(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सुप्रसिद्ध नाटककार मो. ग. रांगणेकर

    मो.ग.रांगणेकर यांनी अनेक नाटके लिहिली , दिग्दर्शित केली. त्यांनी संगीत अमृत , अलंकार , आले देवाजीच्या मना. संगीत आशीर्वाद , कन्यादान , संगीत कुलवधू , लिलाव , भेटला दिली ओसरी , हेही दिवस जातील हे नाटक त्यांनी सहलेखक म्ह्णून वसंत सबनीस आणि ग.दि . माडगूळकर याना घेऊन केले. अशी त्यांनी अनेक नाटके लिहिली .

  • निर्मात्या,दिग्दर्शिका, अभिनेत्री किशोरी शहाणे-विज

    ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’ पासूनची त्यांची रुपेरी वाटचाल तब्बल पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळाची आहे. पण तरी त्या आजच्या पिढीच्या तारकेच्या स्पर्धेत कार्यरत आहे. त्यांचा जन्म २३ एप्रिल १९६८ रोजी झाला. किशोरी शहाणे यांचे शिक्षण मिठाबाई कॉलेज मध्ये झाले. त्यांना मिठाबाई कॉलेजमध्ये मिस मिठाबाई हा किताब मिळाला होता. किशोरी शहाणे यांचा पहिला चित्रपट माहेरची साडी.त्या स्वतः डान्सर आहेत, भारतात व परदेशात त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. किशोरी शहाणे यांची निर्मिती केलेला पहिला मराठी चित्रपट "ऐका दाजिबा' यासह मराठी चित्रपट, मराठी आणि हिंदी मालिका, रिअॅलिटी शोज इत्यादीतून त्यांनी कामे केली आहेत. ३० वर्षं त्या मराठी इंडस्ट्रीचा भाग आहे. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या जॉनरचे आठ चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. पती दीपक बलराज वीज हे निर्माते आहेत. आता किशोरी शहाणे या ‘स्टेप अप’ या नृत्यावर आधारित हॉलीवूड चित्रपटात काम करत आहेत. किशोरी शहाणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जयललिता उर्फ अम्मा

    तामिळनाडूमधील अय्यंगार ब्राह्मण कुटुंबात जयललिता जन्माला आल्या. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९४८ रोजी मैसूर मध्ये झाला. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी जयललिता नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. कोमल वल्ली असे त्यांचे खरे नाव.

    मात्र, त्यांची आई प्रेमाने त्यांना 'अम्मो' या नावाने हाक मारत. वय अवघं दोन वर्षांचं असताना वडिलांचं निधन झालं आणि जयललितांच्या आईने कर्नाटक सोडून बंगळुरू गाठलं.जयललितांना कधीही चित्रपटात येण्याची इच्छा नव्हती. पण नाइलाजाने त्यांना चित्रपटांत यावे लागले. जयललितांच्या आईची दुसरी बहीण अमबुजावल्ली यांनी त्यांना चित्रपटसृष्टीत आणले. सुरुवातीला त्यांनी लहान-लहान ड्रामा कंपनीत अभिनय केला त्यानंतर त्यांनी चित्रपटांकडे मोर्चा वळवला.

    काही वर्षांनंतर जयललिताही मद्रासला गेल्या आणि त्यांनी प्रसिद्ध भारतनाट्यम गुरू वैजूवूर बीरमैया पिल्लई यांच्याकडून नृत्याचे धडे घेतले. मायलापूरच्या एका ऑडिटोरियममध्ये जयललितांचा कार्यक्रम झाला त्यावेळी तत्कालीन सुपरस्टार शिवाजी गणेशन त्यांच्यावर भलतेच इम्प्रेस झाले. त्यांनी जयललिताला चित्रपटात अभिनय करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार १५ वर्षांच्या असताना त्यांनी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली व जयललिता यांनी १७ व्या वर्षी लीड अॅक्ट्रेस म्हणून ‘वेनिरा अडाई’ हा त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला.

    पहिल्या चित्रपटानंतर जयललिता यांना अनेक प्रकारच्या ऑफर यायला सुरुवात झाली होती. पण जयललितांना शिक्षण सुरू ठेऊन वकील बनायचे होते. त्यांच्या आईचीही तशीच इच्छा होती. पण घरची आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी अभिनय करण्याखेरीज दुसरा पर्याय जयललितांकडे नव्हता. अभिनयाच्या कामाच्या मोबदल्यात त्यांना लगेचच पैसे मिळायचे. त्यानंतर चित्रपट हेच जयललिता यांचे करियर बनले. त्यांनी सुमारे ३०० चित्रपटांत अभिनय केला. त्या दक्षिणेतील सुपस्टार बनल्या होत्या. शर्मिला टागोर यांच्याशी त्यांची तुलना होऊ लागली होती. त्या काळातील फेमस ब्रँड लक्सने त्यांना साईन केले. राजकारणात सक्रिय होईपर्यंत जयललिता हे तमीळ चित्रपटसृष्टीत आघाडीचं नाव होतं.

    राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी जयललिता तरुणपणात त्या काळच्या लोकप्रिय नायिका होत्या.जयललिता यांनी हिंदी चित्रपट इज्जत मध्येही काम केलं होतं. या चित्रपटात जयललितांसोबत धर्मेंद्र यांनी काम केलं. जयललिता यांनी एमजीआर यांच्यासोबत जवळपास २८ चित्रपटांत काम केलं आहे. जयललिता या शक्तिशाली नेत्या म्हणून ओळखल्या जात. जयललिता या AIADMKचे संस्थापक एमजी रामचंद्रन ऊर्फ एमजीआर यांच्या जवळच्या समजल्या जायच्या. जयललिता यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकत एमजीआर यांच्यासोबत सक्रिय राजकारणात प्रवेश केला.एम. करुणानिधी यांचा द्रमुक पक्ष फुटल्यानंतर एमजीआर यांनी AIADMK या पक्षाची स्थापना केली. एमजीआर यांनी १९८३ साली जयललिता यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती केली आणि त्यांना राज्यसभेवर पाठवलं.

    एमजीआर आणि जयललिता यांच्यात मतभेदाच्या अनेक बातम्या आल्या. त्यानंतर जयललिता यांनी १९८४ मध्ये AIADMK या पक्षाचं प्रचार अभियानाचं नेतृत्व केलं.एमजीआर यांच्या निधनानंतर जयललिता यांनी मजबूतपणे पक्षाची कमान सांभाळली आणि १९९१ मध्ये निवडणूक जिंकून त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या. १९९६ च्या विधानसभा निवडणुकीत जयललिता यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. तरीही त्यांचा राजकारणातला दबदबा कायम राहिला. जयललिता यांनी १९९१, १९९६, २००२, २००६, २०११, २०१४ आणि २०१५ ला तामिळनाडू राज्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं होते. जयललिता यांचे ५ डिसेंबर २०१६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    https://www.youtube.com/watch?v=2yN-YJHQvq8

  • भारतातील संचारक्रांतीचे प्रणेते सॅम पित्रोडा

    राजीव गांधीच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अमेरिकन नागरिकत्व सोडून ते पंतप्रधानांचे मुख्य तंत्रज्ञान सल्लागार बनले. हे काम त्यांनी तब्बल दहा वर्षे दरसाल अवघा एक रुपया नाममात्र वेतन घेऊन केले. वीस वर्षांपूर्वी भारतात सुरू झालेल्या ‘पीसीओ ‘ क्रांतीचे पित्रोडा शिल्पकार ठरले. आज गावोगावी , गल्लोगल्ली दिसणाऱ्या ‘ पब्लिक टेलिफोन बूथ ‘ च्या मागे दूरभाष सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठीची पित्रोडा यांची कल्पकता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राबलेल्या तंत्रज्ञांच्या पलटणींचे परिश्रम आहेत.

  • श्रेष्ठ मराठी कोशकार यशवंत रामकृष्ण दाते

    कर्वे यांच्या साहाय्याने तयार केलेला सुलभ विश्वकोश (१९४९–५१) सहा भागांत प्रसिद्ध झाला. महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश (२ खंड, १९४२, १९४७) आणि शास्त्रीय परिभाषा कोश (१९४८) ही याच द्वयीने निर्माण केलेली कोशसंपदा होय. दाते यांनी रा. त्र्यं. देशमुख ह्यांच्या सहकार्याने, १८१० ते १९१७ ह्या कालखंडात प्रकाशित झालेल्या मराठी मासिकांची, त्यांतील लेखांची, तसेच मराठी ग्रंथांची आणि ग्रंथकारनामांची सूची महाराष्ट्रीय वाङ्‌मयसूची (१९१९) ह्या नावाने तयार केली. शंकर गणेश दाते ह्यांनी तयार केलेल्या प्रसिद्ध ग्रंथसूचीच्या पूर्वी तशा दिशेने झालेला एक उल्लेखनीय प्रयत्न म्हणून ही सूची महत्वाची.

  • माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह

    दिग्गीराजा अशी ओळख असलेले दिग्विजय सिंह हे जवळजवळ ५० हून अधिक वर्षे भारतीय राजकारणात सक्रिय आहेत.
    दिग्विजय सिंह यांचे प्राथमिक शिक्षण डेली कॉलेज इंदूर येथून झाले. यानंतर, श्री गोविंदराम यांनी इंदूरच्या सेसरिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स येथून त्यांनी अभियांत्रिकी पदवी घेतली.

  • शिक्षणतज्ज्ञ विष्णू विनायक बोकील उर्फ वि वि. बोकील

    १९४१-४२ च्या सुमारास ‘मंगळागौरीच्या रात्री’ ही बोकीलांची कथा विनायकांच्या वाचनात आली आणि त्यांनी बोकीलांना तत्काळ बोलावून त्या कथेचे संवादलेखन करून घेतले. चित्रपट होता ‘पहिली मंगळागौर’.मुंबईच्या सेंट्रल सिनेमात ६ मार्च १९४३ रोजी हा चित्रपट झळकला.

  • बॉलीवूडचे पोलीस अधिकारी जगदीश राज

    पाकिस्तानातील सरगोधा येथे जन्म झालेले जगदीश राज फाळणीनंतर भारतात स्थायिक झाले. जगदीश राज खुराणा हे जगदीश राज यांचे पूर्ण नाव. जगदीश राज यांनी दीडशेहून अधिक चित्रपटात विविध भूमिका केल्या मात्र ते ‘पोलीस’ अधिकाऱ्याच्या भूमिकेत विशेष गाजले.

    तब्बल १४४ चित्रपटांमधून त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका वठविली होती. सिनेक्षेत्रातील २१ वर्षांच्या कारकिर्दीत एकाच प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारण्याचा विक्रम जगदीश राज यांच्या नावावर आहे. त्यांच्या या भूमिकांची ‘गिनिज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही नोंद घेण्यात आली होती. बहुतांश हिंदी चित्रपटातून त्यांनी रंगविलेली ‘पोलीस अधिकारी’ ही भूमिका गाजली. ‘मजदूर’, ‘इनाम धरम’, ‘गोपीचंद जासूस’, सिलसिला’, ‘बेशरम’, तुम्हारी कसम’, सुहाग’, ‘ड्रीम गर्ल’, 'गुलामी', 'असली नकली', 'विरोधी', 'चार दिन की चांदनी' आदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. जगदीश राज हे अभिनेत्री अनीता राज यांचे वडील.

    जगदीश राज यांचे २८ जुलै २०१३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • सत्यकथा चे संपादक अनंत अंतरकर

    ‘मराठी साहित्यात जोपर्यंत ललित नियतकालिकं चालू राहतील तोपर्यंत अनंत अंतरकरांचं नाव कायम टिकून राहील’, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी कै. अनंत अंतरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात काढले होते. त्यांचा जन्म १ डिसेंबर १९११ रोजी जमखिंडी येथे झाला. ‘हंस’, ‘मोहिनी’ आणि ‘नवल’ ही अनंत अंतरकरांनी सुरू केलेली ललित नियतकालिके केवळ दर्जेदार साहित्याच्याच जोरावर आज ७० वर्षे झाली तरी वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत, हे अंतरकरांच्या वाङ्मयीन द्रष्टेपणाचेच द्योतक म्हणावे लागेल.

    साहित्याचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. बा. ल. अंतरकर हे कोकणातले एक प्रसिद्ध शिक्षक होते. ते संस्कृत पंडित होते, त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळवले होते. ‘सरूप शाकुंतल’, ‘मेघदूतच्छाया’ आणि (उमर खय्यामकृत) ‘रुबाया’ हे त्यांचे मराठी अनुवादग्रंथ त्या काळात गाजले होते. अशा व्यासंगी आणि साहित्यिक वडिलांच्या सहवासात अनंत अंतरकरांची साहित्यरुची जोपासली गेली. त्या काळची ‘यशवंत’, ‘रत्नाकर’, ‘मनोरंजन’ यांसारखी साहित्यसंपन्न मासिके त्यांच्या वाचनात होती. अभिजात संस्कृत साहित्यकृतींबरोबरच गडकरी, ह. ना. आपटे, चिं. वि. जोशी, कोल्हटकर, कवी यशवंत, बालकवी यांची साहित्यसंपदाही त्यांनी अभ्यासली होती. वडिलांकडे विद्वज्जनांची ये-जा असल्यामुळे मराठी व इंग्रजी पुस्तकांवर साहित्यचर्चा झडत. त्या कानावर पडून इंग्रजी साहित्याचाही अंतरकरांचा अभ्यास सुरू झाला.

    शाळेत असताना अंतरकरांनी ‘विद्याविनोद’ नावाचे एक हस्तलिखित मासिक हौसेने काढले होते. ते पाहून त्यांचे शिक्षक फाटक यांनी ‘हा मुलगा मोठेपणी उत्तम संपादक होईल’ असे भाकीत केले होते.
    शिक्षणासाठी अंतरकर मुंबईत दाखल झाले. इथे त्यांना अभिनय, नाट्यदिग्दर्शन यांचा छंद जडला, पण साहित्याचे प्रेम प्रबळ ठरले. अंतरकरांनी पत्रकारिता सुरू केली. भिन्न भिन्न प्रकारच्या कथा, कविता, समीक्षापर पुस्तके, नाटके, विडंबन काव्य, विनोद आदींच्या वाचनाने आणि परिशीलनाने त्यांचा साहित्यिक पिंड घडत गेला. शेक्सपिअर, मार्लो, बर्नार्ड शॉ, ओ. हेन्री, चेकॉव्ह, टॉलस्टॉय, अॅुगाथा ख्रिस्ती प्रभृती अभिजात साहित्यकारांपासून पी. जी. वुडहाऊस, सॉमरसेट मॉम, ऑर्थर कॉनन डॉयल या लोकप्रिय लेखकांच्या साहित्याचे त्यांनी वाचन केले. मराठीतल्या तत्कालीन नियतकालिकांबरोबरच ‘स्ट्रँड’, ‘व्हरायटी’, ‘अॅागासी’ यांसारख्या अभिरुचिसंपन्न पाश्चाॉत्त्य नियतकालिकेदेखील त्यांच्या नियमित वाचनात होती. जोडीला मराठी नाटके आणि हिंदी व इंग्रजी चित्रपट पाहण्याची त्यांना आवड होती. त्यांचे साहित्य-कलाविषयक शिक्षण अनौपचारिकपणे बरेच पुढे गेले. यातूनच त्यांचे अभिजात संपादकीय व्यक्तिमत्त्व घडत गेले. याच काळात त्यांनी विपुल लेखनही केले.

    सतरा-अठराव्या वर्षापासूनच त्यांच्या छंदोबद्ध कविता प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. 1930 ते 38 या काळात निरनिराळ्या दैनिकांत व साप्ताहिकांत अंतरकरांनी लेखन, वार्तांकन व संपादन केले. त्यांच्या कविता आणि गद्यलेखन ‘संजीवनी’, ‘विहार’, ‘विविधवृत्त’, ‘मौज’, ‘सत्यकथा’, ‘प्रभात’, ‘चित्रा’, ‘आशा’, ‘धनुर्धारी’, आदी नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले. वेगवेगळ्या चौदा टोपणनावांनी ते हे लेखन करीत असत. याखेरीज ‘आकाशवाणी’साठी ते दर आठवड्याला एक श्रुतिकाही लिहीत असत. ‘चोरटे हल्ले’ आणि ‘गाळीव रत्ने’ ही प्रसिद्ध झालेली अंतरकरांची पुस्तके अभिजात विनोदाचा उत्कृष्ट नमुना म्हणून गाजली.

    १९३८ साली, वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी ‘सत्यकथा’ या तेव्हा अगदी गंभीर स्वरूपात प्रसिद्ध होत असलेल्या मासिकाचे ते कार्यकारी संपादक बनले आणि पुढे गाजलेल्या अनेक लेखकांचे उत्तम साहित्य त्यात साक्षेपाने प्रसिद्ध करून त्यांनी त्या मासिकाला आघाडीचे ललित साहित्यिक मासिक बनवले. १९४२ ते ४५ या काळात त्यांनी ‘वसंत’ या मासिकाचे संपादन समर्थपणे केले.
    साहित्यक्षेत्रातील पूर्ण एक तपाच्या तपश्च्र्येनंतर अनंत अंतरकरांना ओढ लागली होती ती स्वत:च्या मालकीचे एक सर्वांगसुंदर आणि अभिरुचिसंपन्न मासिक काढण्याची. आपले हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी अविश्रांत श्रम करून, प्रसंगी अर्धपोटी राहून थोडीशी पुंजी जमा केली आणि १९४६ मध्ये ‘हंस’ हे स्वत:चे मासिक सुरू केले. ‘हंस’च्या पाठोपाठ अंतरकरांनी १९५० साली विनोदप्रधान ‘मोहिनी’ची स्थापना केली आणि नंतर चार वर्षांनी १९५४ मध्ये सर्वार्थाने नवलपूर्ण अशा ‘नवल’ या मासिकाचा आरंभ केला. याच काळात या मासिकांची कचेरी त्यांनी दुबईहून पुण्याला हलवली.
    ‘हंस’च्या द्वारे कलात्मक कथावाङ्मयाला प्रोत्साहन देऊन त्यांनी यशस्वीरीत्या त्याचे पोषण व संवर्धन केले. नव्याने रूढ होत असलेल्या लघुकथेला अधिक प्रतिष्ठा प्राप्त करून देऊन त्यांनी एक नवेच ‘हंसयुग’ मराठी वाङ्मयात प्रस्थापित केले. कोणत्याही विशिष्ट संप्रदायाचा पगडा बसू न देता स्वच्छंद कथेच्या स्वायत्त अस्तित्वाला मान्यता देणारे ‘हंस’ हे एकमेव मासिक ठरले. गेल्या काही पिढ्यांतल्या श्रेष्ठसाहित्यिकांची सुरुवात ‘हंस’ व ‘मोहिनी’ या मासिकांमधून झाली आहे.

    ‘हंस’मध्ये कथांबरोबरच श्री. म. माटे, श्री. के. क्षीरसागर, वसंत शांताराम देसाई यांचे वैचारिक व समीक्षात्मक साहित्यदेखील नियमितपणे प्रसिद्ध झाले. विनोदी लेख, कथा, व्यंगचित्रे, नाटक-चित्रपटादी कलांचा आस्वाद यांच्यासाठी ‘मोहिनी’ हे एक दर्जेदार व्यासपीठ त्यांनी निर्माण केले. मुखपृष्ठावरील हास्यचित्र हे मोहिनीचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य बनले. विनोदलेखनाच्या विकासात ‘मोहिनी’ने केलेल्या योगदानाची महती सुप्रसिद्ध समीक्षक वा. ल. कुलकर्णी यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सांगितली होती. ‘नवल’मुळे रहस्यमय, भयकारी, विस्मयकारी, विज्ञानाधिष्ठित, आदी आगळ्या आणि उपेक्षित साहित्यप्रकारांना उचित आणि मानाचे प्रतिष्ठान मराठीत प्रथमच प्राप्त झाले. भारतीय साहित्यकोषात तज्ज्ञ अभ्यासकांनी विज्ञानकथेचे अस्तित्व मराठीत टिकवून धरण्याचे श्रेय केवळ ‘नवल’ला दिलेले आहे. रत्नाकर मतकरी आणि नारायण धारप यांनी या मासिकासाठी लिहिलेल्या कथांमध्ये वैचित्र्याबरोबरच साहित्यगुणही होते. वेगळ्या प्रकारचे लेखन करणार्याठ तरुण लेखकांची पिढी ‘नवल’मधून उभी राहिली. मराठी वाङ्मयाच्या विकासाला अंतरकरांच्या अभिजात आणि उदारमनस्क संपादकीय दूरदृष्टीने नेमकी दिशा दिली. त्यांच्या तीनही मासिकांचे आपापले वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप इतके विलोभनीय आणि सौंदर्यसंपन्न होते, की समकालीन नियतकालिकांनी त्यांचे अनुकरण केले. त्यांच्या मासिकांच्या धर्तीची बरीच मासिके पुढे सुरू झाली. केवळ ‘नव’संप्रदायात संकुचितपणाने अडकून न बसणार्याम लघुकथा, गूढकथा, फँटसी, रहस्यकथा, भयकथा यांसारख्या अनेक नवीन कथाविधांचा विकास मराठीत होऊ शकला तो अंतरकरांच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळेच.

    कथेच्या स्वायत्त स्वरूपाचे अंतरकरांनी हिरिरीने रक्षण केले. त्यामुळे जी.ए. कुलकर्णी, दि. बा. मोकाशी, गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, द. पां. खांबेटे, वसुंधरा पटवर्धन यांच्यासारख्या अनेक असामान्य लेखकांच्या प्रतिभेचे नवनवोन्मेष मराठी साहित्याला संपन्न करते झाले. नवनवीन कथालेखक व कथेबाबतचे नवनवे प्रयोग पुढे आणण्याबाबत अंतरकर नेहमी प्रयत्नशील असत. लेखकांमधील प्रतिभेचा स्फुल्लिंग नेमका हेरणे, तो फुलवणे, लेखकाशी त्याचे लेखन अधिक प्रत्ययकारी कसे होऊ शकेल याबाबत विचारविनिमय करणे, त्याला आणखी कोणत्या प्रकारचे लेखन शक्य होईल याबाबत मार्गदर्शन करणे, प्रसंगी एखाद्याचे लिखाण पूर्णपणे पुन्हा लिहिणे, कथास्पर्धा घेणे, अशा नानाविध प्रकारे नव्या लेखकांची पिढी निर्माण करण्याचे कार्य अंतरकरांनी निष्ठेने आणि परिश्रमपूर्वक सातत्याने केले. नव्या लेखकांना उपयुक्त ठरेल असा वाङ्मयविचारही त्यांनी आपल्या मासिकांतून- विशेषत: ‘हंस’मधून- विपुल प्रमाणात दिला.

    लेखकांप्रमाणेच वाचकांनाही घडवण्याचे कार्य अंतरकरांना महत्त्वाचे वाटे. वाचकांची साहित्यविषयक दृष्टी अधिक विशाल व जाणती करण्याच्या उद्देशाने अंतरकरांनी एक महत्त्वाचा उपक्रम चालवला, तो म्हणजे श्रेष्ठ अशा परकीय साहित्यकृतींचा मूल्यमापनासहित परिचय. अनेक भारतीय आणि परकीय भाषांतील अभिजात साहित्याचे सरस अनुवादही अंतरकरांनी आपल्या मासिकांतून प्रसिद्ध केले. अनुवादित कथांची स्पर्धा ते आयोजित करीत असत. दर्जेदार जागतिक वाङ्मयाच्या संदर्भात मराठी साहित्याचा विचार होण्यासाठी आणि त्याचा वेगळ्या दिशेने विकास होण्यासाठी या उपक्रमांचा निश्चिततच हातभार लागला. ‘हंस’-‘मोहिनी’मधील हास्यचित्रांचा दर्जा तत्कालीन इतर मराठी नियतकालिकांमधील हास्यचित्रांच्या तुलनेत फार वरचा होता. अंतरकरांनी अनेक विदेशी मासिकांमधल्या चित्रांची उदाहरणे दाखवून, चर्चा करून हास्यचित्रकारांचे मन:पूर्वक प्रबोधन केले. विदेशी हास्यचित्रांबद्दलचे आस्वादपर लेखही त्यांनी आवर्जून प्रसिद्ध केले. त्यामुळे कमीत कमी व मार्मिक शब्दांचा आधार घेणारी, रेखासुंदर, सुबुद्ध हास्यचित्रे साकार होऊ लागली. सजावट हा अंतरकरांच्या मासिकांचा मानबिंदू होता. मुळातच तल्लख असलेल्या दृश्य सौंदर्यदृष्टीमुळे चित्रकारांच्या कलेला न्याय देणारे उत्तम ले-आऊट्स आणि तंत्राचा अधिकाधिक उपयोग करून साधलेले परिपूर्ण मुद्रण त्यांच्या मासिकांना अधिक वैशिष्ट्यपूर्ण बनवीत असे.

    स्वत: सर्जनशील लेखक आणि उत्तम चित्रकार असलेले अंतरकर हे मराठीमधील एक दुर्मिळ, निष्ठावंत संपादक. मराठीत सर्वाधिक पुस्तके ज्यांना अर्पण केली गेली आहेत असे एकमेव संपादक.
    अभिरुचिसंपन्न कलात्मकता हा जीवनोद्देश असलेली अंतरकरांची मासिके जाहिरातींचा आधार बाणेदारपणे नाकारूनही, कोणतेही सरकारी अनुदान वा सवलत न घेता, केवळ रसिक वाचकांमधील लोकप्रियतेच्या जोरावर यशस्वी झाली. मराठी वाचकांची कथाभिरुची संपन्न करणार्याक हया द्रष्ट्या संपादकाचे ४ ऑक्टोबर १९६६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. अरुणा अंतरकर, हेमलता अंतरकर

  • महात्मा गांधींची भूमिका अजरामर करणारे अभिनेते सर बेन किंग्जले

    महात्मा गांधींची भूमिका अजरामर करणारे अभिनेते सर बेन किंग्जले यांचा जन्म ३१ डिसेंबर १९४३ रोजी झाला.
    बेन किंग्जले हे मूळत: भारतीय वंशाचेच आहेत आणि त्याचं मूळ नाव कृष्णा भानजी. ते मूळचे गुजरातीच. त्याचे वडील गुजराती होते. किंग्जले यांच्या वडीलाचां जन्म केनियात झाला.त्यांचे आजोबा व्यापारी म्हणून जांजीबार स्थायिक झाले. किंग्सले यांचा जन्म जांजीबारचा ते वयाच्या १४ व्या वर्षी आपल्या वडीलाच्या बरोबर इंग्लण्डला गेले. बेन किंग्जले हे गांधी चित्रपटात इतके गांधींच्या भूमिकेत फिट्ट बसले, की आजही हॉलिवुडमध्ये आणि भारतात ‘गांधी’मधील त्या भूमिकेसाठीच ते ओळखले जातात. बेन किंग्जले यांना आपल्या सुरुवातीच्या काळात ‘गांधी’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्या मुळे त्यांनी अभिनयाचे शिखर लवकरच सर केलं.

    बेन किंग्जले यांनी साकारलेल्या गांधी या भूमिकेत सर्वाधिक लक्षात राहिले ते डोळे. त्यांनी निर्धार, करुणा, संताप, दु:ख आणि बरीचशी मिश्किली अशा विविध मुद्रा बेननं सहजपणे दाखवल्या. दांडी यात्रेत तरातरा चालणारे ‘सुपरफिट’ गांधीजी, उपोषणांमुळे थकलेले तरीही न खचलेले गांधीजी, त्यांचे भक्तगण बनलेल्या अनेक गोऱ्या मंडळींच्या फिरक्या घेणारे गांधीजी, कस्तुरबांच्या निधनामुळे प्रचंड व्यथित झालेले गांधीजी, फाळणीच्या अपरिहार्यतेपुढे अगतिक झालेले गांधीजी अशा कितीतरी छटा. अॅटमबरो आणि किंग्जले यांची सर्वात मोठी कामगिरी म्हणावी तर त्यांनी भारताचे राष्ट्रपिता नवीन पिढीसमोर पुन्हा जिवंत केले. बेन किंग्जले यांनी शटर आयलंड, आयर्न मॅन, प्रिंस ऑफ पर्शिया अश्या हॉलीवूड मधील चित्रपटात देखील काम केले आहे. तसेच जंगलबुक मध्ये मोगलीचा मित्र बगिराला याचा आवाज त्यांनी दिला आहे, त्यांनी बॉलीवूड मधील 'तीन पत्ती' 'ताज' या चित्रपटात काम केले आहे.

    बेन किंग्जले यांना अकादमी पुरस्कार, बाफ्टा, गोल्डन ग्लोब पुरस्कार व स्क्रीन एक्टर्स गिल्ड अवार्ड्स असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    गांधी चित्रपट
    https://www.youtube.com/watch?v=XyWRx_2MFbk