आवड होती. या पाश्चारत्य संगीताबरोबरच भारतीय शास्त्रीय संगीताचा त्यांचा कानही उत्तम होता. लता मंगेशकर यांच्याशी ते बर्यासचदा शास्त्रीय संगीताविषयी चर्चा करीत असत. मंगेशकर कुटुंबियांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बालगंधर्वांच्या काळातील संगीताचेही ते शौकीन होते. कलेची सर्वच क्षेत्रे गौतम राजाध्यक्ष यांनी चांगल्या तर्हेाने हाताळली आहेत. मराठी साहित्याबद्दल त्यांना विशेष आसक्ती होती. त्यांनी ‘सखी’ या मराठी चित्रपटासह ‘बेखुदी’, ‘अंजाम’ या हिंदी चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या होत्या.

    गौतम राजाध्यक्ष यांचे १३ सप्टेंबर २०११ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      September 16, 2017


  • मराठी अभिनेते आनंद अभ्यंकर

    आनंद अभ्यंकर यांचे शालेय शिक्षण नागपूरच्या सरस्वती हायस्कूलमध्ये झाले. शाळा, महाविद्यालयात किंवा गणेशोत्सवात नाटक बसवून त्या माध्यमातून अभ्यंकर यांनी छोट्या-छोट्या नाटकांमधून मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले. त्यांचा जन्म २ जून १९६३ रोजी झाला. त्यांची रंगभूमीच्या क्षेत्रातील खरी कारकीर्द पुण्याला सुरू झाली. गरवारे महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी व्यवस्थापन शास्त्राचेही शिक्षण घेतले. बजाज ऑटोमध्ये काही काळ त्यांनी नोकरी केली. मुंबईत आल्यावर उमेदवारीच्या काळात मोहन जोशी यांच्या साथीने त्यांनी कामासाठी संघर्ष केला.

    शिक्षण आणि नोकरीच्या काळात त्यांनी काही नाट्य संस्थांसाठी काम करण्यास सुरुवात केली. ‘कुर्यात सदा टिंगलम्’द्वारे त्यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर भक्ती बर्वे यांच्याबरोबर ‘आई रिटायर होतेय’, आनंद म्हसवेकर लिखित-दिग्दर्शित ‘चॉइस इज युवर्स’ अशा नाटकांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या. ‘वादळवाट’, ‘असंभव’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘फू बाई फू’, ‘मला सासू हवी’, ‘शुभंकरोती’, ‘या गोजिरवाण्या घरात’ आणि सह्याद्री वाहिनीवरील गोंदवलेकर महाराजांच्या मालिकेच्या माध्यमातून अभ्यंकर घराघरात पोहोचले. तर ‘वास्तव’, ‘जिस देश में गंगा रहता हैं’, ‘अकलेचे कांदे’, तेरा मेरा साथ रहें, ‘मातीच्या चुली’, ‘चेकमेट’, ‘कुंकू लावते माहेरचं’, ‘ही पोरगी कोणाची’, ‘पप्पू कांट डान्स साला’, ‘आनंदाचे झाड’, ‘आयडियाची कल्पना’, ‘जन्म’, ‘बालगंधर्व’ ,‘स्पंदन’ अशा चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या. आनंद अभ्यंकर यांचे २३ डिसेंबर २०१२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      December 23, 2018


  • मॉडेल, अभिनेत्री, व भाजपच्या एक मातब्बर नेत्या स्मृती इराणी

    स्मृती इराणी याचे माहेरचे नाव स्मृती मल्होत्रा. स्मृती या तीन बहिणींपैकी सर्वात मोठ्या आहेत. दहावीच्या वर्गात असल्यापासूनच त्यांनी काम करायला सुरवात केली. एक ब्यूटी प्रॉडक्टच्या प्रचारासाठी त्यांना दिवसाला २०० रूपये मिळत असत. माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली होती. अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी मा.स्मृती इराणी दिल्लीतून मायानगरी मुंबईत आल्या. त्यांचे पूर्ण बालपण दिल्लीतच गेले. मा.स्मृती इराणी यांनी छोट्या पडद्यावरची अभिनेत्री म्हणून आपल्या कामाला सुरवात केली. त्यानंतर संपूर्ण देशात त्या तुलसी विरानी या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. छोड्या पडद्यावर स्वताची वेगळी छाप पाडणाऱ्या अभिनेत्रींमध्ये त्या आघाडीवर होत्या. १९९८ मध्ये मिस इंडियाचा मुकुट मिळवण्यासाठी मा.स्मृती इराणी यांनी खूप प्रयत्न केले. मात्र त्यांना तो मिळाला नाही. पहिल्या पाचमध्येच त्यांना समाधान मानावं लागलं. मा.स्मृती इराणी यांनी या मिस इंडियाच्या स्पर्धेसाठी आपल्या आईकडून काही रक्कम घेतली होती. ती रक्कम परत करण्यासाठी इराणी यांनी नोकरीसाठी शोधा-शोध सुरू केली. जेट एअरवेज मध्ये त्यांनी फ्लाईट अटेडेंट पदासाठी अर्जही दाखल केला होता. मात्र त्यात त्यांना अपयश आले. अनेक ऑडीशनसाठी मध्येही त्यांना रिजेक्ट करण्यात आले. सुरवातीला मॅकडोनाल्ड मध्ये काम करणाऱ्या मा.स्मृती इराणी यांनी प्रसिध्दीचा दरवाजा खटखटवला जरूर, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. मल्टीनॅशनल कंपनीच्या नियमानुसार मॅकडोनाल्ड सारख्या कंपनीतील कामगारांना हॉटेलचे अकाऊंट सांभाळण्यापासून ते टेबल किंवा फरशी पुसण्यापर्यंत सर्व कामं करावी लागतात. ही सर्व कामं त्यांनी केली. एकता कपूरच्य़ा ओह ला ला ला शोमधील एका भागात निलम कोठारीच्या ऎवजी त्यांना काम करण्याची संधी मिळाली.

    क्योंकी सास भी कभी बहू थी या सिरीयलमध्ये काम करण्यापूर्वी स्मृती इराणी यांनी आतिश आणि हम है कल आज और कल या सिरीयलमध्ये काम केले होते. मात्र त्यांची खरी ओळख झाली ती तुलसी विरानी या भूमेकेतून. बघता बघता सिरीयलच्या माध्यमातून ती छोट्या पडद्यावरची सर्वात लाडकी बहू बनली. छोट्या पडद्यावरील सर्वात शांत सून म्हणून ओळखली जाणारी तुलसी प्रत्य़क्ष आयुष्यात मात्र वेगळ्या आहेत. आपल्या विरोधकांवर तिखट टीका करताना स्मृती इराणी यांना अनेकांनी पाहिलं आहे. त्यांनी २००३ साली राजकारणात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या भाजपच्या स्टार प्रचारक बनल्या. २००४ साली काँग्रेसचे नेते मा.कपील सिब्बल यांच्या विरोधात स्मृती यांनी निवडणूक लढवली होती. मा.स्मृती इराणी यांना त्यात अपयश आले होते. २०१० मध्ये भाजपाच्या राष्ट्रीय सचिव, ऑल इंडिया भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून त्यांची निवड झाली. २०११ मध्ये गुजरातमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवडून गेल्या. त्यांच्य़ा याच स्वभावामुळे लोकसभा निवडणूकीत भाजपने त्यांना राहूल गांधींच्या विरोधात अमेठीतून उभे केले. त्यात स्मृती इराणी यांना अपयश आले मात्र राहूल गांधींना त्यांनी कडवी टक्कर दिली.मा. मोदी सरकार मध्ये स्मृती इराणी या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री होत्या. सध्या स्मृती इराणी या सध्या केंद्रीय टेक्सटाईल मंत्री आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    स्मृती इराणी यांच्या भूमिका असलेल्या दूरचित्रवाणी मालिका
    आतिश, क्यूँ की सास भी कभी बहू थी, थोड़ी सी ज़मीन थोड़ा सा आसमाँ, रामायण, विरुद्ध, हम हैं कल, आजकल और कल

      March 24, 2017