उषा मराठे हे मूळ नाव असणार्या उषाकिरण यांचा जन्म २२ एप्रिल १९२९ रोजी वसईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. उषा किरण यांची घरची आर्थिक स्थिती बेताची होती. उषाकिरण आणि तिची मोठी बहीण लीला मराठे यांना अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांचे वडील बापूसाहेब मराठे यांनी आपल्या दोन्ही मुलींना नाटकांत काम करण्यासाठी पाठवावयाचे ठरवले.
April 24, 2014
श्री. चंद्रशेखर पी. परांजपे हे ठाणे येथील ठाणे भारत सहकारी बॅंकेचे संचालक आहेत.
March 5, 2015
भालचंद्र गोपाल पेंढारकर म्हणजेच भालजी पेंढारकर यांचे काही प्रमुख व उल्लेखनीय चित्रपट म्हणजे “थोरातांची कमळा”, “तांबडी माती”, “साधी माणसं”, “मराठा तितुका मेळवावा”, “छत्रपती शिवाजी’, “मोहित्यांची मंजुळा”, “घरची राणी’, “स्वराज्याचा शिलेदार”, “कांचनगंगा” ,”महाराणी येसुबाई” ,”बाल शिवाजी”, “प्रीत तुझी माझी” आणि “शिलंगणाचे सोने’
November 25, 2013
प्रत्येक कलावंत हा तोंडाने नाही तर त्याच्या कलेतून बोलत असतो. त्याच्या तत्वांना, भावनांना, व आयुष्यभर जोपासलेल्या स्वप्नांना तो कलेच्या सौंदर्यामध्ये घोळवत असतो, मुर्तरूप देत असतो, त्यांना एका अर्थाने जीवंतच करत असतो. खळबळलेला समुद्र जसं आपल्या मनातलं वादळ व्यक्त करण्यासाठी लाटांचा आधार घेतो, त्याप्रमाणे कलावंत आपल्या कलेतून ही तळमळ रसिकांसमोर मांडत असतो. पायामधील पैंजण ज्याप्रमाणे हळुवार वाजुन पावलं कुठे चालली आहेत याची जाणीव करून देतात, त्याप्रमाणे कलाकाराच्या मनाचा थांगपत्ता हा त्याच्या कलेच्या अविष्कारामधून केवळ दर्दी रसिकांनाच लागु शकतो.
July 19, 2011
अलीकडेच डॉ. रविन थत्ते यांचा प्लास्टिक सर्जन असोसिएशनने ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन गोवा येथे सन्मान केला. डॉ. थत्ते हे एक अद्भूत रसायन आहे. काही माणसे सामाजिक बांधिलकीचा वसा घेऊन जन्माला आलेली असतात. अशा मंडळींमध्ये कामाची प्रचंड ऊर्जा असते. एखाद्या विषयात ते आयुष्यभर निस्वार्थ बुद्धीने व अथकपणे काम करत असतात.
वयाच्या ७२ व्या वर्षीही त्यांचा काम करण्याचा उत्साह कोणालाही थक्क करणारा आहे. प्लास्टिक सर्जन (सुघटन शल्य चिकित्सक) असलेल्या डॉ. थत्ते यांनी प्लास्टिक सर्जरीमध्ये मूलभूत संशोधन केले आहे, तसेच ज्ञानेश्वरीचाही प्रचंड अभ्यास केला आणि ज्ञानेश्वरीचे इंग्रजीत भाषांतरही केले. इंग्रजीत त्यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या तीन आवृत्त्या हातोहात खपल्या असून त्यातून मिळालेला पैसा हा त्यांनी सामाजिक कामासाठी दिला आहे. सध्या शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’चे मराठीत भाषांतर करण्याचे त्यांचे काम सुरू आहे. डॉ. थत्ते यांचा साराच प्रवास अद्भूत म्हणावा लागेल.
वडील सरकारी नोकरीत असल्यामुळे भटकंती कायमचीच मागे लागली होती. परिणामी १६ शाळांमधून त्यांचे शिक्षण झाले. मराठी, गुजराथी आणि उर्दू शाळांमधून त्यांचे शिक्षण घेतले असून डॉक्टर बनण्याची ओढ प्रथमपासूनच होती. मुंबई महापालिकेच्या शीव रुग्णालयात तब्बल ४५ वर्षे ते प्लास्टिक सर्जरी विभागात काम करत होते. विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी शस्त्रक्रिया व प्लास्टिक सर्जरीमधील संशोधन चालूच ठेवले आहे.
एडिंबराच्या ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जरी’ने त्यांची संशोधन चिकित्सक वृत्ती तसेच प्लास्टिक सर्जरीतील नवा दृष्टिकोन लक्षात घेऊन त्यांना एफआरसीएस पदवी दिली होती. अमेरिकेतील फुलब्राइट स्कॉलरशीप मिळवणारे ते पहिले भारतीय डॉक्टर आहेत. ब्रिटिश असोसिएशन ऑफ प्लास्टिक सर्जनच्या नियतकालिकाच्या पहिल्या पन्नास वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक शोधनिबंध लिहिल्याबद्दल त्यांना असोसिएशनचे मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले.
प्लास्टिक सर्जरीतील उल्लेखनीय संशोधनासाठी प्रसिद्ध होणाऱ्या सूचीमध्ये सलग पाच वर्षे डॉ. रविन थत्ते यांचे नाव प्रसिद्ध होत होते यावरून या क्षेत्रातील त्यांच्या संशोधनाची कल्पना करता येईल. त्यांच्या संशोधनाची दखल आज जगभारातील विद्यापीठांकडून घेण्यात येत असून हार्वड विद्यापीठासह जगातील आठ नामांकित विद्यापीठांमध्ये मूलभूत संशोधन या विषयावर व्याख्याता म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात येते.
भारतासह विकसनशील राष्ट्रांसाठी उपयुक्त शस्त्रक्रिया पद्धती शोधल्याबद्दल त्यांना ‘मलेशियन प्लास्टिक सर्जरी असोसिएशन’नेही मानद सभासदत्व देऊ केले आहे. ४५ वर्षांत त्यांनी अनेक नामाकिंत प्लास्टिक सर्जन घडवले एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातील जन्मजात व्यंग असलेल्या मुलांसाठी डेरवण येथे तब्बल एक तप काम केले. ‘टिळक रुग्णालय स्वच्छता न्यासा’ची स्थापना करून पालिकेच्या शीव रुग्णालयात स्वच्छता प्रकल्प राबविला.
दुर्देवाने प्रशासनातील उच्चपदस्थ तसेच कामगार संघटनांच्या विरोधामुळे हा प्रकल्प बंद पडला. मात्र रुग्णालय स्वच्छतेचा ध्यास असलेल्या डॉ. थत्ते यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या मदतीतून तसेच स्वत:च्या पदराला खार लावून तब्बल ३० लाख रुपये जमा केले. यातून त्यांनी काही वर्षे रुग्णालय स्वच्छ ठेवले होते. अनेकदा स्वत: रुग्णालयातील गटारात उतरून त्यांनी सफाई केली आहे. ते राहात असलेल्या माहीम येथील समुद्र किनारा स्वच्छ राहावा, यासाठी पालिकेशी त्यांना अनेकदा दोन हात करावे लागले आहेत. सध्या प्लास्टिक सर्जरीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक लिहिण्याचे काम सुरू असून जाणीव, मी हिंदू झालो, विज्ञानेश्वरी, माणूस नावाचे जगणे असे सहा ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत.
अखंड उत्साहाचा धबधबा असलेल्या डॉ. रविन थत्ते यांनी माणूस म्हणून जगणे म्हणजे काय याचा एक आदर्शच घालून दिला आहे.
August 5, 2017
ग्रामीण पार्श्वभूमीमुळे एका नामांकित संस्थेने त्यांना पदवीनंतर मार्केटिंगच्या अभ्यासक्रमात प्रवेश नाकारला होता. आज मात्र मॅनेजमेन्टचे धडे गिरविण्यासाठी ख्यातनाम संस्थाही त्यांना व्याख्यानांना बोलावतात. प्रदीप लोखंडे यांनी मॅनेजमेन्टचे सूत्र वापरूनच ग्रामविकासाचा डोंगर उभा केला.
ग्रामविकासाचा नवा फंडा
July 14, 2017
ठाणे महापालिकेचे नगरसेवक असलेले पांडुरंग पाटील.
सामान्य करदात्यांना दैनंदिन आयुष्यात वाहतूकींच्या व पायाभूत सुविधांच्या निर्मीतीबाबत भेडसावणार्या समस्यांच्या बाबतीत पांडुरंग पाटील यांनी अनेक ठोस पाऊले उचलून यासंबंधी अनेक योजना व कार्यक्रम अंमलात आणले आहेत. आपल्या प्रभागाला आधुनिकीकरण व नवविकासाचा मार्ग दाखवणारे सभागृह नेते अशी त्यांची ख्याती आहे.
पाणी, रस्तेविकास, उद्यानविकास, मलःनिस्सारण योजना, व बी.एस.यू.पी. योजनेची अंमलबजावणी अशा पंचस्तरीय कामांना प्राधान्य देवून त्यांनी ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ८७ मध्ये मुलभूत सुधारणांचे पर्व सुरू केले आहे.
January 22, 2015
रघुवेल लुक्स उर्फ र. ल्यु. जोशी यांनी काव्यलेखनाला तुलनेने खुप उशीरा सुरूवात केली. ताप येण्याचे निमित्त झाले आणि त्या काहिलीत काव्यलेखनाची स्फूर्ती होऊन त्यांनी खंडकाव्यच लिहून पूर्ण केले! त्यांच्या लेखनाची सुरूवात बायबलच्या विषयातून झाली. दांभिकपणा, पारतंत्र्य, राष्ट्रप्रेम, मायबोलीचे प्रेम ह्या विषयांवर त्यांनी सहजस्फूर्तीने, आवेशपूर्ण आणि भावपूर्ण लेखन केले आहे. वामन टिळकांना ते गुरूस्थानी मानत होते.
January 12, 2015
भास्कर काशीनाथ चांदूरकर हे “काव्यशेखर” या टोपण नावाने कविता लिहित असत.
January 4, 2021
लंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला गेलेल्या एकट्या बाप्यांची रीघ लागली, पुढे या बाईंनी कॉट बेसिस वर रहायला जागा द्यायला सुरवात केली, असे होता होता आजीबाईंची खानावळ इतकी प्रसिध्द झाली कि लंडन ला जाऊन त्यांच्याकडे न गेलेला मराठी माणूस मिळायचा नाही.
June 8, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti