जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
६० आणि ७० च्या दशकांत आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या बळावर आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी अभिनेत्री माला सिन्हा यांचा आव्हानात्मक, वैविध्यपुर्ण व चाकोरीबाह्य भुमिका स्वीकारण्याकडे नेहमी कल होता. अभिनेता, दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या प्यासा या चित्रपटात अभिनय करण्याची त्यांना संधी मिळाली. प्रियकाराला नाकारुन एका श्रीमंत व्यक्तीशी लग्न करणार्या तरुणीच्या या भुमिकेसाठी आधी मधुबालाचे नांव गृहित धरण्यात येत होते. माला सिन्हाने या भुमिकेला योग्य तो न्याय दिला व हा चित्रपटच तिच्या कारकिर्दीत एक मैलाचा दगड ठरला.
May 13, 2019
साठच्या दशकात उदयास आलेल्या लेखक, विवेचनकार आणि अनुवादकारांच्या पिढीतील चतुरस्र व्यक्तिमत्त्व म्हणून प्रा. बाळकृष्ण ऊर्फ सदा कऱ्हाडे यांचे नाव प्रकर्षांने घ्यावे लागेल. मराठी साहित्याबरोबरच इंग्रजी, हिंदी, फ्रेंच, संस्कृत, कन्नड, उर्दू, रशियन भाषांचे जाणकार म्हणून सदा कऱ्हाडे परिचित होते. मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत विषयांमध्ये एम.ए. पदवी प्राप्त केल्यानंतर विलेपार्लेच्या साठय़े महाविद्यालयात मराठीचे अध्यापन त्यांनी केले.
साडेचार दशकांच्या प्रदीर्घ अध्यापनादरम्यान सदा कऱ्हाडे यांचे चौफेर लेखन सुरूच राहिले. एक नोकरपेशा प्राध्यापक म्हणून काम करण्याचा त्यांचा पिंड नव्हता. मराठीच्या प्रसाराबरोबरच अन्य विदेशी भाषांमधील कसदार साहित्यकृती मराठी मनाला वाचता आल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळेच असंख्य वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करताना त्यांनी भाषिक समन्वयाचा एक व्यापक दृष्टिकोन सातत्याने बाळगला.
मायबोलीवर प्रभुत्व असलेल्या प्रा. सदा कऱ्हाडे यांनी फ्रेंच, रशियन आणि उर्दू भाषाही तेवढय़ाच आत्मीयतेने आत्मसात केली. विशेषत: भारताच्या रशियाशी असलेल्या सांस्कृतिक संबंधांवर त्यांनी टाकलेला प्रकाश अभ्यासपूर्ण ठरला. अनुवादित ग्रंथांच्या लेखनात त्यांचा हातखंडा होता. मार्क्सवाद, बुद्धवाद, आंबेडकरवाद, अण्णाभाऊ साठे यांचे वाङ्मयीन योगदान यावर विवेचनात्मक विविधांगी लेखन करणाऱ्या सदा कऱ्हाडेंनी समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरही विशेष ग्रंथलेखन करून अष्टपैलुत्व सिद्ध केले. त्यांच्या साहित्यसंपदेतील ‘गावकुसाबाहेरची वस्ती’, ‘सुरवंट’, ‘सहा डिसेंबर १९९२’ या कादंबऱ्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
धुळे १९९० साली झालेल्या सोळाव्या अस्मितादर्श मेळाव्याचे अध्यक्षपद, १९९३ साली ‘दलित-कलम’ या साहित्य अधिवेशनाचे अध्यक्षपद, सोलापूर येथे झालेल्या चौथ्या कामगार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि अमरावतीत १९९५ साली झालेल्या जनसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.
## Prof Balkrishna alias Sada Karhade
July 24, 2016
मराठी चित्रपट संगीत लोकप्रिय करण्यात ज्या मोजक्या संगीतकारांचे कर्तृत्व कारणीभूत ठरले त्यात राम कदम यांचे स्थान वरचे आहे. त्यांचा जन्म २८ ऑगस्ट १९१६ रोजी मिरज येथे झाला. राम कदम यांच्या घरात कलेचं काहीही वातावरण नव्हतं, परिस्थिती यथातथाच, शाळेतील अभ्यासातही लक्ष नव्हते. त्यांना लहानपणापासून वाद्यांबाबत फार आकर्षण होतं यामुळे राम कदम यांच लक्ष कायम बॅंन्डपथकाकडे जायचं. इथेच ते क्लॅरोनेट वाजवायला शिकले. पुढे पथकात वाजवू लागले. प्रभात चित्र संस्थेचे छायाचित्रकार ई.महमद मूळचे मिरजेचेच. त्यांनीच राम कदम यांना पुण्याला बोलावून घेतलं. वयाच्या २२ व्या वर्षी राम कदम प्रभातमध्ये दाखल झाले ऑफिसबॉय म्हणून!
पगार महिना ७ रुपयेप्रमाणे सेवा सुरू झाली. शांतारामबापूंची खोली झाडताना राम कदम यांना कमीपणा कधीच वाटला नाही. उलट एवढय़ा प्रतिभासंपन्न व्यक्तीची सेवा करण्याची संधी मिळतेय याचा आनंद झाला. हळूहळू प्रभातच्या संगीत विभागात त्यांचा प्रवेश झाला आणि मान्यवर संगीतकाराचा त्यांना सहवास लाभला. प्रभात चित्र संस्था आदर्श विचार मूल्यांवर चालणारी होती त्यामुळे इथे जे घडत असे ते पवित्र, सर्वोत्कृष्ट आणि चिरंतन टिकणारे असायचे. राम कदमांच्या आयुष्यातील ही १० वर्षे त्यांच्यातील कलावंताला घडवणारी होती. इथेच त्यांना पु. ल. देशपांडे, देव आनंद, गुरुदत्त यांचा सहवास लाभला, पण स्वातंत्र्यानंतर प्रभातचाही उतरणीचा कालखंड सुरू झाला. राम कदम प्रभातमधून बाहेर पडल्यावर त्यांना कोल्हापूरहून भालजी पेंढारकर यांनी बोलावले.
गांधीहत्येनंतर भालजींचा जयप्रभा स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला व त्यावेळी ‘मीठ भाकर’ या चित्रपटाची प्रिंटही भस्मसात झाली. भालजी यांनी तो सिनेमा परत बनवला. त्याचं संगीत राम कदम यांचं होतं! (पण पूर्वीच्या शर्थीनुसार संगीतकार म्हणून कशाळकर यांचेच नाव श्रेयनामावलीत राहिलं!) रामभाऊ नाराज झाले, पण लवकरच त्यांना ‘गावगुंड’ हा सिनेमा स्वरबद्ध करायला मिळाला. पण सुरुवातीची १० वर्षे कदमांची परीक्षा पाहणारी ठरली. यश कायमच हुलकावणी देत होतं. नशिबाचे फासे कायमच उलटे पडत होते. सुधीर फडके, वसंत पवार यांच्याकडे सहायकाचं काम चालूच होतं. १९५९ सालच्या अनंत मानेच्या ‘सांगते ऐका’तील ‘बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला’ ही फक्कड लावणी रामभाऊ कदम यांनी स्वरबद्ध केली होती. पण ही कामगिरी सहाय्यकाच्या रूपातली असल्याने रसिकांना उशिरा लक्षात आली.
‘पिंजरा’, ‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘झुंज’, ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’, ‘पाहुणी’, ‘सुशिला’, ‘पारध’, ‘गड जेजुरी जेजुरी’ अशा कित्येक संगीतमय चित्रपटांची देणगी मराठीला मिळाली ती केवळ राम कदम यांच्यामुळे. त्यांच्या संगीतामुळे अनेक चित्रपट तरले, विक्रमी ठरले. मराठी लावणीचे लावण्या खुलवून राम कदम यांनी तिला एका उंचीवर नेऊन ठेवलं. मायबाप रसिकांनी दिलेली 'लावणी सम्राट' ही बिरुदावली अभिमानाने मिरवली. कलाकाराला आयुष्यात किमान एक संधी अशी मिळते की जिचे तो सोने करुन जातो. राम कदम यांनी जवळपास १२० मराठी चित्रपटाना संगीत दिले. यात त्यांनी तब्बल ११४ गायकांना संधी दिली. यात लता मंगेशकर, आशा, उषा, मोहम्मद रफी, पं.भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, शोभा गुर्टू , मन्ना डे आदी मान्यवरांचा सहभाग आहे.
बाजीराव मस्तानीच्या पिंगा गाण्याबाबत पानीपतकार विश्वास पाटील यांनी या गाण्याबाबत एक नवा मुद्दा समोर आणला होता. तो म्हणजे, मुळात 'पिंगा ग पोरी पिंगा...' याची चाल प्रसिद्ध मराठी संगीतकार राम कदम यांनी बांधली आहे. पिंगा.. ही चाल मूळ मराठी संगीतकार राम कदम यांनी बांधलेली असून त्यांनी संगीतबद्ध केलल्या तीन चित्रपटांतील गाण्यांत त्यांनी ही चाल वापरली असल्याचे विश्वास पाटील म्हणाले. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९६२ सालचा अनंत माने दिग्दर्शित भाग्यलक्ष्मी, १९७५ सालचा व्ही शांताराम प्रोडक्शनचा चंदनाची चोळी अंग अंग जाळी आणि १९७६ साली अनंत माने दिग्दर्शित पाहुणी या चित्रपटांतील गाण्यांत राम कदमांनी ही चाल वापरली होती.
श्री.मधु पोतदार यांनी ‘संगीतबद्ध राम कदम’ या नावाने मा.राम कदम यांचे पुस्तक लिहिले आहे. या संगीतकाराच्या संपूर्ण कारकीर्दीचा तपशीलवार आढावा त्यात घेतला आहे. मा.राम कदम यांचे १९ फेब्रुवारी १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
August 28, 2017
बादशाह पाचवे जॉर्ज हिंदुस्थान भेटीस ५ डिंसेबर १९११ रोजी आले, त्या वेळी त्यांच्यासाठी एलिफंटा (घारापुरी) बेटाची मार्गदर्शिका देवदत्तांनी तयार केली. अखंड शिळेतून एकसंघ कोरुन काढलेल्या त्रिमुर्ति-मंदिराचे वैशिष्ट्य तीत स्पष्ट केले आहे. देवदत्तांचे अत्यंत महत्त्वाचे संशोधन म्हणजे विदिशा जवळील बीसनगर येथील उत्खनन आणि त्यात सापडलेला ‘खाम् बाबा पिलर’ हा गोलाकार स्तंभ. ग्रीक राजदूत हीलिओडोरस याने आपल्या वासुदेवभक्तीचे आदरचिन्ह म्हणून हा स्तंभ उभारला. तो दोन पोलादी पट्टयांवर उभा आहे. आजूबाजूचे बांधकाम पक्क्या विटांचे, चुनखडीच्या गिलाव्याचे आहे.
May 30, 2022
सावळारामांनी जवळजवळ सातशे-आठशे गीते लिहिली. त्यांपैकी पाचशे-सहाशे रेकॉर्डवर आली. पी. सावळाराम यांना ‘जनकवी’ ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमके काय अभिप्रेत होते, हे त्यांनी पुढील शब्दांमध्ये व्यक्त केले आहे.. ‘ पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरांपर्यंतही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरीबांच्या ओटी-ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत. ग्रामीण भागातील झोपडय़ांत आणि चावडी-चव्हाटय़ावरही त्यांचे स्वागत झाले आहे.
July 4, 2021
वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाने जगभर प्रसिद्ध झालेल्या डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचा जन्म ५ डिसेंबर १९४३ रोजी झाला.
प्रा.डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी एम. ए.,पीएच.डी., मास्टर ऑफ ड्रॅमॅटिक्स या पदव्या प्राप्त केल्या होत्या. १९६६ ते १९६८ या कालावधीत मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तर १९६८ ते १९८० स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. २३ नाटय़महोत्सवाचे आयोजन, २०० पेक्षा अधिक नाट्यकथांची निर्मिती करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर दोन चित्रपटांत भूमिका, अशी त्यांची नाट्य-चित्रपट कारकीर्द होती.
‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगामुळे डॉ. देशपांडे यांचा प्रेक्षक-श्रोता जगभर होता. एकूण ५२ पात्रांचे विविध आवाज आणि कमीतकमी प्रभावी हालचाली हे या एकपात्री प्रयोगाचे खास वैशिष्टय़ होते. मराठवाडय़ाच्या ग्रामीण जीवन शैलीशी एकरूप असलेले आणि अस्सल व्यक्तिरेखा असणारा हा प्रयोग केवळ मराठवाडय़ातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि विविध देशांतील मराठी नाटय़रसिकांना भावला. ‘गीनिज बुक’मध्ये तब्बल दोन वेळा नोंद घेण्यात आलेले लक्ष्मण देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. ‘वऱ्हाड’चे लेखन, दिग्दर्शन आणि कलावंत या सगळ्या भूमिका डॉ. देशपांडे यांच्याच होत्या. तीन छोटे दिवे, तीन माईक आणि पंचा इतके छोटे साहित्य वापरून ५२ व्यक्तिरेखा उभ्या करणाऱ्या ‘वऱ्हाड निघालंय लंडन’ची सुरुवात १९८० मध्ये झाली.
डॉ. देशपांडे यांनी 'वऱ्हाड' लंडन, अमेरिका, कॅनडा, दुबई, मस्कत, ऑस्टेलिया, नायजेरिया, नैरोबी, कतार, कुवेत, थायलंड, सिंगापूर या देशांतही पोहोचवले. 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'ने त्यांच्या या कार्याचा १९९६ मध्ये प्रथमत: गौरव केला. आजपर्यंत या एकपात्री प्रयोगाचे ३ हजारांपेक्षा अधिक प्रयोग झाले होते. डॉ. देशपांडे यांनी डॉ. अनुया दळवी यांच्याबरोबर द्विपात्री 'नटसम्राट'चे शंभरावर प्रयोग केले. त्यांनी दोन चित्रपटांतही काम केले.
स्वेच्छानिवृत्तीनंतर ते परभणीच्या अ. भा. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले. नाटकाच्या मिळकतीतून बरीचशी रक्कम त्यांनी नगिर्स कॅन्सर हॉस्पिटल (बाशीर्), अंधशाळा नाशिक आणि इतर ठिकाणी दिली. २००३ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाने सन्मानित केले तर २००४ ला त्यांना विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान करण्यात आला. या शिवाय अनेक मान्यताप्राप्त पुरस्कार त्यांना देण्यात आले. प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे २२ फेब्रुवारी २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 8, 2019
मणिरत्नम हे चित्रपट सृष्टीत येण्या आधी कंसल्टंट होते. मणिरत्नम यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट १९८३ साली कानडी चित्रपट ‘पल्लवी अनु पल्लवी’. त्यांचा जन्म २ जून १९५५ रोजी झाला. या चित्रपटाला कर्नाटक सरकार ने मणिरत्नम यांना ‘बेस्ट स्क्रीनप्ले अवॉर्ड’ दिले. मा.मणिरत्नम यांना १९८६ साली आलेल्या तमिळ चित्रपट ‘मोउना रागम’ ने तमिळ चित्रपट सृष्टीत ओळख दिली. या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळाले. मणिरत्नम यांनी १९९२ मध्ये ‘रोजा’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाद्वारे त्यांनी ए आर रहमान यांना संगीतकार बनण्याची संधी दिली. हा चित्रपट सुपरहिट झाला. मणिरत्नम यांनी ‘दिल से’ या चित्रपटाद्वारे बॉलीवुड मध्ये आले. या नंतर २००२ मध्ये ‘साथिया’ चित्रपट निर्माण केला. याची कथा मणिरत्नम यांचीच होती. ‘साथिया’ हा मणिरत्नम यांच्या ‘अलायपयुथे’चा अधिकृत रिमेक होता. मणि रत्नम २००४ मध्ये फिल्म ‘युवा’ चे दिग्दर्शन केले. मा.मणिरत्नम यांना बॉलीवूडमध्ये ‘मणी’ सर म्हणून आदराने संबोधले जाते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
June 3, 2017
क्षणभर उघड नयन देवा — तुझा नि माझा एक पणा — निघाले आज तिकडच्या घरी — झुलवू नको हिंदोळा — अश्या अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या जेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच.
July 15, 2022
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींशी विचार विनिमय करून श्यामा प्रसादांनी २१ ऑक्टोबर १९५१ रोजी भारतीय जनसंघाची स्थापना केली. १९५२च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांत जनसंघाने तीन जागा जिंकल्या. जन्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यास त्यांचा ठाम विरोध होता.
July 6, 2021
हायकोर्टात प्रॅक्टीस करत असताना त्यांच्याकडे एक केस आली. प्रचंड भावनिक गुंतागुंत असलेल्या या केसचा विषय खूप महत्त्वाचा असून त्यावर चित्रपट होऊ शकतो हे समृद्धी पोरे यांनी जाणलं. त्यानंतर त्यांनी मोठ्या धाडसाने वकीली करत असतानाच ‘मला आई व्हायचंय’ या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन निर्मिती ही केली. समीक्षकांसह प्रेक्षकांनी गौरविलेल्या या चित्रपटाने अनेकांना भुरळ घातली. या चित्रपटाचा विषय होता ‘सरोगेशन’ म्हणजेच गर्भ भाड्याने देणे /घेणे. ज्यावेळी या विषयावर जास्त बोललंही जात नव्हतं तेव्हा या विषयावर त्यांनी ह्या चित्रपटाची कहाणी लिहिली, दिग्दर्शक म्हणून काम पाहिले व अशा विषयावर कुणीच निर्माता मिळत नाही बघून स्वत:च निर्मिती क्षेत्रातही पहिले पाऊल टाकले, आणि पदार्पणातच ‘मला आई व्हायचंय’ या त्यांच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, राज्य पुरस्कार व आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुध्दा मिळाले.
April 7, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti