नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
पहिल्या नाटकात अपयश येऊनही ते सतत नाट्यनिर्मिती करत राहिले. नवीन कलाकारांना संधी, जुन्या नाटकांचं पुनरुज्जीवन, मल्टिस्टार नाटक या आताच्या संकल्पना त्यांनी पाच वर्षांपूर्वीच वापरल्या होत्या. ‘निर्मल’ संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले. पण शिंदेसाहेब कधीही पुरस्कार सोहळ्याला, पार्ट्यांना हजर राहिले नाहीत. त्यांनी स्वतला कधीही मिरवून घेतलं नाही. असा हा आगळावेगळा निर्माता 16 जुलै 2012 रोजी आपल्यातून निघून गेला.
August 22, 2022
त्या वेळी मी पुण्यातल्या वाडिया कॉलेजमध्ये शिकत होतो. रविवार पेठेत मावशीकडे राहण्याची सोय होती अन् काही तरी रोजगार मिळविण्याचे प्रयत्न असत. घरचा, आई-वडिलांचा आधार नव्हता असं नव्हे; पण स्वत कमवावं आणि शिकावं अशी प्रवृत्ती होती. माझ्या मावशीच्या हाताला खूप चव होती. तिनं काहीही करावं अन् ते सर्वांना आवडावं, असं होतं. ती बटाटेवडे छान करायची. एकदा आमच्याकडे त्यांचे दीर आले होते. सहज गप्पा चालल्या होत्या. ते म्हणाले, `वहिनी, तू आमच्या शाळेत वडे का नाही विकत? छान खपतील. चार पैसे मिळतील.' तेव्हा ते मॉडर्न हायस्कूलमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करीत असत. झालं, चर्चेचं रूपांतर विचारात आणि योजनेत झालं. त्या वेळी माझ्याबरोबरच माणिक भंवर नावाचा माझा मित्रही मावशीकडे राहत असे. दरमहा 20 रुपये त्यानं द्यावेत आणि जेवून-खाऊन राहावं असं ठरलं होतं. त्यालाही पैशाची गरज होती. झालं, आमचं ठरलं. मावशीनं वडे रावेत आणि आम्ही ते गरमागरम शाळेत नेऊन विकावेत. दुपारच्या सुटीत शिक्षकांना एक छान, चवदार पदार्थ या सेवेतून मिळाला होता. 25 पैशाला एक वडा. त्या वेळी रस्त्यावर तो 10 पैशात मिळायचा. आमचा घरगुती, अस्सल म्हणून 25 पैसे. चांगला, दर्जेदार पदार्थ दिला, की जास्त पैसे द्यायला णी मागे-पुढे पाहत नाही, याचा अनुभव आला. गोविंद हलवाई चौक ते मॉडर्न हायस्कूल- रोज दुपारी आमच्या सायकली अशा पळत की कोणालाही वाटावे, वड्यांचा घाणा इथंच काढलाय. आमचा रोजचा रतीब सुरू झाला. रोज 30 वड्यांवरून संख्या 50-60 वर गेली. गुरुवारी-शनिवारी त्यात साबुदाण्याची खिचडीही सुरू झाली. टिकाऊ काही असावं म्हणून ज्वारीच्या फोडणीच्या लाह्याही देऊ लागलो. एकूण धंद्याला बरकत होती. रोज हातात काहीतरी रक्कम खेळती असे. मजा येत होती. आज 80 वडे करायचं असं ठरलं. त्याच दिवशी माझे
वडील आले. त्यांनाही हा
पदार्थ आवडे. जरा जास्तच वडे करायचा बे
झाला. आज त्यांच्या निमित्तानं आम्हालाही वडे खायला मिळणार होते. अन्यथा, रोज वड्यांबरोबर तयार होणाऱया छोट्या मण्यांवर आम्ही समाधान मानत असू. दुपारी एकच्या सुमारास पहिला डबा घेऊन माणिक रवाना झाला आणि अवघ्या वीस मिनिटांत मीही शाळेत खल झालो. आज शाळेत वेगळंच चित्र होतं. त्या वेळच्या शाळेच्या संचालिका जयश्रीबाई वैद्यांनी शाळेत बाहेरचा कोणताही पदार्थ विकण्यास प्रतिबंध केला होता. आता काय? हा प्रश्न आमच्यापुढे होता. बाहेर वडे विकावेत, तर इतरांचा वडा दहा पैशात; आमचा महागाचा वडा कोण घेणार? थोडा प्रयत्न ला. चार वडे विकले गेले. डबे अजून खूपच जड होते; पण आता घरी जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. खालच्या मानेनं घरी आलो. काय झालं ते सांगू लागलो. आमचे पिताश्री घरी होतेच. आपले चिरंजीव अपयशी होऊन घरी आलेले पाहताच त्यांचा संताप झाला. त्यांनी शेलक्या शब्दांत आमची संभावना
-- किशोर कुलकर्णी
March 17, 2006



-- निलेश बामणे
January 25, 2013
एक साहित्यक मुलाकात -उपमा कालिदासस्य म्हणजे काय? ?????
November 29, 2010
बीपीटी कॉलनीतील चाळीवजा बिल्डिंग मध्ये लहान खोल्यांमध्ये मागील वर्षापर्यंत गणेशोत्सव साजरा करणारे राघव काका आणि त्यांचा पुतण्या विजय, यावर्षी दोघेच जण भायखळ्याहुन गणपतीची मुर्ती न्यायला आले होते. राघव काकांनी वीस वर्षांपुर्वी घरात दीड दिवसांचा गणपती आणायला सुरुवात केली होती. तेव्हापासून बीपीटी कॉलनीत त्यांच्या घरी त्यांचा मोठा भाऊ आणि लहान भाऊ सह कुटुंब दोन दिवसांसाठी येऊन राहत होते.
October 9, 2023
शनिवारवाडा, सिंहगड, म्हात्रे पूल, बिडकरची मिसळ या प्रमाणेच वैशाली हे पुणेकरांचे एक अत्यंत आदरांचे स्थान आहे. वैशालीतला उपमा खात आणि फर्ग्युसन वर नजर ठेवीत कित्येकांनी तारुण्यात बहार आणली. अशांनी वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे स्वाभाविक आहे पण एका तीन वर्षाच्या मुलाने वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे जरा जास्तच होते.
August 18, 2019
“…मला बोलता येतं नाही , पण झरा मात्र माझा आदर्श आहे इतकंच सांगतो . शक्य असेल तर डोंगरातल्या पाण्याचा आदर्श घ्यायला हवा . आपण कृतीतून झरा होऊ या .
February 4, 2026
साली एक साधी पोस्ट सुचू नये ? गणूला आजवर असा कधी प्रश्न पडला नव्हता . आता तुम्हाला ‘हा कोण बुवा , गणू ?’ असा प्रश्न पडला असेल . जर तुमचे फेसबुक असेल तर प्रश्नच नाही . तुम्ही त्याला ओळखत असणारच .! कारण त्याचा फे बु मित्रांची संख्या पावसाळ्यात तुंबलेल्या गटारा प्रमाणे ओसंडून वाहत आहे .! म्हणून ‘गणूच्या गप्पा ‘ नावाचे पेज सुरु केले . तेही लोकल लोकनेत्याच्या ढेरी प्रमाणे दिवसेंदिवस फुगतच आहे . शिवाय तो दहा बारा ग्रुपचा तो ऍडमिन आहे ! यात तुम्ही कोठे तरी असणारच कि !
April 10, 2018
आपुलकी म्हणजे आत्मीयता , ओढ ,जवळीकता , प्रेम , आस्था की जी सर्व नात्यामध्ये असते. आणि या आपुलकीचे महत्व हे श्वासा इतकेच लाघवी आणि शाश्वत असून महत्वाचे असते.
April 28, 2023
सत्यकाम अगदी एकटा पडला. त्याचे सर्व खेळगडी त्याला सोडून गेले होते. त्यांच्या आईबापांनी त्यांची उपनयने करून त्यांना विद्याध्ययनासाठी गुरुगृही पाठवून दिले होते
November 15, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti