दादरच्या जडणघडणीत, विशेषतः तिथल्या सामाजिक घडणीत काही मंडळींचा वाटा आहे. त्यांत एक भागोजी कीर हे आहेत. आज भागोजी कीर असते तर त्यांचा उल्लेख ‘मॅनेजमेंट गुरू’ असा झाला असता. त्यांची पुस्तकं निघाली असती. आयआयएममध्ये त्यांना लेक्चर देण्यासाठी पाचारण केलं गेलं असतं.
March 16, 2022
सतीश जकातदार मनोहर मासिकांत सिनेमावर लेखन करीत असत. शिवाय माणूसमध्ये ते कलात्मक चित्रपटांवर लेखन करत असत.
October 27, 2021
हिंदी चित्रपटसृष्टी प्रमाणे आपल्याकडे रुबाबदार नायक अपवादानेच उदयास आले, असा टीकेचा सूरही आळविला जातो. त्यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला. या टीकेवर उत्तर म्हणजे अरुण शंकरराव सरनाईक हे नाव. एका परिपूर्ण अभिनेत्याकडे ज्या काही गोष्टी लागतात, त्या सर्वांचा अंतर्भाव सरनाईक यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये पाहायला मिळाला होता.
अरुण सरनाईक यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीतज्ज्ञ होते तर त्याचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक. गाण्याचं हे अंग त्यांना या जोडीकडूनच मिळालं. त्यामुळे अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच त्यांनी पेटी, तबल्यात मातब्बरी मिळवली होती. मो. ग. रांगणेकर हे "भटाला दिली ओसरी' हे नाटक बसवीत होते. या नाटकात अरुणनं काम केलं. याच वेळी एक उत्कृष्ट संधी अरुणपुढे चालून आली. विख्यात दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या डोक्याात "शाहीर प्रभाकर' हा चित्रपट करण्याचं घोळत होतं. यातील शीर्षक व्यक्तिरेखा अरुण सरनाईक यांनी साकारावी, असं त्यांच्या मनात होतं. परंतु, हा चित्रपट काही कारणांमुळे बनला नाही आणि अरुण सरनाईक यांचे चित्रपटसृष्टीतील पदार्पण काही काळ लांबलं.
प्रख्यात लेखक-दिग्दर्शक अनंत माने यांनी "शाहीर परशुराम' चित्रपटात अरुण सरनाईक यांना एक दुय्यम भूमिका दिली. "रंगल्या रात्री अशा' या चित्रपटानं किमया केली आणि अरुण सरनाईक यांचा अरुणोदय झाला. या चित्रपटानं सरनाईकांना मोठा "फॅन फॉलोअर' मिळाला. आजच्या पिढीला कदाचित अरुण सरनाईक हे नाव तेवढे अवगत नसेल पण ७०-८० च्या दशकात अरुण सरनाईक हे मराठीतील सुपरस्टार होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे या काळातले मोठे चाहते ठरले. या चित्रपटासाठी प्रख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखॉं यांनी तबलावादन केलं होतं. प्रत्यक्ष चित्रपटात तबल्यावरील सरनाईकांची सफाई पाहून अल्लारखॉंनी त्यांचं कौतुक केलं होतं. त्यापुढं जात शिवसेनाप्रमुखांनी या कलावंताचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचं भाकीत केलं आणि नंतर ते खरं ठरलं. बुलंद आवाज, अभिनय आणि संवादफेकीच्या जोरावर हा कलावंत बघताबघता इतरांच्या पुढं गेला.
त्या काळातला चित्रपट हा ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या कथानकांच्या उंबरठ्यावर होता. सरनाईकांनी या दोन्ही प्रकारांमध्ये मातब्बरी मिळवली. सुरुवातीच्या काळातच त्यांनी भूमिकांची प्रयोगशीलता जपली. राजा ठाकूर दिग्दर्शित "पाहू रे किती वाट' या चित्रपटात ते डॉ. चारुदत्त या नायकाच्या व्यक्तिरेखेत झलकले तर "सुभद्राहरण' या चित्रपटात त्यांनी थेट दुर्योधनाचा खलनायक साकारला. सरनाईकांची कारकीर्द उंचावली जाण्यास कारणीभूत ठरलेले चित्रपट म्हणजे "एक गाव बारा भानगडी', "केला इशारा जाता जाता', "सवाल माझा ऐका', "सिंहासन' आदी चित्रपट. "सवाल माझा ऐका'मधील त्यांचा ढोलकीवाला जयवंत आजही रसिकांच्या लक्षात आहे. असाच ढोलकीवाला त्यांनी "केला इशारा जाता जाता' या चित्रपटातही साकारला होता.
"पाच नाजूक बोटे' या चित्रपटात सरनाईकांनी सज्जन आणि दुर्जन भावांची दुहेरी भूमिका मोठ्या ताकदीनं सादर केली. "मुंबईचा जावई'मधील सरनाईकांचा नाट्यवेडा अविनाश लक्षणीय ठरला. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित "सिंहासन' मधील मुख्यमंत्र्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यनक असलेले भावदर्शन सरनाईकांनी या व्यक्तिरेखेत एकवटले होते. सरनाईकांमधील संगीताचा आविष्कार पडद्यावर आणण्यास कारणीभूत ठरले ते संगीतकार राम कदम. "डोंगरची मैना' आणि "गणगौळण' या दोन चित्रपटात कदम यांनी सरनाईकांना पार्श्वेगायनाची संधी दिली. "घरकुल' या चित्रपटासाठी सी. रामचंद्र यांनी त्यांच्याकडून "पप्पा सांगा कुणाचे' हे अजरामर गीत गाऊन घेतलं. त्यानंतर काही वर्षांनी आलेल्या "चंदनाची चोळी अंग अंग जाळी' या चित्रपटामधील "एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला गं...' हे गाणंही सरनाईकांमधील श्रेष्ठ गायकावर शिक्कामोर्तब करणारं ठरलं. चित्रीकरणातून वेळ मिळाला की कुष्ठरुग्णांसाठी काम करणाऱ्या "आनंदग्राम'मध्ये ते स्वतःला झोकून द्यायचे. अरुण सरनाईक यांचे २१ जून १९८४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- मंदार जोशी / इंटरनेट
October 4, 2017
डॉ. विजया वाड या निशिगंधा वाड यांच्या आई. त्यांचा जन्म ११ आक्टोबर १९६९ रोजी झाला. निशिगंधा वाड यांना वयाच्या अकराव्या वर्षी अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली निशिगंधा वाड या १९८५ मध्ये झालेल्या १० वीच्या परीक्षेत पहिल्या पन्ना्सात, आणि नंतर बारावीला मेरिटमध्ये तिसर्यान आल्या होत्या.
१९९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक. काळाच्या बंधनास न जुमानणारं लावण्य, सौंदर्य खचितच ज्या व्यक्तिंवर मेहरनजर करतं, त्यांपैकी एक म्हणजे निशीगंधाजी. १९९० च्या सुमारास व्यावसायिक चित्रपटांमध्ये त्यांचे पदार्पण झाले. गालावरल्या त्या दोन खळ्यांनी कित्येक श्वासांचे लगाम खेचले असतील याची फक्त कल्पनाच केलेली बरी. भारतीय आणि ब्रिटिश रंगभूमीवरील स्त्रीची बदलती भूमिका या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी निशिगंधा वाड यांनी १०० वर्षांचा ऐतिहासिक कालखंड घेऊन तौलनिक अभ्यास केला.
२००३ मध्ये मुंबई विद्यापीठानं त्यांना पीएच.डी. बहाल केली. नंतर निशीगंधा वाड यांना कोलंबिया विद्यापीठाने डी. लिट. पदवी दिली आहे. निशीगंधा वाड. एक सालस, चिकित्सक, अभ्यासू व्यक्तिमत्व. त्यांनी काही मराठी बरोबरच हिंदी चित्रपटांतूनही काम केले आहे. सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर शंभरहूनही अधिक चित्रपट त्यांच्या नावे आले. 'शेजारी-शेजारी', 'वाजवा रे वाजवा', 'एकापेक्षा एक', 'प्रतिकार', 'सासर माहेर', 'अशी ही ज्ञानेश्वरी' यांसारखे मराठी तसेच 'सलिम लंगडे पे मत रो', 'कर्म योद्धा', 'दादागिरी', 'आप मुझे अच्छे लगने लगे' यांसारखे हिंदी चित्रपट त्यांनी केले. 'कुलवधू' (मराठी) व 'झी हॉरर शो' (हिंदी) यांसारख्या मालिकाही त्यांनी केल्या.
अभिनयासोबतच एक उत्तम लेखिका म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. त्यांनी लिहीलेल्या पाच पुस्तकांपैकी तीन पुस्तकांना राज्य शासनाचा मानाचा पुरस्कार मिळाला. मराठी व ब्रिटीश रंगभूमी व चित्रसृष्टीतील दृष्टीकोनातून स्त्रियांची समाजातील बदलती भूमिका या विषयावर मुंबई विद्यापीठात त्यांनी केलेले संशोधन त्यांच्या विद्वत्तेचीही ग्वाही देते. रिलीजीयस हार्मनी फाऊंडेशन निर्मित धार्मिक सलोखा या विषयावरील व्याख्यानपटाच्या त्या व्याख्यात्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-इंटरनेट
November 11, 2017
मीनाकुमारी एक शायरां (उर्दू कवयित्री) सुध्दा होत्या हे खूप जणांना माहित नसेल.
त्यांचे काव्यातलं नाव (तखल्लुस) होतं नाझ. उर्दू शायरीसाठी वरदान ठरणारी दुःखाची देणगी त्यांना व्यक्तिगत जीवनातही भरपूर लाभली होती, असं म्हणतात.
हे दोन शेर मा.मीनाकुमारी यांचे
आगाज तो होता है, अंजाम नहीं होता
जब मेरी कहानीमें, वो नाम नहीं होता.....
हंस हंस के जवॉं दिलके हम क्यों न चुने टुकडे
हर शख्स की किस्मत में ईनाम नहीं होता....
ती म्हणते, माझी प्रेमाची कहाणी सांगायला (अथवा लिहायला) मी सुरुवात (आगाज) तर करते; पण ते नाव वगळून माझी कहाणी पुढे जाऊच शकत नाही; व तिचा शेवटही (अंजाम) होऊ शकत नाही.
पण तरीही ते नाव ती कवितेत गुंफत नाही. ते नाव तिला अव्यक्तच ठेवावंसं वाटतं. कारण, प्रेमातील वफादारीला( विश्वास) बाधा येऊ नये. एकवेळ कहाणी ‘अधूरी’ राहिली तरी चालेल !
दुस-या शेरात तिनं म्हटलंय्,
-----हृदयाचे झालेले तुकडेही हसत हसत गोळा करायला काय हरकत आहे? प्रत्येकाच्याच नशिबात, प्रेमासाठी प्रतिप्रेमाचं बक्षीस (ईनाम) मिळणं लिहिलेलं नसतं !....
हाही ख-या प्रीतीचा आणकी एक गुण ! जे मिळेल ते स्वीकारायचं. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं तिच्याकडून आपल्याला प्रेम मिळालंच पाहिजे, असा हट्ट का असावा? ते दान मिळणार नाही हेही स्वीकारायचं. असं निरपेक्ष प्रेम करता आलं पाहिजे...
प्रेमाची अपेक्षा करता येईल असं एकच ठिकाण आहे; तिथं आपलं प्रेम रुजू होईल व त्याला प्रेमाच्या रूपाने उत्तरही मिळेल; ते ठिकाण म्हणजे...ईश्वर !!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
August 18, 2017
योगेश्वर अभ्यंकर हे महान गीतकार होऊन गेले. त्यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.'अक्रुरा नेऊ नको माधवा, अजिंक्य भारत अजिंक्य, अभिमानाने मीरा वदते, अमृताची गोडी तुझ्या, आज मी नाथा घरी आले' यासारखी एकाहून सरस गाणी त्यांनी लिहिली व त्याकाळच्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये ती गाजली. सर्जनशील कवी म्हणून त्यांची ओळख होती. योगेश्वर अभ्यंकर यांचे १४ नोव्हेंबर २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 6, 2017
होशवालों को खबर का, आ भी जा ए सुबह आभी जा... या गाजलेल्या गजलांचे शायर सुप्रसिद्ध उर्दू शायर निदा फाजली.त्यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३८ रोजी झाला.निदा फाजली यांचे पिता मुर्तुज़ा हसन हे सुध्दा कवी होते. त्यांचे बालपण ग्वालियरमध्ये गेले होते. तेथेच त्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले त्यानंतर ते शायरीकडे वळाले. देशाच्या फाळणीवेळी कुटुंबीयांसोबत पाकिस्तानात न जाता, भारतातच राहण्याचा निर्णय घेणाऱ्या निदा फाजली यांनी ग्वाल्हेर कॉलेजमधून पदव्युत्तर पदवी घेतली होती. सूरदास यांच्या एका कवितेनं प्रभावित होऊन त्यांनी शायर व्हायचं ठरवलं होतं आणि प्रतिभेच्या जोरावर त्यांनी साहित्यक्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. मा. निदा फाजली यांच्या कविता म्हणजे, आयुष्याच्या प्रत्येक परिघातून दु:खाला अन् वेदनेला छेदणारी अनुभूती होती. एकदा मा.निदा फाजली गंभीर आजारी पडले होते, त्यांना रुग्णालयात भरती केले होते. त्यांच्या आजारपणाची बातमी त्यांच्या चाहत्यांना बेचैन करून गेली. याच चाहत्यात एक नाव होतं राजकोटच्या सह्वीस वर्षे वयाच्या मालती जोशींचे ! ह्या देखील पेशाने गायिका होत्या. त्या एका कार्यक्रमानिमित्त मुंबईला आल्या होत्या आणि त्यांना निदांच्या आजारपणाबद्दल कळले. त्या अस्वस्थ झाल्या आणि निदांना भेटायला गेल्या. या भेटीचे रुपांतर मैत्रीत आणि पुढे जाऊन नात्यात झाले. त्यांनी लग्न केले. निदांच्या अखेरच्या क्षणापर्यंत मालती जोशी त्यांच्या सावलीसारख्या सोबत होत्या. त्यांना एक मुलगीही झाली. निदांनी तिचं देखणं नाव ठेवलं, 'तहरीर' ! म्हणजे लेखनशैली, लेहजा !
त्यांचे अनेक गझला, शायरी गाजल्या. त्यातलीच, 'कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता' या गझलेनं लोकप्रियतेचं शिखर गाठलं. 'सरफरोश'मधील 'होशवालों को खबर क्या...' ही तरुणाईच्या ओठांवर रुंजी घालणारी गझलही निदा फाजली यांच्या लेखणीतूनच साकारली होती. मा.निंदा फाजली यांच्या ‘खोया हुआ सा कुछ’ या काव्यसंग्रहासाठी १९९८ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारत सरकार ने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते. मा.निदा फाजली यांचे ८ फेब्रुवारी २०१६ रोजी निधन झाले.
निदा फाजली यांचे काही शेर
क्याम हुआ शहर को कुछ भी तो दिखाई दे कहीं, यूं किया जाए कभी खुद को रुलाया जाए
घर से मस्जि द है बहुत दूर चलो यूं कर लें, किसी रोते हुए बच्चेद को हंसाया जाए
अपनी मर्जी से कहां अपने सफर के हम हैं,
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं
अब खुशी है न कोई दर्द रुलाने वाला
हम ने अपना लिया हर रंग जमाने वाला
इस अंधेरे में तो ठोकर ही उजाला देगी
रात जंगल में कोई शम्म जलाने से रही
कुछ भी बचा न कहने को हर बात हो गई
आओ कहीं शराब पिएं रात हो गई
कभी किसी को मुकम्मरल जहां नहीं मिलता
कहीं जमीं तो कहीं आसमां नहीं मिलता
कोई हिंदू कोई मुस्लिनम कोई ईसाई है
सब ने इंसान न बनने की कसम खाई है
कोशिश भी कर उम्मीेद भी रख रास्ताई भी चुन
फिर इस के बाद थोड़ा मुकद्दर तलाश कर
खुदा के हाथ में मत सौंप सारे कामों को
बदलते वक्तथ पे कुछ अपना इख्तिककार भी रख
तुम से छूट कर भी तुम्हें भूलना आसान न था
तुम को ही याद किया तुम को भुलाने के लिए
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
प्रसिद्ध मराठी कवी लोकनाथ यशवंत यांनी फाजलींच्या अद्वितीय कालातीत कवितांचा अनुवाद मराठी भाषेत केला आहे.
कवितासंग्रहातील ‘शर्त’ या पहिल्याच कवितेत
तुम्हाला सैन्यात भर्ती व्हायचं आहे?
जरूर व्हा
मात्र लक्षात असू द्या
युद्धाच्या वेळी तुमचा देश जे म्हणेल तेच सत्य असेल
आणि त्या ‘सत्या’साठी
तुम्हाला तुमच्या जीवाशी खेळावं लागेल
तुमच्या मित्रांची
आणि शत्रूंची यादी राजकारण्यांसोबत बदलत राहील.
युद्ध संपल्यानंतर
तुम्ही अमर शहीदही होऊ शकता
किंवा महामूर्खही!!
‘शहरा माझ्यासोबत चल तू’ या कवितेत फाजली म्हणतात-
शहरा,
माझ्यासोबत चल तू
ओरडणाऱ्या, लढणाऱ्या, झगडणाऱ्या
कर्फ्यू, नारे
यांच्या बाहेर निघ तू
तुझ्या शुष्क डोळ्यांत
भरली आहे रेती
वाटते तू अनेक वर्षांत झोपला नाहीस...
या कवितेतून शहरी संघर्षाचे वास्तव्य टिपलेले दिसून येते. कुठलेही शहर असो, दिवसाच काय रात्रीही आपले कार्य बजावत असते अविरत. रात्रंदिवस एक करणाऱ्या शहरात ओरडण्याचा आणि झगड्याचा कायम कर्फ्यु असतो. स्वत:च्या हक्कासाठी नारे असतात. मात्र, माणूस झोपत नाही. माणसांचं संवेदनशील मन मरतं अन् जागृतही होतं. माणसाच्या शक्तीतील फॉस्फरस भरून गेला आहे आता. त्यामुळे तो कधी रडत नाही अन् दचकतही नाही. त्याला प्रचंड आत्मविश्वास असल्यामुळे मोर्चे, जलसे आणि तमाशा नित्याचेच झाले आहे.
‘आत्महत्या’ या कवितेत ते म्हणतात -
काय खूप माणूस होता तो,
खूपच जोरदार तो म्हणायचा -
आईच्या अंधाऱ्या उदरापासून
तर स्मशानापर्यंत एकच रस्ता आहे
ज्यावर आपण चालत आहोत
चाकावर स्वार होऊन झिजत आहोत
आयुष्यभर गुंतत गेला तो स्वत:च्या आतच आत
प्रत्येक क्षणी नवा प्रश्न आणि जगणं कठीण.
संकुचित विचार करणं त्याला आवडत नव्हतं.
माणूस एकदा जन्माला आला की, त्याच्या मृत्यूच्या प्रवासाला प्रारंभ होतो. मृत्यू हा अटळ असतो. आईच्या अंधाऱ्या उदरापासून स्मशानापर्यंतचा तो रस्ता असतो. आयुष्यात ज्यांना संघर्षाची प्रार्थना करता येत नाही. तो स्वत:मध्ये गुंतत जातो. स्वत:मध्येच जळत असतो. आपल्या भावनांना वाट मोकळी करण्यास ‘स्पेस’ त्याचेजवळ नसते. त्यामुळे प्रत्येक क्षणात नवे प्रश्न अन् जगणे कठीण होते. संकुचित विचार करणे त्याला जमत नसतानाही आत्महत्येच्या टोकापर्यंत जावे लागते, ही मानवी शोकांतिकाच नाही तर काय?
सहज सोप्या कवितांमधून जीवनाचे तत्त्वज्ञान निदा फाजली यांनी मांडले आहे. वेगवेगळ्या प्रतिमा आणि प्रतीके वापरून उजेडवाटाही दाखविल्या आहेत. ‘ईश्वराच्या या दुनियेला ईश्वरच जबाबदार आहे’ असा प्रवास या काव्यसंग्रहातून दिसून येतोय. युद्ध, प्रार्थना, अब्रू, एकात्मता, सत्य, इलाज, आत्महत्या, मी आज झगडलो, हे रक्त माझं नाही, वडिलांच्या मृत्यूवर, माणसाचा शोध, पासपोर्ट अधिकाऱ्याच्या नावाने, सीमेपलीकडचं, एक पत्र वाचून..., एका उद्ध्वस्त गावाची कथा, मृत्यूचा कालवा, मुंबई, लढाई, बस असेच जग राहा, इथेही आणि तिथेही यासारख्या दर्जेदार कविता वाचकांना अंतर्मुख केल्याशिवाय राहात नाहीत.
माणसात राक्षस आहे
इथेही आणि तिथेही
इश्वर रक्षक आहे
इथेही आणि तिथेही
हिंस्र राक्षसांची
फक्त नांव वेगवेगळी आहे
या कवितेतून मानवाच्या धार्मिक प्रवृत्तीचे दर्जेदार विवेचन करण्यात आले आहे. पृथ्वीवरील लोकांना स्वर्ग, जन्नत ही आयुष्याच्या अंतानंतरची दुसरी आनंदयात्रा वाटतेय. पण, माणूस माणसाजवळ असला तर कधी संवेदनशील तर कधी संवेदनाहीन होतो. तात्पर्य, माणसाला सुख कुठे मिळतेय, याचा शोध स्वत:ला घ्यावा लागणार आहे. एकीकडे टोकाची विषम स्थिती तर दुसरीकडे सम संख्येचा बाजार आज मानवालाच हिणवताना दिसतो. ठेच लागलेला माणूस आणि सुटबुटात वावरणारा माणूस भिन्न पातळीवर दिसून येतो. मनाचा आरसा कुणाला म्हणावा- माणूस धर्म धर्म करतोय, पण स्वत:चे मुडदे पाडतो आणि स्वकेंद्रित विचार करतोय. हे इथेही आणि तिथेही सुरू आहे का? हा प्रश्न वाचकाला ठिकठिकाणी वाचायला मिळतोय. देशाच्या फाळणीमुळे ज्यांचे मनोविश्व उद्ध्वस्त होऊन जाते, अशा अगणित सहृदांना हे पुस्तक लोकनाथ यशवंत यांनी अर्पण केले आहे. चित्रकार संजय मोरे यांची निर्मिती असलेला मुखपृष्ठावरील मानवी मुखवट्यांचा सुबक चेहरा पद्धतशीर वाचकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी होतो. मात्र, हाच मुखवटा कवितेचे वेगळेपण सांगून जातोय. मा.निदा फाजली यांच्या काव्यावर प्रेम करणाऱ्या मराठी वाचकांसाठी वाचनीय असा हा संग्रह आहे.
माणूस बेजार इथेही आणि तिथेही
मूळ कविता: निदा फाजली
अनुवाद: लोकनाथ यशवंत
प्रकाशक: सृजन प्रकाशन, नवी मुंबई.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
February 9, 2017
वसंत शिंदे यांनी १९४६ पासून १९९६ पर्यंत ४० दिग्दर्शकांकडे कामे केली अगदी दादासाहेब फाळके यांच्यापासून संजय सुरकरपर्यंत जवळ जवळ सर्वच म्हणावे लागतील. त्यांना ‘ सांगत्ये ऐका ‘ या चित्रपटासाठी ‘ दादासाहेब फाळके गौरवचिन्ह ‘ मिळाले, तर नाटक आणि चित्रपट यांच्यामधील भूमिकांसाठी ‘ दिनकर कामण्णा सुवर्णपदक ‘ मिळाले , शांताबाई हुबळीकर पुरस्कार , बालगंधर्व पुरस्कार , चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.
July 17, 2021
अवघ्या एकोणिसाव्या वर्षी तीन हजार दंड, पाच हजार बैठका आणि सात तास कुस्तीचा सराव करणा-या माणिकरावांचे अस्थिसंस्था, युनानी वैद्यक व शस्त्रास्त्रविद्येवरही प्रभुत्व होते.
December 31, 2021
आझमगड जिल्ह्यातील मिजवां येथे जन्मलेले अतहर हुसेन रिझवी हेच नंतर कैफी आझमी बनले. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९१९ रोजी झाला. उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यात एका जमीनदाराच्या घरी कैफी आझमी यांचा जन्म झाला.
May 10, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti