मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनि ऊन पडे
वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे
झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा! तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रुप महा
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते,
उतररुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते
फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
खिल्लारे ही चरती रानी, गोपहि गाणी गात फिरे
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावण महिमा एकसुरे
सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामारोष मनीचा मावळला!
सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाळा या फुलमाला रम्य फुले-पत्री खुडती
देवदर्शना निघती ललना, हर्ष माहीना हृदयात,
वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावण महिन्याचे गीत !
June 11, 2026
प्राचीन काळी ऋषिमुनी विद्यादानाचे काम करीत असत. त्यांचे आश्रम म्हणजे वेदाभ्यासाच्या शाळाच असत. अनेक शिष्य आश्रमात राहून विद्याभ्यास करीत होते. ऋषिमुनींनासुद्धा वेदविद्यापारंगत शिष्यांकडे पाहून कृतार्थ झाल्यासारखे वाटे. अध्ययन संपले की, काही ना काही गुरुदक्षिणा देण्याचा प्रघात होता. त्याशिवाय गुरुंचे ऋण फिटले असे समजत नसत.
November 25, 2025
फार प्राचीन काळी धौम्य या नावाचे एक महान ऋषी होऊन गेले. ते आपल्या शिष्यांना केवळ ज्ञान देत नसत, तर ज्ञानाच्या जोडीला व्यवहार शिकवीत असत. त्यासाठी शिष्यांना आश्रमात पडतील ती कामे करावी लागत.
November 25, 2025
ताई गुणाची माझी छकुली,
“झोका दे दादा' म्हणून लागली,
संभाळ ताई ! फांदी वाकली,
दोन्ही दोरांना गच्च आवळी,
जोजोगेजोजो ।॥१॥।
आयुसागरी आल्या लहरी,
ताई तरंगे नोका त्यावरी,
कुंतलध्वजा फडफड करी,
पायाचे वल्हे हाण सत्वरी,
जो जो गे जोजो ॥॥२॥।
वायु सिंधूला भरती आली,
नौका हालते वरती खाली,
परकर-शिडांची त्रेधा उडाली, .
शाब्बास ताई ! माझी सानुली
जोजोगेजोजो ॥1३।।
देवदयेचे झाड थोरले,
भक्ति प्रीतीचे दोर बांधले
मोक्ष प्राप्तीचा झोका हा बाळे ।
आनंद देवो तुला वेल्हाळे !
जोजोगेजोजो ।॥४॥|
June 12, 2026
एक होती कळी. सुंदर, टपोरी. जाणाऱ्या येणाऱ्यांच्या नजरा तिच्यावर पडल्या की, लोक म्हणायचे काय सुरेख आहे ही कळी ! तो तो कळी भाव खायची. आपल्या सौंदर्यावर भारी भरायची. मस्का मारायची. शेजारच्या कळ्या तिच्याशी बोलायच्या, हसायच्या. पण कळी काही कुणाशी बोलायची नाही की, हसायची नाही की, खेळायची नाही.
November 15, 2025
समुद्राच्या काठी एक गाव होतं. तिथं एक मगर आणि एक कोल्हा राहायचे. त्यांनी दोघांनी मिळून शेती करायचं ठरवलं. सुरवातीला बटाट्याची शेती केली. मगर म्हणाले, “आपण उत्पन्नाची वाटणी कशी करायची ते आधी ठरवून टाकू.” कोल्ह्याने त्याला मान्यता दिली. मगर म्हणाले, “मी झाडांचा वरचा भाग घेईन, खालचा तू घे.” कोल्हा म्हणाला, “चालेल, तू म्हणशील ते मला मान्य आहे.” पुढे बटाट्याचं पीक तयार झालं.
October 22, 2025
मध्य भारतातल्या एका प्रचंड मोठ्या जंगलात एक दांडगा सिंह राहात होता. त्याचं नाव होतं भासुरक. त्याला स्वतःच्या शक्तीची घमंड होती. नि ह्या शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी तो खुशाल दुबळ्या जनावरांना ठार मारीत असे. एकदा काय झालं, त्या जंगलातली सगळी जनावरं एकत्र जमली आणि सगळी सिंहाकडे गेली.
October 22, 2025
वैशाखमासी प्रतिवर्षि येती,
आकाशमार्गे नव मेघपंक्ती;
नेमेचि येतो मग पावसाळा,
हे सृष्टिचे कौतुक जाण बाळा ।॥१॥।
पेरुनियां ते मण धान्य एक,
खंडीस घे शेतकरी अनेक;
पुष्पे फळे देति तरु कसे रे?
हे सृष्टिचे कौतुक होय सारे ! ।।२॥।
क्र्तू बसंतादिक येति, जाती,
तैसेचि तेही दिन आणि राती;
अचूक चाले क्रम जो असा रे,
हे सृष्टिचे कौतुक, जाण सारे ।1३।।
पाणी पहा मेघ पितात खारे,
देती परी गोड फिरुनि सारे;
तेणेंचि हा होय सुकाळ लोकी,
हे सृष्टिचे कौतुक, बा, विलोकी ।।४।।
ते तापले डोंगर उष्णकाळी
पाने तृणें वाळुनि शुष्क झाली;
तथापि तेथे जळ गार वाहे
झऱ्यातुनी, कौतुक थोर, बा, हे ! ।।५॥।
वठोनि गेल्या तरुलागि पाणी
घालावया जात न कोणि रानी;
वसंति ते पालवतात सारे,
हे सृष्टिचे कौतुक होय, बा, रे ! ॥६॥
June 11, 2026
वासुदेव आला दारी, वासुदेव आला
चिमणा वासुदेव आला ।।धृ ।।
टोपीवर मोरपिसांना
खोवोनि येथें आला,
काही दान करा त्याला ।
दारी वासुदेव आला. ।।१।।
बांधुनिया घुंगुर पायी
थय थय थय नाचत येई
सुखवी गाऊनि तुम्हाला ।
दारी वासुदेव आला ।।२।।
“द्याल जरी पैसा एक,
देव तुम्हां देईल लाख,
माई धर्म करा याला' ।
दारी वासुदेव आला ।।३॥)।
“वडिलांच्या तुमच्या नावे
पैशाचे दान करावे,
माई, पुण्य मिळविण्याला ।
दारी वासुदेव आला ।।४॥।
नाचुनिया आता थकला
द्या एकच पैसा त्याला
खाऊ गोड घ्यावयाला ।
वासुदेव दारी आला ।।५।।
June 25, 2026
(इंडोनेशियन लोककथा)
इंडोनेशियन लोक म्हणतात की, फार वर्षांपूर्वी, आता जसे माणसांत व जनावरांत आपापसांत वैर आहे, तसे नव्हते. सगळेजण एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहात. हे सगळे वैर एका कळीच्या नारदाने – ‘माकडाने निर्माण केले. ते कसे केले याबद्दल एक गंमतीदार गोष्ट सांगतात; ती अशी..
October 22, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti