(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेचा गौरवशाली इतिहास

    ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला पां. के. दातार यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. 

      May 12, 2022


  • एक विलक्षण अहवाल

    PhD. ही शैक्षणिक क्षेत्रातली सर्वोच्य पदवी. कोणत्यातरी विषयाचा अभ्यास, माहीती, संकलन करुन ते नाविन्य विद्यापिठापुढे सादर करुन मान्यता मिळवणे. व जगापुढे ठेवणे. कित्येक विषय नाविन्यपू्र्ण व चमत्कारी असतात. परंतु ज्ञानामध्ये हातभार लावणारे असतात. वैद्यकीय क्षेत्रातल्या तीन विद्यार्थ्यानी एक विषयाचा अभ्यास व Statistics गोळा केले होते. तो अहवाल वाचण्यांत आला.

      December 31, 2017


  • पावसाची उजळणी

    उन्हाळी सुट्टीत गावी गेल्यावर पुण्यात यायला जून उजडायचा.. पहिला वळीव पाऊस अनुभवताना, अतोनात आनंद मिळायचा. त्या पावसात गाईचं वासरुं शेपटी वर करुन हुंदडताना पाहिलेलं आठवतंय.. पाऊस उघडल्यावर सवंगड्यांसोबत हनुमान झऱ्यातून खेकडे पकडायला लांबवर गेलेलो आहे.. शेतातून चालताना चिखलाचा थर, जाडजूड चप्पल घातल्यासारखा पावलांना लागायचा…

      July 5, 2022


  • स्मरणगाथा : ९

    ही कहाणी आहे , काही रिपोर्टर्सची , स्टुडिओमधील अनाऊन्सर्सची , ओबी व्हॅनच्या चालकांची , न्यूज कोऑर्डीनर्सची, ग्राफिक डिझाईनर्सची , टीआरपी साठी हपापलेल्यांची , न्यूज मधली एक्सायटिंग व्हॅल्यू शोधण्यासाठी मेंदूचा भुसा करायला लावणाऱ्यांची .

    ही कादंबरी लिहिताना खरंतर खूप अस्वस्थ व्हायला झालं होतं . कितीही विधायक दृष्टी ठेवली तरीही प्रत्यक्षात वेगळं घडतं याची टोचणी वारंवार होत होती .
    पण जे चाललं आहे ते वाचकांपर्यंत पोहोचविणे मला महत्वाचे वाटत होते .
    सलग तीन महिने ही कादंबरी मी लिहीत होतो .
    आणि संवेदनशील वाचकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर समाधान वाटले .
    मेनका दीपावली अंकात ती प्रसिद्ध झाली आणि नेहमीप्रमाणे त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला .

    पण त्याचा आनंद मानायचा , की हे भयंकर विश्व अजूनही त्याच पद्धतीने चालत आहे , याचे वैषम्य वाटून घ्यायचे , या संभ्रमात मी आहे .

      January 20, 2025


  • खळगी

    अटक स्त्रीला आपल्याला अटक झाल्याबद्दल सोयर सुतक काहीही नसे. आपण उघड्यावर पडलो नाही यावरच ती समाधानी. दिवसभरात जामिनावर कोणीतरी सोडवायला येइल याची तिला खात्री असायची.
    त्यावेळी स्त्री अरोपींसाठी कुर्ला पोलिस ठाण्यात पोलिस कोठडी नव्हती.

      January 13, 2023


  • डोळा

    डोळा ह्या अवयवाकडे आपण जरा डोळसपणे बघायलाच हव. काणा डोळा करण्या सारखा तो अवयव नाही. असतात दोन, पण एकमेकांकडे न बघता एकेच ठिकाणी एकाच वेळी बघतात. मोठे केले की भिती, विस्फारले की आश्चर्य, मिचकावले की खोट खोट आणि एकच मारला की मार खायची लक्षण! कधी काळे, कधी पिंगट, कधी घारे व कधी कधी राजकपूरसारखे निळे.

      July 9, 2019


  • कोयनेच्या परिसरात झालेल्या भूकंपाची ५० वर्षे

    या भूकंपाची महत्ता रिश्टर मापक्रमानुसार ७.५ होती. या धक्क्यामुळे कोयना धरणाला कोणताही गंभीर धोका पोहचला नाही. फक्त धरणाच्या भिंतीवरचा निरीक्षण मनोरा पडला व कोयनानगरमधील कच्च्या बांधणीच्या सर्व इमारती पडल्या.

      December 11, 2021


  • सखा

    माझ्या मनाच्या कोपर्‍यांत, तू घर करुन असतोस
    जरी मला वर्षातून एकदाच भेटतोस
    लहरी तर इतका की, लहानासारखा रुसतोस
    अन् ठरलेल्या वेळी यायचच टाळतोस,
    पण आलास की, हळवा होऊन मला बिलगतोस,
    म्हणून तर मला तू खूप आवडतोस

    येताना ओंजळभर सुगंध आणतोस,
    अधिर मनाला क्षणांत खुलवतोस.
    कधी कधी भारीच हं, धसमुसळा वागतोस
    अन् निलाजरेपणाने अंगचटीलाही येतोस,
    पण आलास की,
    गोड सार्‍या आठवणी जागवतोस
    म्हणून तर मला तू खूप आवडतोस

    गुपीत एक सांगते, जरा तू ऐकतोस?
    विचारल्या प्रश्नाला उत्तर तू देतोस?
    संसारी मी रमले तरी, तूच माझा सखा
    तुझ्यासाठी आतूरलेली मी तुझी प्रेमिका

    भेटीचा तुझ्या असा, ठेवू नं वेडा भरवसा?
    वाट पाहात्येय तुझी लाडक्या पहिल्या पावसा
    माझ्या लाडक्या पहिल्या पावसा

    -- सौ. अलका वढावकर

      March 8, 2016


  • संस्कृत भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे

    मित्रांनो एका महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल. माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहाल पण “अवगत असलेल्या भाषा” मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा

      February 10, 2011


  • यमुना तीरे-एक आठवण / वृंदावनचा घाट आणि बकरी

    यमुनातीरे मला काय दिसल – कान्हाच्या बांसुरीची आवाज की ….

      August 15, 2010