जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
श्री विद्याधर अनास्कर व्यवसायाने कर सल्लागार आहेत. ते सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक तज्ज्ञ अभ्यासक आहेत.
October 29, 2012
त्यांचं ‘मातीची चूल’ हे आत्मचरित्रही स्पष्ट आणि रोखठोक विवेचनामुळे चर्चिलं गेलं. लहान मुलांसाठी त्यांनी ‘इसापनीती’ आणि ‘हितोपदेश’सारखी पुस्तकं लिहिली. ‘नरेंद्र : रुक्मिणी स्वयंवर’ हे नाटकही त्यांच्या नावावर आहे.
July 5, 2022
त्यांनी ‘आयबीएन लोकमत’ या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. कोकणासह राज्य, देशातीलही अनेक धांडसी विषयांचे कव्हरेज दिनेश केळुसकर यांनी केले आहे.
June 30, 2022
सुरेश खरे हे महाराष्ट्राला नाटककार म्हणून परिचित असले तरी ते एक बहुपेडी व्यक्तिमत्त्व आहे. अभिनेता, दिग्दर्शक, चित्रपट लेखक, समीक्षक, संवादक, सूत्रसंचालक, संस्थाचालक असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आहेत. परफॉर्मिग आर्ट्सशी संबंधित जवळजवळ सगळे प्रकार त्यांनी हाताळले आहेत.
सुरेश खरे यांचा जन्म २५ जानेवारी १९३८ रोजी झाला. १९६० साली सुरेश खरे यांनी मित्रांच्या साहाय्याने ’ललित कला साधना’नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेच्या द्वारे त्यांनी रंगमंचावर अनेक नाटके सादर केली. जेव्हा नाटके मिळेनाशी झाली तेव्हा स्वत:च ’सागर माझा प्राण’ हे नाटक लिहिले आणि त्यांच्यातल्या नाटककाराचा जन्म झाला.
सुरेश खरे हे मुंबईच्या सिद्धार्थ लॉ कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी एकांकिकांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली. सुरेश खरे लिखित ’काचेचा चंद्र’मुळे डॉ. श्रीराम लागू आणि ’मला उत्तर हवंय’ या नाटकामुळे विजया मेहता, या अभिनेत्यांचा व्यावसायिक रंगभूमीवरचा प्रवास यशस्वीरीत्या सुरू झाला.
दूरदर्शनवर गाजलेला ’नाट्यावलोकन’ नावाचा नाट्यास्वादाचा कार्यक्रम सुरेश खरे यांनी घेतलेल्या मुलाखतींमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला होता. दूरदर्शनवरच ’गजरा’” नावाच्या कार्यक्रमात सुरेश खरे यांनी लिहिलेल्या नाटुकल्या सादर होत असत.
सुरेश खरे यांना १९९९ साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुंबई शाखेकडून नाट्यलेखनासाठीचा राम गणेश गडकरी यांच्या नावाचा गडकरी पुरस्कार मिळाला आहे. सुरेश खरे हे २००५ साली भरलेल्या ८५व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
मा.सुरेश खरे यांची वेबसाईट.
http://www.sureshkhare.com/biography_m.php
January 27, 2017
ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना “सिंहासन” कादंबरीसाठी सुचलेली दिघू टिपणीसांची व्यक्तीरेखा ही रणदिवेंवरुनच सुचल्याचं अनेकजण अगदी ठामपणे सांगतात. दिनू रणदिवे यांच्या व्यक्तीमत्त्वानं प्रेरित होऊन अनेक ज्येष्ठ पत्रकार त्यांच्याविषयी आदरानं बोलतात व त्यांचे विचार व कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचवताना दिसतात.
June 18, 2013
जेमिनी गणेशन यांनी १९५७ साली ‘मिस मेरी’ या सिनेमाद्वारे बॉलिवूड डेब्यू केले होते. त्यांची या सिनेमात मीना कुमारीसोबत जोडी होती आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला होता.
March 22, 2022
विश्वजनाथ वामन बापट ऊर्फ वसंत बापट तरुण वयातच भारताच्या स्वांतत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. त्यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी झाला.
१९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांचा सहभाग होता.
ऑगस्ट १९४३ पासून जानेवारी १९४५ पर्यंत ते तुरुंगात होते. तुरुंगातून सुटल्यावर मा.वसंत बापट 'नॅशनल कॉलेज (वांद्रे) आणि 'रामनारायण रुईया कॉलेज' ह्या मुंबईतील महाविद्यालयांत मराठी व संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक झाले. लहानपणापासून बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार झाले. शेवटपर्यंत ते राष्ट्रसेवा दलाशी संलग्नद होते.
'बिजली' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. 'अकरावी दिशा', 'सकीना' आणि 'मानसी' हे त्यांचे ’बिजली’नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहिल्या. वसंत बापट १९८३ ते १९८८ या काळात साधना नियतकालिकाचे संपादक होते. पौराणिक व ऐतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्यनाट्येही प्रभावी ठरली. ’केवळ माझा सह्यकडा' ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली. 'गगन सदन तेजोमय' सारखे अप्रतिम प्रार्थना गीत त्यांनी लिहिले.
कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपाने मराठीत आणली. त्यांची ’सकीना’ उर्दूचा खास लहेजा घेऊन प्रकटली आणि, ’तुला न ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा, कसा सकीना यकीन यावा कमाल त्यांच्या किमयेचा’ सांगून गेली. १९९९ मध्ये मुंबई येथे झालेल्या ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. युगोस्लोव्हियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणूनही ते सहभागी झाले.
चंगा मंगा, अबडक तबडक, आम्ही गरगर गिरकी, फिरकी, फुलराणीच्या कविता आणि परीच्या राज्यात हे त्यांचे बालकवितासंग्रह आहेत, तर बालगोविंद हे बालनाट्य त्यांनी लिहिले. वसंत बापट यांचे १७ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
July 29, 2017
स्टीव्ह बकनर हे वेस्ट इंडीज अनुभवी पंच. स्टीव्ह बकनर यांनी डिकी बर्ड यांचा विक्रम २००२ मध्ये मागे टाकून २००५ मध्ये कसोटीत १०० सामन्यात पंचगिरी करणारे ते पहिले पंच ठरले होते. बकनर यांनी १९९२, १९९६, १९९९, २००३ व २००७ च्या वर्ल्ड कप फाइनल मध्ये अम्पायरिंग केले होते. हे एक रेकॉर्ड आहे.
May 31, 2022
पूर्ण नाव गोविंद परशुराम नगरकर; परंतु पंडितराव याच नावाने प्रसिद्ध. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१० रोजी झाला. लहानपणापासूनच पंडितरावांचा गायनाकडे कल होता. सुप्रसिद्ध गायक-नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे प्रथम आणि नंतर पुणे येथील भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला. मित्रमंडळीच्या आणि चाहत्यांच्या वर्तुळात पंडितरावांनी गायिलेल्या गीतांचा बोलबाला झाल्यामुळे ओडियन कंपनीने त्यांच्या काही गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्यांपैकी ‘जा के मथुरा’, ‘बोल हसरे बोल प्यारे’, ‘रामरंगी रंगले मन’ इ. गीतांच्या ध्वनिमुद्रिका बऱ्याच लोकप्रिय झाल्या.
आकाशवाणीच्या मुंबई केंद्राशी त्यांचा संबंध सुरुवातीपासून होता. हरिभाऊ शुक्ल यांच्या मंगला नाटकात काम करून पंडितरावांनी नाट्यसृष्टीत प्रवेश केला. पुढे सुलोचना पालकर हिच्या सहकार्याने पंडितरावांनी १९३४ साली ‘सुलोचना संगीत मंडळी’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली व १९३७ पर्यंत कंपनीच्या नाट्यप्रयोगांत नायकाच्या भूमिका केल्या. संशयकल्लोळ तसेच खाडिलकर यांचे संगीत त्रिदंडी-संन्यास ही नाटके ‘सुलोचना संगीत मंडळी’ करीत असे. त्यांशिवाय मृच्छकटिक, मानापमान, सौभद्र, लग्नाची बेडी, ना. सी. फडक्यांचे संजीवन इ. नाटकेही या संस्थेने रंगमंचावर आणली होती. १९३७ मध्ये कंपनी बंद पडली. नंतर दामुअण्णा जोशी यांच्या ‘कला-विलास’ च्या देहूरोड या नाटकात पंडितरावांनी काम केले. त्यातील ‘मी गातो नाचतो’ हे पंडितरावांचे गाणे खूपच गाजले.
शेवटी १९७६ मध्ये रांगणेकरांच्या पिकली पाने या गद्य नाटकात त्यांनी भूमिका केली व ही त्यांची शेवटचीच भूमिका ठरली. लग्नाची बेडी, एकच प्याला मधल्या संगीत भुमिका ते शेवटपर्यंत करत होते. मी गातो नाचतो आनंदे.. अशी काही भावगीते पण त्यांनी गायली. व्ही. शांताराम यांच्या अमरभूपाळी या चित्रपटातील होनाजीच्या भूमिकेसाठी पंडितरावांनी न्याय दिला. त्या बोलपटात लता मंगेशकर आणि पंडितराव यांनी गायिलेली ‘घनःश्याम सुंदरा’ ही भूपाळी अविस्मरणीय ठरली. मधुर आवाज, मार्दवता, तल्लीनता आणि भावमधुरता हे त्यांच्या गायनातले उल्लेखनीय गुण होते. पंडितराव नगरकर यांचे २८ जुलै १९७७ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 26, 2017
मारुतीराव कीर यांनी आपले करियर तबला वादक म्हणून सुरू केले. त्यांचे गुरु होते भानुदास मानकामे, भैरव प्रसाद, सुंदर प्रसाद आणि उस्ताद गेमखान साहब होते. मारुती राव कीर यांनी शंकर जयकिशन यांच्या व्यतिरिक्त जवळजवळ सर्व संगीत दिग्दर्शकांच्या बरोबर काम केले. जवळजवळ सर्व जुन्या मराठी चित्रपटांमधून आणि नॉन-फिल्मच्या गाण्यांमध्ये मारुती राव कीर यांनी तबला वाजवला आहे. मारुती राव कीर यांनी आधी एस.डी बर्मन यांच्या साठी आणि नंतर आर.डी बर्मन यांच्या साठी शेवटपर्यत रिदम असिस्टट म्हणून काम केले.
तबलावरील त्यांची निपुणता "पिया तोसे नैना लेगे रे" या गाण्यात दिसते. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या काळात मारुतीराव आणि पंचम यांची मैत्री झाली व ती शेवट पर्यत टिकली. पंचमच्या यांच्या पहिल्या चित्रपट "छोटे नवाब" पासून मारुतीराव कीर रिदम ऍरेंजर व जवळचा मित्र म्हणूनच राहिले. पंचम यांचे इतर सर्व संगीत दिग्दर्शकांमध्ये सर्वात जास्त फॅन आहेत. यासाठी मारुतीराव कीर यांना हे क्रेडीट द्यावे लागेल. पंचम आणि मारुतीराव कीर हे नेहमी रीद्मच्या काहीतरी नवीन शोधात असत, नवीन इन्स्ट्रुमेंटची ओळख करून घेत असत, मारुतीराव कीर यांनी पंचम यांना एकदा टुम्बा या वादयाची कथा सांगितली, जेव्हा पंचम आणि मारुतीराव कीर त्यांच्या ग्रुपसह आफ्रिकेत शो साठी गेले होते. तेथे त्यांनी टुम्बा नावाचे हे आफ्रिकन वाद्य पाहिले.
पंचम यांनी मारुतीराव कीर यांना ते वाद्य कसे वाजते हे दाखवण्यास सांगितले मारुतीराव कीर उभे राहिले व सराईत वादकासारखे टुम्बा वाजवून दाखविले, ही खरोखरीच कमाल होती. पंचम यांनीच टुम्बा याला भारतात आणले, व भारतात वाजवण्याचा पहिला मान मारुतीराव कीर यांना जातो. मारुतीराव कीर यांनी टुम्बाचा पहिल्यादा मनोरंजन चित्रपटात "आया हु मै तुझे ले जानुगा" या गाण्याच्या साठी वापर केला. या चित्रपटाचे दिग्दर्शक शम्मी कपूर होते. अनेक दशके त्यांनी रिदम ऍरेंजर म्हणून हिंदी चित्रपटसृष्टी गाजविली. लतादिदी, आशा भोसले यांच्या अनेक गीतांचा रिदम मारूती कीरांनी ऍरेंज केला.
मारुतीराव कीर हे एवढे मोठी व्यक्ती असून शेवट पर्यत साधे राहिले. दादरमधील आपल्या १० × १२ च्या रूम मध्ये ते राहत. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले. त्यांचा पहिला विद्यार्थी अमृतराव काटकर होते. मारुतीराव कीर यांच्या मुळे पंचम यांचे बहुसंख्य तालवादक अण्णा जोशी, अमृतराव, मान्या बर्वे, नाईक,असे मराठी माणसेच होती.
मारुतीराव कीर व पंचम यांची एवढी मैत्री होती की पंचम यांच्या निधना नंतर त्यांनी रेकॉर्डिंग बंद केले होते. मारुतीराव कीर यांचे निधन ११ जानेवारी २००५ रोजी झाले.
मारुतीराव कीर यांच्या स्मरणार्थ दर वर्षी हिंदी गीते, ढोलकी जुगलबंदी, सोलो वादनाची संगीत मैफील 'स्मृतिगंध' म्हणून रत्नागिरीत आयोजित केली जाते.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
https://youtu.be/DtwRUINTDaY
January 11, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti