(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कविवर्य वासुदेव गोविंद ऊर्फ वा. गो. मायदेव

    कवी मायदेव म्हटले की, कवितांची आवड असणाऱ्या जु्न्या पिढीतील वाचकांना हटकून आठवणार ती त्यांची 'गाइ घरा आल्या' ही सुंदर कविता. त्यांचा जन्म २६ जुलै १८९४ रोजी झाला. सकाळी चरायला गेलेल्या गाई संध्याकाळी घरी आल्या तरी गाई राखायला गेलेला 'वनमाळी' मात्र काही घरी आलेला नसतो.

    कातरवेळ उलटते, रात्रही होते, तरी वनमाळी न आल्यामुळे आईच्या जिवाची जी उलघाल होते, तिचे वर्णन मायदेव यांनी या कवितेत अतिशय साध्या-सोप्या शब्दांत केले आहे. ही कविता हीच मायदेव यांची ओळख होती. १९२९ साली त्यांनी ती लिहिली.

    १९१५ ते १९२९ या कालखंडात त्यांच्या हातून ज्या कविता लिहून झाल्या, त्या सर्व कविता 'भावतरंग' या संग्रहात वाचायला मिळतात. 'गाइ घरा आल्या' ही कविता याच संग्रहात आहे.

    कवी मायदेव रविकिरण मंडळातील कवींचे म्हणजे, माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन, यशवंत, गिरीश, श्री. बा. रानडे आदींचे समकालीन कवी. गंभीर विचारवृत्तीच्या; तसेच बालांसाठीच्या विपुल कविता मायदेव यांनी लिहिल्या. त्या काळी लहान मुलांमध्ये मायदेव यांच्या बालकविता विशेष आवडीच्या असत. कवी वनमाळी या टोपणनावानेही ते साहित्यक्षेत्रात परिचित होते.

    'काव्यमकरंद', 'भावतरंग', 'भावनिर्झर', 'सुधा', 'भावविहार' हे त्यांचे काव्यसंग्रह; तर 'बालविहार', 'किलबिल', 'शिशुगीत', 'क्रीडागीत' हे बालगीत संग्रह प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भा. रा. तांबे यांच्या कवितांचेही संपादन मा.मायदेव यांनी केले होते. मा.मायदेव यांचे ३० मार्च १९६९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    मायदेव यांची गाइ घरा आल्या कविता
    .............................
    गाइ घरा आल्या
    .............................
    गाइ घरा आल्या । घणघण घंटानाद
    कुणीकडे घालू साद । गोविंदा रे? ।। १ ।।
    गाइ घरा आल्या । धूळ झाली चहूंकडे
    घनश्याम कोणीकडे । माझा गेला? ।। २।।
    गाइ घरा आल्या । वासरे हंबरती ।।
    कुणीकडे बालमूर्ती । कृष्ण माझा? ।।३।।
    गाइ घरा आल्या । ब्रह्मानंद वासरांना
    काय करू माझा कान्हा । चुकला का? ।।४।।
    गाइ घरा आल्या । घोटाळती पाडसांशी
    हाय! नाही हृषीकेशी । माझ्यापाशी ।।५।।
    गाइ घरा आल्या । पाडसास हुंगीतात
    माझा मात्र यदुनाथ । दुरावला! ।।६।।
    गाइ घरा आल्या । आंवरेना मुळी पान्हा
    राहणार भुका तान्हा । वासुदेव ।।७।।
    गाइ घरा आल्या । दूध वाहे झुरूझुरू
    माझ्या जीवा हुरूहूरू । मुकुंदाची ।।८।।
    गाइ घरा आल्या । दूधवाट राहियेली
    कुणी माझा वनमाळी । गुंतवीला ।।९।।
    गाइ घरा आल्या । झाली बाई कातरवेळ
    आजुनी का घननीळ । ये ना घरा? ।।१०।।
    गाइ घरा आल्या । लावियेली सांजवात
    बाळा दामोदरा रात । झाली न का? ।।११।।
    गाइ घरा आल्या । पाल चूकचूक करी ।
    राख अंबे माझा हरी । असे तेथे ।।१२।।

      July 29, 2017


  • भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम

    ते उत्तम वीणावादक होते. डॉ. कलाम यांना कर्नाटक संगीतात रुची होती. ‘विंग्ज ऑफ फायर’, ‘इंडिया २०२०’ आणि ‘इग्निटेड माइंड्‌स’ ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत.

      October 15, 2021


  • ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा

    ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या दहा वर्षांच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही केले.

      December 28, 2021


  • ज्येष्ठ नाट्यनिर्माते उत्तम भदू उर्फ मामा पेडणेकर

    त्यांनी आपल्या संतोषी थिएटर्स संस्थेच्या वतीने जय देवी संतोषी माता,बायका त्या बायकाच, नाते युगायुगाचे, मृत्युंजय, छावा,पंखांना ओढ़ पावलांची,नटसम्राट (यशवंत दत्त, सुलभा देशपांडे),राजसन्यास संगीत एकच प्याला, बेबंदशाही, लग्नाची बेडी आदी नाटकांची निर्मिती केली होती. १९८० च्या सुमारास माटुंग्याच्या षण्मुखानंद हॉलमध्ये जनता दराने नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. मराठी रसिकांना आपलीशी वाटणारी नाट्यगृहे कमी पडतात याचा अंदाज आल्यावर, घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या शेजारचे झवेरबेन नाट्यगृह मामांनी मराठी नाटक आणि रसिकांसाठी खुले केले.

      April 9, 2022


  • मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते संदीप कुलकर्णी

    त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९६४ रोजी पुणे येथे झाला. डोंबिवली फास्ट’मुळे माधव आपटे म्हणून घराघरात पोहोचलेले संदीप कुलकर्णी यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. पंडित सत्यदेव दुबे यांच्या मार्गदर्शना खाली त्यांनी अभिनयाला सुरवात केली होती. मराठी चित्रपट सृष्टीला वेगळे वळण देणाऱ्या "श्वास" आणि "डोम्बिवली फास्ट" या चित्रपटांमध्ये त्यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या भूमिकांसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 'अवंतिका' मालिकेत त्यांनी काम केले होते. मराठी चित्रपटाला अंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. ते उत्तम चित्रकार ही आहेत.

    बेधुंद, 'मी बाप', 'मेड इन चायना ' आणि 'साने गुरुजी' या चित्रपटात त्यांचा उत्कृष्ठ अभिनय बघायला मिळाला. २००८ मध्ये नायजेरियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये कुलकर्णी यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 27, 2017


  • मराठी चित्रपटांतील अभिनेत्री मनोरमा वागळे

    मनोरमा वागळे यांनी अभिनय शिकावा, संगीत विषयात प्राविण्य मिळवावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे शाळा-महाविद्यालयातून अनेक दर्जेदार नाटकांमधून त्यांनी अनेक भूमिका केल्या. त्यासोबतच गोवा हिंदू असोसिएशन मुळे मास्टर दत्ताराम यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. गोविंदराव अग्नी, बी.आर देवधर, पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांसारख्या दिग्गज मंडळींकडून संगीत आणि गायनाचं शिक्षण त्यांनी घेतलं, तर ज्येष्ठ पार्श्वगायक आर.एन. पराडकरांकडून सुगम आणि नाट्यसंगीताचं प्रशिक्षण घेतलं. खास गंधर्व गायकीचे नाट्यसंगीत हे त्यांना गोविंदराव वेर्लेकर यांनी शिकवलं.

    गोवा हिंदू असोसिएशनच्या महिला शाखेतून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं आणि खडाष्टक या नाटकातील तडाखेबाज रागिणीच्या भूमिकेसाठी सुमती तेलंग यांना उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारही मिळाला. पुढे मनोहर वागळेंशी विवाहबद्ध झाल्यानंतर सुमती तेलंगच्या मनोरमा वागळे झाल्या. खरंतर लग्नानंतरच्या चित्रपटात त्यांनी ज्या काही भूमिका रंगवल्या त्यामुळेच त्या नावारुपास येऊ लागल्या.चित्रपटातल्या अनेक खाष्ट, कजाग, खलनायिका आणि सहकलाकारांच्या भूमिकांमुळे प्रेक्षकांना त्यांचा अभिनय आवडू लागला कारण त्यामध्ये कजाग आणि विनोदी ढंगाचं मिश्रण होतं. याचा अनुभव आपल्यापैकी अनेक जणांनी राजा ने वाजवला बाजा या चित्रपटातनं घेतला असेल. सुरुवातीला खाष्ट सासू पण चित्रपटात काही प्रसंगात जेव्हा शत्रूंकडून गोची होते तेव्हाचा तो प्रसंग पाहून हसू आल्याशिवाय राहवत नाही. अनेक विनोदी आणि गंभीरपूर्ण नाटकांतून मनोरमा वागळे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

    बबन प्रभूंचे फार्सिकल नाटक दिनूच्या सासूबाई राधाबाई मधली त्यांची सासूबाई ही भूमिका अविस्मरणीय ठरली. १९८५ ते १९९५ पर्यंत या नाटकाचे प्रयोग रंगभूमीवर होत राहिले. सर्व कलाकार बदलले पण सासूबाई मात्र कायम राहिल्या. मनोरमाबाई वागळेंच्या विनोदी चित्रपटांमध्ये गंमत-जंमत, आम्ही दोघे राजा राणी, गडबड घोटाळा, घरजावई या चित्रपटांचा तर स्त्री प्रधान चित्रपटांसाठी उंबरठा आणि आत्मविश्वास यांमधील त्यांच्या भूमिका लक्षात राहतात.

    हिंदी चित्रपटांमध्ये लाईफलाईन, आगे की सोच, सिकंदर यांचा समावेश होतो. यासोबतच अनेक जाहिराती, दूरदर्शन, मालिका, नाटकं यामधून मनोरमा वागळे यांनी आपल्या अभिनयाची लक्षात राहण्यासारखी चुणूक दाखवून दिली आहे. मा.मनोरमा वागळे यांचे २७ ऑगस्ट २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- सागर मालाडकर / marathisrushti.com

      August 27, 2017


  • ज्येष्ठ गायक पंडित प्रभाकर कारेकर

    ‘प्रिये पाहा’ ही कारेकर यांची प्रकाशित झालेली पहिली ध्वनिमुद्रिका. ‘एचएमव्ही’ कंपनीने ती काढली होती. पुढे प्रभाकर कारेकर यांनी गायलेली नाटय़पदे, भजने, शास्त्रीय गायन आदींच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या. महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही पं. कारेकर यांच्या दहा हजारांहून अधिक मैफली व कार्यक्रम आजवर झाले आहेत.

      July 4, 2022


  • साहित्यिक व पटकथालेखक प्रभाकर तामणे

    ज्यांच्या कथांवर अनेक मराठी आणि 'बीवी ओ बीवी' हा हिंदी चित्रपट निघाला, ते प्रा.प्रभाकर तामणे यांनी 'पुनर्मीलन', 'रात्र कधी संपू नये', 'जीवनचक्र' आदी कादंबऱ्या पण लिहिल्या पण प्रा.प्रभाकर तामणे गाजले ते विनोदी कथाकार म्हणून. मा.प्रभाकर ताम्हणे यांचे ७ मार्च २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 15, 2017


  • हुतात्मा बाबू गेनू

    १९३० साली वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली. पुढे शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपड्याच्या बंदीची चळवळीत ते सक्रीय झाले. त्यांचे लौकीक अर्थाने फारसे शिक्षण झालेले नसले तरी देशप्रेमाची मशाल मात्र त्यांच्या मनात सतत धगधगत होती.

      December 12, 2021


  • बासरीवादक पन्नालाल घोष

    प्रतिभावान बासरीवादक पन्नालाल घोष ऊर्फ अमोल ज्योती घोष यांना बासरींच शिक्षण देण्यासाठी वयाच्या ३६ व्या वर्षांपर्यंत कोणी गुरुच नव्हता.

      July 24, 2017