जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातदेखील छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली. गुनरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नवीन रागांची निर्मिती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणे आहेत .
September 2, 2021
डेसमंड टूटू यांना दक्षिण आफ्रिकेत रंगभेद विरोधाचं प्रतिक म्हणून ओळखलं जातं. त्यांना देशाची नैतिक कम्पास (Country’s Moral Compass) म्हणूनही ओळखलं जातं. त्यांनी नेहमी विवेकवादाची बाजू घेतली.
December 27, 2021
सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातील जुन्या-नव्या पिढीला जोडणारा दुवा ज्येष्ठ कवयित्री डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या निधनाने निखळला. नवोदित कवयित्रींना ‘अभिव्यक्ती’ च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे मोठे काम डॉ. हेर्लेकरांनी केले होते. आशा बगे, जयश्री रुईकर, सुनीती आफळे, डॉ. आशा सावदेकर आणि डॉ. सुलभा हेर्लेकर या विदर्भाच्या पंचकन्या.. वैदर्भीय साहित्य क्षेत्रात प्रत्येकीला एक स्वतंत्र अस्तित्व आहे. यात कवयित्री म्हणून डॉ. सुलभा हेर्लेकर यांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले.
कवितेवर मनस्वी प्रेम करणारी ही प्रगल्भ कवयित्री पु.शि. रेगे आणि इंदिरा संत यांच्या साहित्याची मोठी चाहती. इंदिरा संतांवरचा अभ्यास, कविता व समीक्षेच्या क्षेत्रातील मुशाफिरी आणि कविता वाचनाच्या प्रयोगांच्या निमित्ताने त्यांनी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. कवी अनिलांनी हेर्लेकर यांचे वेगळेपण एकेकाळी हेरले होते. ‘पहाटपक्षी’, ‘नितळाई’ सह अनेक काव्यसंग्रहांतून पुढे त्यांनी हे स्थान टिकवले. शासकीय सन्मानासह अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या. दर्जेदार कवयित्री म्हणून स्वत:चा आब राखतानाच नवोदित लेखिका व कवयित्रींना तेवढीच सन्मानाची वागणूक देण्याचा कटाक्ष त्यांनी बाळगला.
जुन्या आणि नव्या कवयित्रींचे सख्य जुळविण्याचे अवघड काम त्यांनी अगदी सहज पार पाडले. राम शेवाळकरांनी लेखिका संमेलनासाठी स्थापन केलेल्या ‘अभिव्यक्ती’तून हेर्लेकरांच्या प्रगल्भतेचा खऱ्या अर्थाने परिचय घडला. त्या व्यासपीठावरून नव्या कवयित्रींना समोर आणण्याची त्यांची धडपड शेवटपर्यंत राहिली. विदर्भ साहित्य संघाच्या ‘युगवाणी’ त्रमासिकाच्या पाच वर्षे केलेल्या संपादनातून त्यांची साहित्यिक जाण व दर्जा स्पष्टपणे जाणवला. संशोधन, सांस्कृतिक, वाङ्मयीन आणि संस्थात्मक कार्यातील त्यांचा सहज वावर प्रत्येकालाच हवाहवासा वाटे. जवळजवळ चार दशके त्यांनी कवी संमेलने गाजवली.
शालीनता, सुसंस्कृतपणा, सभ्यता यांची सांगड घालून देतानाच घर-दार आणि जिव्हाळ्याचा वाङ्मयीन गोतावळा जपणाऱ्या डॉ. सुलभा हेर्लेकरांनी गंभीर आजारपणाची खबरबात कोणापर्यंत पोचू दिली नव्हती. त्यामुळे हेर्लेकरांचे अचानक जाणे वाङ्मयीन गोतावळ्याला चटका लावून गेले आहे.
August 5, 2017
शम्मी कपूर यांनी स्वत:ला कधी चिरतरुण म्हणवून घेतले नाही; पण जीवनावर उदंड प्रेम करणार्यास या आनंदी कलाकाराकडे ऊर्जेचा अखंड स्रोत होता. त्यांची जीवनाबद्दलची आसक्ती ही आयुष्याचा आनंद घेण्याची होती. त्यांनी आपले आयुष्य मनसोक्त उपभोगले. धसमुसळा,रांगडा प्रणय,नायिकांना थकविणारी भन्नाट नृत्यशैली ही शम्मी कपूर यांची खासियत होती.
October 31, 2017
“स्वामी” या दूरदर्शन मालिकेचं जहागीरदार यांनी दिग्दर्शन केले होते तसंच दादासाहेब फाळके यांचे कर्तृत्व रेखाटणारा चित्रपट “ड्रीम्स स्केस विंग्ज”चे गजानन जहागीरदार यांनी दिग्दर्शन केले होते.
August 13, 2021
एका नामांकित लेखक-समीक्षकाने, "बलवत्तर भाग्याचे नौशाद" अशा शीर्षकाचा लेख आपल्या एका पुस्तकात लिहीला आहे. नौशादजी 'Top' ला जाण्यात त्यांच्या 'गुणवत्तेपेक्षा' त्यांच्या 'भाग्याचा' वाटा मोठा आहे असे सूचन करणारे हे शीर्षक व हा लेख आहे. आता, नौशादांची गाणी त्या त्या काळात लोकप्रिय झालीच पण साठ सत्तर वर्षांनंतरदेखील ती जनप्रिय आहेत याला निव्वळ 'भाग्य' म्हणणे म्हणजे विनोदच आहे.
अर्थात नौशादांवर टीका करणारे अनेक आहेत . भप्पी लहिरीने सुद्धा त्यांना झोडपले होते. एका पत्रकाराने भप्पीला विचारले की 'तुम्ही चालींची चोरी करता' या आरोपाबाबत काय सांगाल? तशी भप्पी म्हणाला की ' चोरी कोण करत नाही ? नौशाद नाही का शास्त्रीय संगीतातले राग चोरत?' आता चालींची 'उचलेगिरी' करणे आणि एखादा राग कलात्मकतेचा शिडकावा करून विविध स्वरूपात मांडणे यातील फरक त्याला समजत नसेल काय? पण वेळ मारून नेली ना? मग झालं तर!
नौशादजी एका वेळी एकच चित्रपट करत याचीही कुचेष्टा होत असे. पण मला तरी हे कलाकाराच्या मनस्वीपणाचं व नम्रतेचं निदर्शक वाटतं. एक विषय हातात घेतला की त्यावर अधिकाधिक परिश्रम घेऊन, स्वतःच्या कुवतीनुसार त्याला पूर्ण न्याय देऊन त्यातून बाहेर पडायचे व मगच दुसऱ्या विषयात प्रवेश करायचा यात चुकीचे काय? The secret of good writing is re-writing असे म्हणतात. 'प्रतिभेच्या पहिल्याच उमाळ्यात सुचले तेच अंतिम' असे मानण्यापेक्षा , ते अधिकाधिक उत्तम व निर्दोष कसे करता येईल यावर जोर देणे ही एक प्रकारची विनम्रताच आहे.
त्यांचे आत्मचरित्र प्रौढी मिरवणारे आहे अशीही टीका झाली. परंतु त्यात इतर कोणाला कमी लेखले आहे असे मला तरी आढळले नाही. मला तरी ते स्व-कर्तृत्वाचे सार्थ (पण अनाठायी नव्हे) अभिमानाने केलेले विस्तृत कथन वाटले.
"भाग्याचीच" गोष्ट म्हणायची तर 'सैगल' व 'नूरजहाँ' या दोन्ही शिखरस्थ कलाकारांना संगीत देण्याचे भाग्य नौशादजीना लाभले. ते अन्य कोणालाच प्राप्त झाले नाही. आणि महत्वाचे म्हणजे 'शहाजहाँ' व 'अनमोल घडी' यातली गाणी अनुक्रमे सैगल व नूरजहाँ यांच्या करीअर मधली माईलस्टोन गाणी ठरली. शिवाय सैगल व नूरजहाँ या दोघांनी नौशादजींकडे फक्त एकेकच चित्रपट केला होता हे ही लक्षात घेण्याजोगे !
मेहबूब, करदार, सनी, विजय भट्ट, के आसीफ यासारखे मोठे निर्माते नौशादजीनाच घेत ही केवळ 'योगायोगाची' गोष्ट नव्हती तर ती त्यांच्या गुणवत्तेची पावतीच होती.
'कलात्मक' संगीत देणा-या संगीतकारात त्यांचे स्थान खूप वरचे आहे. त्यांच्या संगीतातील 'कोरस'चा वापर या एकाच विषयावर एक मोठा लेख लिहीता येईल. एकाच ओळीसाठी दोन चाली - मुख्य गायकासाठी एक व कोरससाठी एक- हे त्यांचे मुख्य वैशिष्ट्य! त्यातही एक चाल आरोही असेल तर दुसरी अवरोही अश्या रचना ! कधीकधी दोन्ही चाली एकाच दिशेने जाणा-या!
कधी गाण्याची चाल 'नाजूक' असेल तर त्याला 'भारदस्त' कोरसची 'भक्कम' चौकट तर कधी उलट - म्हणजे 'रांगड्या' चालीला 'नाजूक' कोरसची कलात्मक नक्षी ! उडन खटोला मधील 'मोरे सैय्याजी उतरेंगे पार' म्हणजे तर कोरसमधील सृजनशीलतेची परिसीमाच! यात prelude व interlude म्हणून फक्त कोरसच वापरला आहे. 'हैय्या हो हैय्या रे हैय्या' हे शब्द किती वेगवेगळ्या प्रकारे दिले आहेत ते प्रत्येकाने मोजून बघायला हवेत. शिवाय कोरस दोन वेगवेगळ्या स्केल मध्ये वापरला आहे. त्यामुळे 'अंतराचा' आभास निर्माण होतो.
"ज्यांचा गळा गायनासाठी फारसा 'तयार' नाही अशा कलाकारांकडून अजरामर गाणी गाऊन घ्यायची" हे त्यांच्या प्रतिभेचं आणखी एक द्योतक! उमादेवी ( अफसाना लिख रही हूँ), श्याम (तू मेरा चांद), करण दिवाण ( जब तुमही चले परदेस आणि सावनके बादलो), मंजू (अंगडाई तेरी है बहाना) या सगळ्यांना 'गायकाचा' मान नौशादजीनीच मिळवून दिला.
माझे एक नौशादप्रेमी मित्र म्हणतात की रविंद्र संगीत , बंगाली संगीत याप्रमाणेच "नौशाद संगीत" ही एक स्वतंत्र व समृद्ध संगीत शाखा आहे. मला तरी यात काही अतिशयोक्ती वाटत नाही. मात्र या प्रगल्भ प्रतिभेच्या संगीतकाराच्या संगीताचा बारकाईने अभ्यास करता येईल असे सांगितीक ज्ञान माझ्याकडे नाही याची खंत मात्र सतत वाटते .
-- धनंजय कुरणे
08.05.2017
May 16, 2017
भारतकुमार राऊत हे पत्रकार आणि ललित लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच वृत्तपत्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि पुढे मुंबई सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, दी इव्हिनिंग न्यूज ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल, दी इंडियन पोस्ट, दी इंडिपेंडंट, दी मेट्रोपोलिस ऑन सॅटर्डे, दी पायोनियर अशा मराठी आणि इंग्लिश वर्तमानपत्रांमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या.
April 6, 2022
कसोटीत तीनशेहून अधिक विकेट आणि चार हजारहून अधिक धावा करणाऱ्या भारताचा महान अष्टपैलू कपिलदेव आणि इंग्लंडचा इयन बोथम यांच्या पंक्तीत व्हेटोरीने स्थान मिळवलेय. त्यानं ६ शतके आणि २३ अर्धशतके ठोकलीत. ३४ आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये व्हेटोरीने ३८ विकेट घेतल्यात. कर्णधार म्हणूनही डॅनियल व्हेटोरी यशस्वी ठरलाय.
January 27, 2022
स्टीव्ह बकनर हे वेस्ट इंडीज अनुभवी पंच. स्टीव्ह बकनर यांनी डिकी बर्ड यांचा विक्रम २००२ मध्ये मागे टाकून २००५ मध्ये कसोटीत १०० सामन्यात पंचगिरी करणारे ते पहिले पंच ठरले होते. बकनर यांनी १९९२, १९९६, १९९९, २००३ व २००७ च्या वर्ल्ड कप फाइनल मध्ये अम्पायरिंग केले होते. हे एक रेकॉर्ड आहे.
May 31, 2022
नमस्ते लंडन, एक था टायगर, अजब प्रेम की गजब कहानी, जब तक है जान, धूम ३, 'एक था टायगर' असे एकाहून एक सरस व हिट चित्रपट देणारी व बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असणारी सुपरस्टार म्हणजे कतरिना कैफ. कतरिना लहान असतानाच तिच्या आई-वडीलांचा घटस्फोट झाला. तिची आई सामाजिक कार्यकर्ती असल्याने कैफ परिवाला दर दोन वर्षांनी आपला बाडबिस्तरा उचलून नवनव्या ठिकाणी, देशांत प्रवास करावा लागत असे. कतरिना लहानपणापासूनच मॉडेलिंगच्या क्षेत्रात आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ रोजी झाला.२००३ साली कतरिना भारतात आली. तिचा पहिला चित्रपट 'बूम' दणकून आपटला, मात्र या अपयशाने खचून न जाता अथक मेहनत करत तिने बॉलिवूडमध्ये बस्तान बसवले. 'मैने प्यार क्यूं किया' या चित्रपटात ती प्रथमच सलमानसोबत मुख्य भूमिकेत झळकली. मात्र २००७ साली आलेल्या 'नमस्ते लंडन' हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला आणि कतरिनाने प्रथमच यशाची चव चाखली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचेही खूप कौतुक झाले. या चित्रपटापासून तिची व अक्षय कुमारची जोडी हिट ठरली. ती दिवसातील १६-१६ तास काम करत असते. न थकता, न कंटाता काम करण्याच्या आपल्या सवयीमुळे आज आपल्याला हे यश, प्रसिद्धी मिळत असल्याचे कतरिनाचे म्हणणे आहे. शीला की जवानी, चिकिनी चमेली ही आयटम साँग खूप गाजली आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकीपीडीया
July 17, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti