मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.
पाखरांची शाळा भरे पिपळावरती
चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती ! ॥१॥
उतरते ऊन, जाते टळूनी दुपार
पारावर जसा यांचा भरतो बाजार ! ॥२॥
बाराखड्या काय आई, घोकति अंगणी?
उजळणी म्हणती का जमूनी रंगणी? ॥३॥
तारेवर झोके घेती बसूनी रांगेत
भुर्रकन इथे तिथे उडती मौजेत ! ॥४॥
खेळकर मुले, नको कराया अभ्यास
परीक्षेत का न आई व्हायची नापास? ॥५॥
लक्ष यांचे पांगलेले पेरूच्या बागेत
मास्तरच यांना हवे आमुचे रागीट ! ॥६॥
पावसाळ्यातही शाळा आमुची न गळे
गळकी न शाळा यांची, भिजती सगळे ! ॥७॥
रविवारी, सणवारी आमुच्यासारखी
यांना नाही सुटी, भली मोडली खोड की ! ॥८॥
यांच्याहून आम्ही आई ! शहाणे, नव्हे का?
गप्प शाळेमधी, कधीं धरितो न हेका ॥९॥
होतो पास आम्ही, देती दिपोटी बक्षीस
मौज काय सांगू? मिळे सुट्टीही शाळेस ! ॥ १०॥
June 19, 2026
तुमचे नाम संकीर्तन ।
हेचि माझे संध्या-स्नान ।।
तुमच्या पायाचे वंदन ।
हेचि माझे अनुष्ठान ।।
तुमच्या पायाचा साक्षेप ।
हा चि माझा काळ क्षेम ।।
तुमच्या प्रेमे आली निद्रा ।
हीच माझी ध्यान-मुद्रा ।।
एका जनार्दनी सार ।
ब्रह्म रुप हा संसार ।।
June 11, 2026
एके दिवशी ‘तांबू’ गाय रानात गेली. रानात चरता चरता दिवस कसा संपला ते कळलंच नाही. जरासं अंधारून आलं होतं. हळूहळू ती परतीच्या वाटेवर आली. परंतु बरोबरीच्या ‘पांढरी’, ‘ढवळी’, ‘राणू’ कुणीच दिसत नाही, हे लक्षात येताच तांबू गायीने आपला चालण्याचा वेग वाढवला. जवळजवळ रानातली वाट संपतच आली होती. दूरवर दिवे दिसत होती. इतक्यात वाघोबाराजे दत्त म्हणून समोरी आले! क्षणभर तांबू गायीला काही सुचेनासे झाले. भीती वाटली.
October 22, 2025
‘जोजा ही एका राजाची मुलगी, पाय घसरून पडलेल्या एका म्हातारीला कुचेष्टेने हसली. तशी म्हातारीने चिडून शाप दिला: ‘तादेव’ नावाचा मृत राजपुत्र तुला पती मिळू दे अन् तुझे खूप हाल होऊ देत !’ बिचारी राजकन्या, तिने म्हातारीची विनवणी केली. तो मृत राजपुत्र कशाने उठेल म्हणून विचारले. तशी म्हातारीने सांगितले की, त्याच्या उशाशी थडग्यात एक मोठे चांदीचे पिंप ठेवलेले आहे, ते जी तरुणी तीन दिवसांत अश्रूंनी भरून टाकील तीच त्याला जीवदान देऊ शकेल व मग त्यांचे लग्न होईल.
October 5, 2025
चिमणे इवलाले बीज
रम्य त्यात होती शेज.
दीड वितीचे कुणि रोप
घेत तिथे होते झोप ।।१॥।
ऊन म्हणाले, 'ऊठ गड्या.'
पाउस वदला, 'मार उड्या,
जगात ये रे ह्या उघड्या.
करी जळाच्या पायघड्या.' ।॥॥२॥।
वायु बोलला, 'ऊठ कि रे,
माझ्याशी धर फेर बरे.
हसले जर आम्हा कोणी
दावु वाकुल्या नाचोनी.' ॥३॥।
भूमि म्हणाली, 'चल बाळा,
वाजव पाण्याचा वाळा,
अंगी हिरवी सोनसळा
घालुनि ही दावी सकळा.' ।॥॥४॥।
झोप झटकुनी ते उठले,
नंदबाळ जणु अवतरले.
पाउस, वारा, ऊन तसे
जमले भवती गोप कसे. ॥५॥
अदभुत ह्याचा खेळ अहा
जरा येउनी पहा, पहा.
उगवे, चमके, पहा तरी
मोरपिसांचा तुरा शिरी. ।॥६॥
July 1, 2026
(महानुभाव ग्रंथातील गोष्ट)
कव्हणा एका महात्माचिये आधारिये परिसू होता तो कव्हणी एका ब्राह्मणाचे
घरा वसतीसी जाये. दारी तिटत तिटत ऐसे पाणी पडत होते तेणे तयाचे वस्त्र
आंबट-ओले ऐसे जाले होते.
November 15, 2025
कोणे एके काळी निकोबारमध्ये एकाकी जागी असलेल्या घरात एक विधवा स्त्री चार मुलींसह राहत होती. त्या चौघींमध्ये तीन मुली मोठ्या वय झालेल्या तर शेवटची मुलगी छोटी होती. त्या छोटीचे नाव होते टो-मी-रॉक (म्हणजे सौंदर्य ) तर इतर मुलींची नांवे अशी होती. टो-केन (मेहनती), टो-पेट-नागेन (स्वतःपूरते पाहणारी) आणि वा-मी-रो (गोष्ट सांगणारी)
November 15, 2025
एकदा समुद्रात होडी वल्हवत असताना रेव्हनला गनूक भेटला. त्यावेळी गनूकला त्याचे सामर्थ्य दाखवायची आणि रेव्हनवर त्याचे वर्चस्व सिद्ध करून दाखवायची इच्छा झाली. म्हणून त्याने त्याची जादूची टोपी काढून टाकली आणि सगळ्या समुद्रावर दाट धुके निर्माण केले.
December 25, 2024
आतां विश्वात्मकें देवें । येणे वागयज्ञें तोषावें ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ।।
जे खळांची व्यंकटी सांडो ।
तया सत्कर्मी रति वाढो ।
भूतां परस्परें जडो । मैत्र जीवाचें ।।
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ।
जो जें बांडील तो तें लाहो । प्राणिजात ।।
वर्षते सकळमंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळीं । भेटतु भूतां ।।
चलां कल्पतरुंचे आरव । चेतना चिंतामणींचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।
चंद्रमे जे अलांछन । मार्तण्ड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदिपुरुखीं । अखण्डित ।।
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इये ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ।।
येथ म्हणे विश्वेश्वरावो । हां, होईल दान पसावो ।
येणें बरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ।।
June 11, 2026
बळीराजा आपल्या नगरीत सुखाचे राज्य करीत होता. धर्माचे, समृद्धीचे, दानाचे अधिष्ठान असा ह्या नगरीचा लौकिक होता. सर्व प्रजा आनंदाने नांदत होती. आपल्या राज्यात सर्वत्र आबादी आबाद असावे म्हणून नेहमीच राजा देशोदेशीच्या विद्वान दशग्रंथी ब्राह्मणांना व ऋषिजनांना बोलावून यथासांग यज्ञयाग करीत असे. अगणित दानधर्म करीत असे. विद्वानांचा आणि प्रजेचा दुवा घेत असे.
November 15, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti