(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आग्यामव्हळाचा तडाखा अन वानरायचा भडका……!!!

    सोंडू पाटलाच्या शेतातं भैमूंग सोंगायची लगबग चालू व्हती.नव्हाळीच्या चार शेंगा लेकरायच्या तोंडी लागतील मणून सगळं गांव पाटलाच्या शेतात उलथलं व्हत.त्याल कारणबी तसच होतं.सोंडू पाटील गावातला दिलदार माणूस समजला जायचा,पण परतेक्षात मात्र त्यो लयचं बेरकी आन धुर्त व्हता.! त्याच्या हातून चार शेंगा जास्त सुटायच्या.त्यालं कुठं,कव्हा आण कसे हात मोकळे सोडायचे,ही कला अवगत व्हती.आवळा देऊन कोव्हळा काढण्याच्या बाबतीत तेव लय पटाईत व्हता.सोंडू पाटलाच्या घरी चोवीस घंटे लक्ष्मी पाणी भरायची.घरची गडगंज संपत्ती,दोन चार वेगळाले धंदे,शेतजमीन,चार पाच बैलगाड्या,दहा पंधरा दुभती जनावरं,संगटच शेतात ट्रॅक्टर,रोटाव्हेटर,थ्रेशर सारखे आधुनिक यंत्रबी दिमतीलं व्हतेच. दोन पोर्‍ह आणि जीव ववाळणारी पाटलीन हे त्याचं विश्व व्हतं. दिलदार मनाचा हा माणूस नावासारखाच रांगडा व्हता.उंच धिप्पाडं शरीर,तुर्रैबाज फेटा,आकडेदार लांब लांब जाड्या मिश्या अन भेदक नजरं असा पाटलाचा रूबाब व्हता.पाहताच क्षणी कोणालंबी जरब बसावी असा हा सोंडू पाटील…!! पंचक्रोशीत एक वजनदार आसामी म्हणून परसिध्द व्हता.तसं तरुणपणातं पाटीलं पंचक्रोशीतला एक नावाजलेला पैलवानं मनून वळखला जायचा.पाटलांनं लय गावचे आखाडे मारले व्हते.शंकरपट,कबड्डी, कुस्तीसारख्या अस्सलं मातीतल्या खेळायबरोबरचं पाटील तमाशाचाबी लयचं नांदिक व्हता.आजबी कुठंपण शंकरपट,कबड्डी,कुस्ती किंवा तमाशाचा फड पडल्याची जराशी जरी खबर कानावर आली की पाटलाची डमनी जुपलीच मनुन समजायचं….! तर आसा हा सोंडू पाटील जेवढा दिलदार तेवढाच बेरकीबी व्हता.

      January 20, 2026


  • कला कशाशी खातात?

    मळकट- कळकट लाकडाच्या एखाद्या तुटलेल्या भागासारखी दिसणारी ती कलिंगडाची फोड एक कलाकृती आहे, हे आम्हाला कस कळणार, हा पवित्रा तिथल्या कर्मचा-यांनी घेतला. त्या कलाकाराला काय बोलाव समजेना.

      July 7, 2022


  • आनंदी

    रोजंदा या जीवनाच्या वाटचालीत खूप वेगवेगळे सुखद दुख:द अनुभव आपल्याला येत असतात. वेगवेगळे प्रसंग आपण बघत असतो. कित्येक प्रसंगाचा आपल्याशी काही सबंध सुद्धा नसतो. केवळ आपल्या समोर तो घडत असतो म्हणून आपण बघत असतो.

      November 27, 2025


  • शिकार

    चिणक्या,गोल्या,रवी आन चेंड्या लहानपणापसुनच जिगरी दोस्तं व्हते.एकाच वयाचे अन एकाच शाळतं शिकल्यान तेह्यचा दोस्ताना आंजुकच घट्ट झाला व्हता.ते चौघबी लयच ईपितर व्हते.काम धंदा त काय करायचे नाही पण घरच्यायच्या जिवावरं मस्तपैकी जगुन दिसभर गावात काड्या करत हूंदडायचे.नको तिथं नाक खुपसण्याच्या तेह्यच्या सलयीधं सगळं गाव परेशान व्हतं.एकदिवस आसचं चौघं दोस्त पारावर बसले व्हते.लय दिवसाचं तेह्यच्या जिवनात एंजायमेंटच नवती.गावातबी तेह्यच्या कुरापती चालयण गेलत्या.चौघंबी शांत बसले व्हते.तेव्हड्यात गोल्या मनला,“व्हयं रं चंड्या आपण लय दिसाचं मटनबी खाल्ल नाही आन नरडंबी वल्ल केलं नाही.तव्हा मी काय मंतो आज सुकीरवार हे तं आपण पार्टी करायची का…?”

      February 2, 2026


  • सावज (कथा)

    सोसायटीच्या वॉचमननं झोपेनं तारवटलेले डोळे अर्धवट उघडून एक कडक सॅल्युट ठोकला.. सिक्युरिटी कॅबिनच्या दाराजवळ अंगाचं मुटकुळं करून पडलेलं कुत्रं उठलं .. शेपूट हालवित त्यांच्याकडे आशाळभूतपणे पाहू लागलं.. मराठेंनी खिशातून एक बिस्कीटचा पुडा काढला.. त्यातील काही बिस्कीटं.. त्याच्यासमोर धरली.. त्यानं पुढील पाय किंचीत उंचावून ती तोंडात धरली.. एका बाजूला ठेवून खाऊ लागलं.. उरलेल्या बिस्कीटांचा पुडा त्याच्या जवळ ठेवून म्हणाले..

      January 26, 2023


  • निस्सीम प्रेम

    नेहमीप्रमाणे प्राध्यापक अविनाश सरांच्या लेक्चरला क्लास पूर्ण भरलेला होता. अविनाश संस्कृत विषय शिकवत. सगळे विद्यार्थी तल्लीन होऊन ऐकत असत अविनाश सरांच संस्कृतवर प्रभुत्व होतंच पण त्याचं विवरण ते इंग्रजीतही फार सुंदर करत. अगदी सर्वांना समजेल अशा सोप्या इंग्रजीत. मेघदूत हे काव्य, शाकुंतल हे नाटक शिकवतांना तर ते नेहेमीच्या जीवनातील उदाहरणं देऊन आणि रंगवून सांगत. त्यामुळे त्यांच्या तासाला कोणी दांडी मारत नसे.

      February 2, 2026


  • टपरी नेहमीचीच ठरलेली..

    आम्ही कुठेही मोट्या हॉटेलमध्ये खाल्ले तरीपण चहा प्यायला टपरीवर जायचो. ठाण्याच्या गडकरीमध्ये चहा प्यायला जायचो परंतु एका चहासाठी ३० -३२ रुपये टू मच ..वाटत असे, म्हणून जवळच्या टपरीवर सात रुपये कटींग बेस्ट..

      June 22, 2021


  • आरसा (कथा)

    सलून मधला प्रसंग आहे …..मी सलून मध्ये बसलो असताना बहुधा तिथेच आजूबाजूला राहणारा एक ५-७ वर्षांचा लहान मुलगा आत शिरला … मागोमाग त्याची आई आली आणि सलून मध्ये काम करणाऱ्या माणसाला आणि आपल्या मुलाला आळीपाळीने सूचना देऊ लागली .. .. “अहो , याचे केस कापून झाले न की त्याला फक्त बाजूच्या बिल्डींग च्या गेट पर्यंत सोडा …

      February 4, 2026


  • आनंदाची किंमत

    मायकेल अँजेलो हा आंतराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार व शिल्पकार होता. त्याच्या चित्र आणि शिल्पाला फारच मागणी असे. एकदा एका श्रीमंत माणसाने त्याला आपल्या दिवाणखान्यात लावण्यासाठी चांगल्या चित्राची मागणी केली. त्यासाठी अँजेलोला वाट्टेल ती किंमत द्यायला तयार झाला. परंतु अँजेलोने त्याला नम्रपणे नकार दिला. कारण त्याला माहित होते की, दिवाणखान्यी शोभा वाढेल मात्र रोज तेच ते चित्र पाहून एकदिवस तो श्रीमंत माणूसही कंटाळेल. नव्याचे नऊ दिवस या न्यायाने त्या चित्राचे कौतुक होईल व नंतर कदाचित त्याकडे दुर्लक्षही होईल, म्हणून फार मोठी किंमत मिळत असूनही त्याने त्या श्रीमंत माणसाला चित्र देण्याचे नाकारले. त्यानंतर एकदा मायकेल अँजेलो हा असाच रस्त्यावरून भटकत असताना रस्त्यावर काही तरी विकत बसलेल्या एका मुलाने त्याला पाहिले. त्या मुलाला अँजेलोबद्दल चांगली माहिती होती. अँजेलोला पाहताच तो मुलगा एक कागद घेऊन त्याच्याकडे पळत आला व म्हणाला, 'अंकल, मला या कागदावर छानसे चित्र काढून द्याल?' त्या निरागस मुलाच्या मनातील भाव ओळखून अँजेलो तेथेच रस्ताच्या कडेला बसला व त्याने त्या कागदावर लगेच एक सुरेख चित्र काढून त्या मुलाला दिले. ते चित्र पाहून त्या मुलाला विलक्षण आनंद झाला. मात्र अँजेलोला द्यायला त्या मुलाजवळ काहीच नव्हते. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी अपराधीपणाची भावना दिसली. त्यावर अँजेलो त्याला म्हणाला, या चित्राबद्दल मला तुझ्याकडून काहीही नको आहे. हे चित्र पाहून तुला जो आनंद झाला त्यातच माझ्या चित्राची किंमत वसूल झाली आहे. असे म्हणून त्या मुलाची पाठ थोपटून तो तेथून निघून गेला.

      March 2, 2017


  • अपण्णक जातक

    वाराणशीचे राज्य. राजाचे नाव ब्रह्मदत्त. या राज्यातल्या एका व्यापाऱ्याच्या
    कुळात बोधिसत्त्वाचा जन्म झाला. बोधिसत्त्व मोठा झाला. देशोदेशी हिंडून
    व्यापार करू लागला.

      December 25, 2024