चित्रकूटमधील खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी टप्प्याटप्प्याने प्रकल्प हाती घेतला. चित्रकूटमध्ये त्यांनी गोशाळा स्थापन केली असून महिला सक्षमीकरणासाठी उद्यमकेंद्राची स्थापना केली आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्रातर्फे पिकांवर संशोधन केले जाते. पिकांचे कोणते वाण वापरावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.
February 28, 2022
वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी म्हणजे म्हणजे चौथी पर्यंत प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांनी घर सोडले. तेव्हापासून त्यांच्या पायाला भिंगरी लागली ती कायमचीच. संत गाडगेबाबांजवळ ते राहिले, त्यांच्याबरोबर हिंडले. त्यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांच्या कादंबऱ्यांचे चरित्रात्मक , आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या आणि प्रासंगिक आणि अन्य कादंबऱ्या असे वर्गीकरण केले जाते.
July 28, 2021
हिंदुस्थानी आणि ब्रिटिश चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप अभिनेते सईद जाफरी यांनी पाडली होती. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९२९ रोजी झाला. जाफरी यांची ओळख जन्माने भारतीय असलेला ब्रिटिश अभिनेता ही होती. शॉन कॉनरी, पीअर्स ब्रॉस्नन सारखे अभिनेते आणि जेम्स आयव्हरी, रिचर्ड अटेन्बरोंसारख्या गाजलेल्या हॉलिवूड दिग्दर्शकांबरोबर काम करणारा पहिला भारतीय अभिनेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. ‘द मॅन हु वुड बी द किंग’, ‘पॅसेज टु इंडिया’ सारख्या चित्रपटांमधून त्यांचे काम जगाने पाहिले.
‘शतरंज के खिलाडी’, ‘मासूम’, ‘गांधी’, ‘दिल’, ‘जब प्यार किसीसे होता है’ सारख्या अनेक बॉलिवूडपटांतून कधी वडिलांच्या, कधी काकांच्या भूमिकेतून समोर आलेले चरित्र अभिनेता सईद जाफरी अशी त्यांची लोभसवाणी प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. अभिनेत्री आणि लेखिका मेहरुनिसा (मधुरी जाफरी) यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. मात्र १९६५ मध्ये या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मधुरी यांच्यापासून मीरा, झिया आणि सकिना जाफरी अशा तीन मुली असून त्याही अभिनयाच्या क्षेत्रात आहेत.
सईद जाफरी यांनी अनेक सिनेमातून विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. यात शतरंज के खिलाडी, गांधी, राम तेरी गंगा मैली, दिल, अजुबा, हिना या सिनेमांचा समावेश असून त्यातील त्यांच्या विशेष भूमिका गाजल्या. राज कपूर यांच्या सिनेमांमध्ये सईद जाफरी यांची भूमिकाही नजरेत भरणारी होती. सईद जाफरी यांचे १५ नोव्हेंबर २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 8, 2018
ग्रेगरी पेक हे हॉलिवुड मधले स्टाइल आयकॉन होते. १९४० ते १९६० पर्यतचं दशक ग्रेगरी पेक यांनी गाजवला. ‘मॅकेनाज् गोल्ड’च्या मुळे युवा पिढीमध्ये ते लोकप्रिय झाले.
June 12, 2021
साहित्य आणि कादंबरी क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी मुन्शी प्रेमचंद यांना ‘उपन्यास सम्राट’ म्हणूनही ओळखले जाते.
July 31, 2021
मराठी चित्रपटसृष्टीत नायिकांची आजवरची जी परंपरा आहे, त्यापेक्षा काहीशी वेगळी अशी सई ताम्हणकरची इमेज आहे. त्यांचा जन्म २५ जून १९८६ रोजी सांगली येथे झाला. मराठीतील हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते.
इंडस्ट्रीत स्वबळावर तिने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. तिचा आत्मविश्वासपूर्ण वावर, तिची स्टाइल, फॅशन तिच्याभोवती वेगळे वलय निर्माण करते.
मराठी चित्रपटसृष्टीला नवे असणारे हेच ते ग्लॅमरचे वलय तिच्यामुळे प्राप्त झाले. सईच्या चित्रपटांनी गेल्या तीन-चार वर्षांत व्यावसायिक मराठी चित्रपटांवर निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. सनई चौघडे, नो एंट्री पुढे धोका आहे, पुणे 52, टाइम प्लीज, दुनियादारी, पोरबाझार, प्यारवाली लव्ह स्टोरी, क्लासमेट्स, लालबाग परळ, तू ही रे आदी मराठी चित्रपटात सईने काम केले आहे.
गजिनी या हिंदी चित्रपटातून सईने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि नंतर ब्लॅक अँड व्हाईट, सिटी ऑफ गोल्ड, हंटर हे हिंदी चित्रपट सईने केले. अनुमती या मालिकेत पण तिने काम केले आहे. हल्लीच्या प्रत्येक मराठी निर्मात्याला आपल्या चित्रपटात सई ताम्हणकर हवी असते, कारण सई म्हणजे बॉक्स ऑफिसवरचे यश हे गणित गेल्या काही वर्षांत जमून गेले आहे. मराठमोळ्या सई ताम्हणकरनं जेव्हा बिकीनी अवतारात रुपेरी पडद्यावर एंट्री मारली तेव्हा सर्वजण अवाक झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
June 27, 2017
शांताराम आठवले यांचे वडील ग्वाल्हेरच्या सरदार शितोळे यांचे पुण्यातील कारभारी होते. त्यांचा जन्म २१ जानेवारी १९१० रोजी झाला. शांताराम आठवल्यांचे शिक्षण पुण्याच्या भावेस्कूल मध्ये झाले. “बेबंदशाही,“शिवसंभव” या सारख्या नाटकात अभिनय व दिग्दर्शन करुन ती क्षेत्रेही आठवल्यांनी शाळेत असतानाच गाजवली. सुप्रसिद्ध कादंबरीकार ह.ना.आपटे यांची व आठवलेंची पत्र मैत्री होती. त्यांच्या कवितांचा पहिला संग्रह “एकले बीज” या नावाने १९३८ साली म्हणजे ते प्रभातकवी झाल्यानंतर प्रसिद्ध झाला. त्या पाठोपाठ १९४० साली “बीजांकुर” हा दुसरा प्रसिद्ध झाला. “सकाळ”, “स्वराज्य” ”अश्या वर्तमानपत्रात तर “मनोहर”, “वांग्मयशोभा” यांसारख्या मासिकांमधून व “शालापत्रक” या लहान मुलांच्या मासिकात त्यांच्या कविता नेहमी प्रसिद्ध होत असत. “ प्रभात फिल्म कंपनी आपटे यांच्या 'भाग्यश्री' या कादंबरीवर आधारित चित्रपट तयार करू इच्छित होती. भेटीत त्या योजनेवर शिक्कामोर्तब झाले. चित्रपटाचे नाव ठरले “अमृतमंथन”.
शांताराम आठवलेंच्या साध्या सोप्या काव्यरचनेने आपटे खूपच प्रभावित झाल्यामुळे त्यांनी अमृतमंथन चित्रपटाची गीते लिहिण्यासाठी आठवले यांचे नाव सुचवले आणि सुदैव असे की ते मान्यही झाले. मा.शांताराम आठवले यांना प्रभातमध्ये गीतकार, पद्यलेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. 'अमृतमंथन' नंतर “संत तुकाराम”,“कुंकू”,“गोपालकृष्ण”,“माझा मुलगा”,“संत ज्ञानेश्वर”,“शेजारी”,“संत सखू”,“दहा वाजता” आणि “रामशास्त्री” या प्रभात चित्रपटांसाठी आठवले यांनी गीते लिहिली. काव्य, भाषेचा गोडवा, साधेपणा आणि सोपेपणा राखायचे अवघड काम शांताराम आठवले यांनी केल्या मुळेच त्यांचे स्थान “मराठी चित्रपटगीतांचे आद्यकवी” असे आहे. त्यांच्या अशा नाव लौकिकामुळे त्यांना, प्रभातच्या चालकांच्या परवानगीने, “भरतभेट”,“आपले घर” अशा काही प्रभात बाहेरच्या चित्रपटांसाठीही गाणी लिहावी लागली यामध्ये भाग्यरेखा”,“बेलभंडार”,“झंझावात”, “वहिनीच्या बांगडया”, “शेवग्याच्या शेंगा”,“आई मला क्षमा कर”,“पडदा”,“सुभद्राहरण”,“वावटळ” या चित्रपटांचा समावेश आहे.
शांताराम आठवले यांनी “शांतिचिया घरा”,“बकुळफुले”,“वनातली वाट”,“कुंडलीनी जगदंबा”,“सुखाची लिपी”,“ओंकार रहस्य” आणि “प्रभातकाल” या सारखी एकापेक्षा एक सरस पुस्तके लिहिली.याशिवाय त्यांच्या भाव कविता, चारोळ्या, बालगीते यासारखे वाङ्मय देखील लोकप्रिय ठरले आहेत. मा.शांताराम आठवले २ मे १९७५ रोजी यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ janasampark.com
शांताराम आठवले यांची अधिक माहिती वेब साईट http://www.shantaramathavale.com
January 24, 2018
दिग्दर्शक-निर्माते रमेश सिप्पी यांनी आत्तापर्यंत बॉलिवूडला अनेक सिनेमे दिले, मात्र शोले सिनेमाने त्यांनी जी प्रसिद्ध मिळवून दिली,ती इतर सिनेमांमुळे त्यांना मिळाली नाही. एकच सिनेमा त्यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला.या सिनेमाने अनेक रेकॉर्ड प्रस्थापित करत त्यांचे नाव इतिहासातील महान दिग्दर्शकांमध्ये नोंदवले गेले. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९४७ पाकिस्तानमधल्या कराचीमध्ये झाला.
रमेश सिप्पी यांचे वडील जी.पी.सिप्पी प्रख्यात निर्माते होते. वयाच्या नवव्या वर्षी रमेश सिप्पी यांनी पहिल्यांदा कॅमे-यासमोर काम केले होते. १९५३ मध्ये वडिलांच्या 'शहंशाह' या सिनेमात रमेश यांनी बालकलाकाराच्या रुपात काम केले होते.रमेश यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.या दोन्ही क्षेत्रात त्यांना यश प्राप्त झाले. १९७१ मध्ये 'अंदाज' या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी सात वर्षे सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. "अंदाज', "सीता और गीता', "ब्रह्मचारी' वगैरे चित्रपटांनी सुरवात करणाऱ्या रमेश सिप्पी यांनी अल्पावधीतच चित्रसृष्टीत भक्कम स्थान निर्माण केले. "शोले'ने त्यांचे नाव इतिहासात लिहिले गेले. त्यानंतर आलेला "शान' जरी कोसळला असला, तरी डिंपल कापडियाचे पुनरागमन असलेला "सागर' चांगला चालला.
"शक्ती'मध्ये त्यांनी दिलीपकुमार, अमिताभ बच्चनला प्रथमच एकत्र आणले. चित्रसृष्टीत असे वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या या दिग्दर्शकाने "बुनियाद' या मालिकेद्वारे टीव्हीवरही प्रयोग केला आणि तो तुफान यशस्वी ठरला. "शोले'प्रमाणेच या मालिकेतील मास्टरजी, लाजोजी वगैरे पात्रे घराघरांत पोचली. रमेश सिप्पी दिग्दर्शक म्हणून दिलेले अंदाज, सीता और गीता, शोले, शान, शक्ति,सागर, जमीन, भ्रष्टाचार, जमाना दीवाना, असे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले. रमेश सिप्पी यांनी दूरचित्रवाणी मालिका'बुनियाद'चेही दिग्दर्शन केले होते. ती टीव्ही मालिका पण खूप गाजली होती.
रमेश सिप्पी यांनी निर्माता म्हणून ब्रह्मचारी, कुछ ना कहो, ब्लफमास्टर, टॅक्सी नंबर 9211, चांदनी चौक टू चाइना, नौटंकी साला, सोनाली केबल या चित्रपटासाठी काम केले. त्यांनी अभिनेत्री किरण जुनेजा यांच्याशी विवाह केला. अभिनेत्री किरण जुनेजा रमेश सिप्पी यांच्या दुस-या पत्नी आहेत. रमेश सिप्पी यांना दोन मुले असून रोहन सिप्पी हे मुलाचे तर शीना सिप्पी हे मुलीचे नाव आहे. शीनाचे लग्न शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूरसोबत झाले आहे. रोहन प्रसिद्ध दिग्दर्शक असून आपल्या वडिलांचा वारसा सांभाळत आहे. रमेश सिप्पी हे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) अध्यक्षपदी राहिले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 24, 2018
फिशरचे खेळणे नेहमी आक्रमक असे. त्याने कधीही प्रतिर्स्पध्याने ऑफर केलेला ‘ड्रॉ’ स्वीकारला नाही. तो शेवटपर्यंत झुंजत राही. त्याने भाग घेतलेल्या सगळ्या टुर्नामेंटस मोठ्या फरकाने जिंकल्या. त्याच्याबद्दल कॅस्पोरोव्हने म्हटलं आहे की, ‘फिशर आणि त्याचे समकालीन यांच्यातील फरक वेगवेगळ्या बुद्धिबळ जगज्जेत्यांमधील फरकांपेक्षा मोठा होता.’
March 9, 2022
ख्वाजा अहमद अब्बास उर्फ के. ए.अब्बास हे हाडाचे पत्रकार होते. उर्दूतले नामवंत लेखक आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण निर्माते-दिग्दर्शक कथा-पटकथाकार के. ए.अब्बास यांचा जन्म ७ जून १९१४ रोजी पानीपत, हरियाणा येथे झाला. त्यांनी ४६ वर्षे ‘लास्ट पेज’ हा स्तंभ सुरुवातीला ‘बॉम्बे क्रॉनिकल’ व नंतर ‘ब्लिटज’मध्ये लिहिला. राज कपूर यांचे व आर. के. फिल्म्सचे लाडके लेखक कथा-पटकथाकार म्हणून के.ए.अब्बास यांची ओळख होती. १९५१ साली ‘आवारा’ या सिनेमाची पटकथा आणि संवाद अब्बास यांची होते. पुढे अब्बास यांनी श्री ४२०’, ‘जागते रहो’, मेरा नाम जोकर, बॉबी चित्रपटाच्या पटकथा लिहिल्या होत्या. आपल्या पटकथांनी एक वेगळा विचार मांडणारे आणि समाजातील विषमतेला अधोरेखित करणारी स्वतंत्र शैली त्यांनी निर्माण केली. के. ए.अब्बास यांनी शंभरच्या वर पुस्तकांचं त्यांनी लेखन केलं आहे.
व्ही.शांताराम यांचा ‘डॉ. कोटनीस की अमर कहाणी’ हा चित्रपट अब्बास यांच्या ‘And One Did Not Come Back’ च्या कथेवर बेतला होता. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चित्रपट करियरची सुरवात ख्वाजा अहमद अब्बास यांच्या निर्देशनाखाली बनलेली सात हिंदुस्तानी मधल्या सात कलाकाराच्या पैकी एका कलाकाराच्या स्वरुपात केली होती. के. ए.अब्बास यांच्या शहर और सपना या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. भारत सरकारने १९६९ साली के. ए.अब्बास यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. के. ए.अब्बास यांचे इतर चित्रपट ‘धरती के लाल’, ‘शहर और सपना’, ‘दो बूंद पानी’, सात हिंदुस्तानी, नया संसार, नीचानगर, शहर और सपना, धरती के लाल, परदेसी. अभिनेता शाहिद कपूरचे ते पणजोबा होत. के. ए.अब्बास यांचे १ जून १९८७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
June 7, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti