उजव्या कोप-यात गंगाखेड, परभणी असे लिहिलेले भरगच्च मजकुराचे पोस्टकार्ड उभ्याआडव्या महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणच्या कोणत्याही क्षेत्रात चळवळ्या असलेल्या कोणाहीकडे आले की ते श्रीनिवास कुलकर्णी यांचेच आहे हे क्षणात उमगायचे. वास्तविक श्रीनिवासचे मूळ गाव लातूर. तरुण वयातच आईवडिलांचे छत्र हरपले. पण व्यक्तिगत दु:खात ते कधीच हरवले नाहीत.
वेठबिगार प्रथेविरोधात देशव्यापी आंदोलन छेडलेल्या स्वामी अग्नीवेश यांचे नाव सत्तरच्या दशकात गाजत होते. १९७३ साली औराद शहाजनी येथे झालेल्या आर्य युवक परिषदेच्या शिबिराच्या निमित्ताने श्रीनिवासांना स्वामीजींशी संपर्क साधता आला. त्यानंतर आपले पुढील आयुष्य दलित कष्टकरी वर्गातील अन्यायाविरोधात पणाला लावायचे हे त्यांनी पक्के ठरवून टाकले.
July 27, 2011
दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील अस्थिरोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश कोतवाल हे हातावरील शस्त्रक्रियेतील देशातले आघाडीचे शल्यचिकित्सक. त्यांनी हे नैपुण्य अमेरिकेतील केंटकी लुईव्हिलमधील हॅंडसर्जरीची संस्था आणि न्यूयॉर्कमधील हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथे मिळवले. आठ वर्षांपूर्वी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या दोन्ही मनगटांवर शस्त्रक्रिया करुन त्यांना हाताच्या बोटांवरील गमावलेले नियंत्रण डॉ. कोतवाल यांनी परत मिळवून दिले.
डॉ. प्रकाश कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला या हातांनी हात दिले मज हा लेख पुढील पानावर वाचा.
डॉ. प्रकाश कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला या हातांनी हात दिले मज हा लेख वाचा.

MM-022
<!--डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हा लेख वाचा. या हातांनी हात दिले मज -->
August 26, 2015
रॉबर्ट बॉश ही जगातील आघाडीवरची तंत्रज्ञान, सेवा, पुरविणारी तसेच आय. टी. तंत्रज्ञानाचा प्रसार, विकास, संशोधन, निर्मिती व विक्री अशा जवळ जवळ सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर मानली जाणारी कंपनी आहे. आय. टी., विज्ञान, तंत्रज्ञान, व व्यवसाय क्षेत्रात तज्ञ मानल्या जाणार्या असंख्य हिर्यांचा इथे खच पडलेला असतो. या खाणीतला असाच एक तेजाने तळपणारा हिरा म्हणजे किरण जाधव हा मराठमोळा तरूण.
August 16, 2011
एन. चंद्रा यांनी चित्रपटसृष्टीत संकलक, दिग्दर्शक, निर्माता, कथा व पटकथा लेखक अशा विविधांगी भूमिका पार पाडल्या आहेत.
June 4, 2022
चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर हे मराठी नाट्य-अभिनेते, चित्रपट अभिनेते होते.
December 15, 2010
रसिका जोशी यांच्या नागमंडल, व्हाईट लिली आणि नाइट रायडर यांसारख्या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या. प्रपंच या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील त्यांची भूमिका गाजली. तसेच मराठीत खबरदार, यंदा कर्तव्य आहे, अशा चित्रपटांतील त्यांच्या भूमिका स्मरणीय होत्या.
July 25, 2022
जेव्हा जेव्हा शांताराम प्रॉडक्शनच्या चित्रपटांचा उल्लेख होईल किंवा प्रभातच्या उत्कृष्ट कलाकृतींचा विचार होईल तेव्हा नाजूक चेहर्याची, गोड गळ्याची, रुपसंपन्न नायिका म्हणून जयश्री शांताराम यांचं नाव कायमच स्मरणात राहिल.
March 28, 2013
पं. महादेवशास्त्री जोशी हे “संस्कृतिकोश”कार म्हणून ओळखले जातात. धर्म, संस्कृती आणि समाजविषयक अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे.
जन्म :
मृत्यू : ११ डिसेंबर १९९२
#mss, 11 December 1992,
Joshi, (Pt) Mahadevshastri
August 22, 2017
मुंबईच्या व्यावसायिक वर्तुळामध्ये सुधीर राशिंगकर यांचे नाव माहित नसलेला उद्योजक विरळाच असावा, एवढया सक्रियतेने व सक्षमतेने आपल्या उत्तुंग कारकिर्दीत, मुंबईच्या व्यावसायिक विस्तारीकरणामागे त्यांनी मोलाची भुमिका बजावली आहे. शैक्षणीक दिवसांपासुनच त्यांच्यातील इतरांना दिपवणारी बुध्दिमत्ता, व दुसर्यांना सतत आपल्या खिशांत ठेविण्यासाठी लागणारी संभाषण कला त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली पाहून ते व्यावसायिक उड्डाणपट्टीवर, आपल्या यशाचे विमान लीलया उडवू शकतील, याची त्यांच्या घरच्यांना चांगलीच कल्पना होती.
August 29, 2011
दत्ता माने यांनी अभिनेता व मराठी दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यांचा जन्म १९२२ रोजी झाला. त्यांनी आपल्या काळात १८ चित्रपट बनवले. काही नावे बाईसाहेब, मामा भाचे, कार्तिकी, कसे काय पाटील बरे आहे का?, पाटलाची सून.
दत्ता माने यांचे २९ ऑक्टोबर १९८० रोजी निधन झाले.
#DattaMane
May 4, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti