मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.
सरकसवाला,
मी मोज दावितो सकला ! ।।धृ.।।
“पदके' मिळवियली गाठीची,
माझी कामे नवलाईची !
साधतील ती इतरा कैची ?
सरकसवाला,
मी मौज दावितो सकला ! ।।१।।
घेतो गादीवर कोलांटी,
दादाच्या मग खांद्यावरती,
चढुनि उडी मी घेतो उलटी
सरकसवाला,
मी मोज दावितो सकला ।।२।।
बाजा तोंडाचा बहु वाजे,
घोडा काठीचा हा साजे,
घाली रंगण त्या आवाजे,
सरकसवाला,
मी मौजे दावितो सकला ! ।।३।।
छातीवर मोटार चढे ही, .
सरकस बघुनी बोले आई !
की मी डोक्यावर घर घेई' !
सरकसवाला,
मी मौज दावितो सकला ! ।।४।।
हत्ती हा काळ्या मातीचा,
बंगाली वाघहि रबराचा,
साखरि छावा हा सिंहाचा !
सरकसवाला,
मी मौज दावितो सकला ! ।।५।।
ऐसे प्राणी जमवुनि नाना,
बसवुनि एका ताटी त्यांना
खातो मीही त्यासह खाना !
सरकसवाला,
मी मौज दावितो सकला |! ।।६।।
June 18, 2026
सुतार उत्तमसा
तुजसाठी मिळवीला
पाळणा रंगित बनवीला ।।
चहूबाजूंनी
राघु-मोर बसविले
'पाळण्यात बाळ निजवीले ।।
निज निज बाळा
झोके देते मी तुजला
खेळुनि बाळ बहु दमला ।।
June 11, 2026
आवडीने भाव हरि-नाम घेसी ।
तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।।
नको खेळ करु कोणत्या गोष्टीचा ।
पति तो लक्ष्मीचा जाणतसे ।
संकळ जीवांचा करितो सांभाळ ।।
तुज मोकलील ऐसे नाही ।।
जैसी स्थिती आहे तैशा परि राहे ।
कौतुक तू पाहे संचिताचे ।।
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा ।
हरिकृपे त्याचा नाश झाला ।।
June 11, 2026
वासुदेव आला दारी, वासुदेव आला
चिमणा वासुदेव आला ।।धृ ।।
टोपीवर मोरपिसांना
खोवोनि येथें आला,
काही दान करा त्याला ।
दारी वासुदेव आला. ।।१।।
बांधुनिया घुंगुर पायी
थय थय थय नाचत येई
सुखवी गाऊनि तुम्हाला ।
दारी वासुदेव आला ।।२।।
“द्याल जरी पैसा एक,
देव तुम्हां देईल लाख,
माई धर्म करा याला' ।
दारी वासुदेव आला ।।३॥)।
“वडिलांच्या तुमच्या नावे
पैशाचे दान करावे,
माई, पुण्य मिळविण्याला ।
दारी वासुदेव आला ।।४॥।
नाचुनिया आता थकला
द्या एकच पैसा त्याला
खाऊ गोड घ्यावयाला ।
वासुदेव दारी आला ।।५।।
June 25, 2026
फार फार वर्षांपूर्वी एकदा एका खेडेगावात एक चर्मकार राहात होता. त्याचा एक छोटासा ग्रामधंदा होता. तो धंदा चांगला चालावा म्हणून त्याला असंख्य कातड्यांची गरज लागत असे. तो अरण्यात जात असे आणि मेलेल्या जनावरांची कातडी गोळा करीत असे. एखादे मेलेले जनावर त्याला आढळले की तो त्याची कातडी सोलायचा.
October 22, 2025
कौरवांनी पांडवांना कुंतीसह ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण ते वाचले. पांडव ब्राह्मणाचा वेश धारण करून एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी येऊन राहिले. कुंती व भीम घरी रहात. बाकीचे चौघे पांडव भिक्षा मागून आणीत. ते ती भिक्षा कुंतीकडे देत.
December 25, 2024
एका शहरात तीन मित्र रहात होते. एक राजपुत्र, एक मंत्रिपुत्र आणि एक वणिक पुत्र. एकदा तिघंही एकत्र आले आणि विचार करू लागले की कोण कशामुळे जिंकला आहे. राजपुत्र म्हणाला, “मी आपल्या पुण्यामुळे जिंकलो आहे.” मंत्रीपुत्र म्हणाला, “मी आपल्या बुद्धिबळावर जिंकलो आहे.” वणिक पुत्र म्हणाला, “मी आपल्या चतुराईने जिंकलो आहे.” तिघे मित्र परदेशात गेले आणि एका शहरातील बगीच्यात थांबले. वणिक पुत्रास जेवण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. वणिक पुत्र एका वाण्याच्या दुकानावर गेला. त्या दिवशी कोणतातरी सण होता आणि दुकानात इतकी गर्दी होती की तो वाणी सर्व ग्राहकांना लवकर किराणा देवू शकत नव्हता.
November 25, 2025
सर्वांचा विश्वास । सहजी बसेल
ऐसे शुद्ध शील । ठेवीन मी ।॥।१॥।
देव, देश, राजा । गुरु आप्त दृष्ट
यांशी एकनिष्ठ । राहीन मी ।॥।२॥।
अनाथांच्या साह्या । जाईन धावून
त्यासाठी झिजवीन । काया माझी ।॥॥३॥।
सानां कुरवाळीन । वंदीन थोरांना
बंधु सकलांना । मानीन मी ।॥४।।
सौजन्य दावीन । स्त्रिया-बालकांशी
वृद्ध-निर्बलांशी । निरपेक्ष ।।५॥।
मुकी जनावरें । गणूनिया मित्र
भूतदया व्रत । आचरीन ।।६॥।
गुरु, आईबाप । अधिकारी खरे
आज्ञा त्यांच्या त्वरे । पाळीन मी ।॥७॥।
कोसळो संकटे । कर्तव्य कठीण
मनाने प्रसन्न । राहीन मी ।॥८॥।
शरीराने शुद्ध । मनाने निर्मळ
कृतीने सरळ । राहीन मी ।।९।।
June 11, 2026
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवूनिया ।।
तुळसीहार गळा कासे पितांबर ।
आवडे निरंतर हेचि रुप ।।
मकर कुंडले तळपती श्रवणी ।
कंठी कौस्तुभमणी विराजित ।।
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीने ।।
June 28, 2026
(ऑस्ट्रेलियन लोककथा)
एका राजाची एक सुंदर राणी होती. एका कावळ्याला ही राणी खूप आवडत होती. एके दिवशी राणी आपल्या सहा दासींसोबत रानात पांढरे सुरवंट शोधीत होत्या. कावळ्याने पाहिले आणि कावळ्याला एक युक्ती सुचली. कावळ्याने सुरवंटाचे रूप घेतले. रानातील दाट झुडपात लपून बसला. राणीच्या दासींनी सुरवंट पकडण्यासाठी साधे लाकडी गळ टाकले.
November 15, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti