हत्ती शिष्यचार शिकतो

एके दिवशी नदीकडे जाणाऱ्या वाटेवर हत्तीला खार आडवी आली. सम्राटासारख्या तोऱ्यात चालणाऱ्या मातब्बर हत्तीनं तिला सोंडेनं वाटेतून बाजूला सारून म्हटलं, “बाजूला हो ग भिक्कार. चिमुरडे.” खारीला हा मोठा अपमान वाटला. तीही कोणी होतीच की. ह्या हत्तीला नीट वागायचं शिकवायला पाहिजे असं तिला वाटलं.



एके दिवशी नदीकडे जाणाऱ्या वाटेवर हत्तीला खार आडवी आली. सम्राटासारख्या तोऱ्यात चालणाऱ्या मातब्बर हत्तीनं तिला सोंडेनं वाटेतून
बाजूला सारून म्हटलं, “बाजूला हो ग भिक्कार. चिमुरडे.” खारीला हा मोठा अपमान वाटला. तीही कोणी होतीच की. ह्या हत्तीला नीट वागायचं शिकवायला पाहिजे असं तिला वाटलं. “ए” खार ओरडली, “असशील तू ढीग मोठा. मातब्बर उंचाडा समजतो स्वतःला. पण मी सांगते, चुकीचे आहे हे तुझं वागणं!” हत्तीनं वळून तिच्याकडे
आश्चर्यानं पाहिलं व म्हटलं. “अंहं. चूकबीक काही नाही. मी मोठ्ठा आहे हे
नकट्या पोरालासुद्धा माहीत आहे.”
टिर्र…. टिर्र…. आवाज काढत आणि वरचेवर शेपूट उडवत खार रागानं
म्हणाली, “मी असेन चिमुरडी. पण तुझ्यापेक्षा जास्त खाऊन दाखवते तुला.
पैज तुझी माझी. होऊन जाऊ दे शर्यत आपली. कोण जास्ती ताडगोळे खातंय
ह्याची. मीच जास्ती खाईन आणि जास्त वेळसुद्धा खाईन. कळलं का हो थोर
हत्ती महाराज?”
हत्ती मोठ्यांदा हसला. त्याला फार गंमत वाटली. आणि गंमत म्हणूनच त्यानं
त्या चिमुरड्या खारीनं दिलेलं आव्हान स्वीकारलं. शिवाय त्याला ताडगोळे
फार आवडायचे. मग ह्या दोघांनी ताडगोळ्याचे मोठे ढीग जमवले आणि दुसऱ्या
दिवशी सकाळी शर्यतीला लागायचं असं ठरवलं. हत्तीनं अगदी मनावर घेतलं
होतं. त्याला दम निघत नव्हता. संध्याकाळचं बाभळीच्या शेंगाचं चवदार
जेवणसुद्धा त्यानं टाकलं. म्हणाला, उद्या शर्यतीच्या वेळेला सटकून भूक
लागायला पाहिजे. खारीला एकदा तिची जागा दाखवून दिलीच पाहिजे.
दुसरा दिवस उजाडला. स्वच्छ आकाश, सुरेख कोवळे उन्ह, छान दिवस
होता. दोघांनी ताडगोळे खाणं सुरू केलं. भुकेल्या पोटी हत्ती चवीनं खाऊ
लागला. खारीनं भराभर कुरतडायला सुरुवात केली आणि लवकरच तिचं पोट
टम्म झालं. तशी ती गुपचूप निघून गेली. जवळच दडून वाट बघत असलेल्या
चुलत भावंडाला तिनं खायला पाठवून दिलं. हत्ती खाण्याच्या कामात इतका
दंग होता की, खार गेली आणि तिचे चुलत भावंड तिच्या जागी आले, याचा
कशाचा पत्ता त्याला लागला नाही.
मग खारीचे भाऊ, बहिणी, चुलत भावंडं, काका, आत्या अशी भुकेली मंडळी
एका पाठोपाठ एक येऊन ताडगोळ्यांचा ढीग कमी कमी करत गेली. दुपारच्या
वेळी हत्तीनं खाण्यातनं डोकं वर करून पाहिलं तर खार नुसती खाण्यात दंग
नव्हती तर तिच्या पुढ्यातल्या ताडगोळ्याचा ढीग हत्तीच्या ढिगाऱ्यासारखाच
झपाट्यानं कमी झालेला होता.
मग हत्तीने विचारलं, ‘काय खारुताई भरलं का पोट?’
भरल्या तोंडानं खार म्हणाली, ‘नाही अजून. तुमचं हो गजराज ?
‘छे आमचं कधीच भरणार नाही,’ असं उत्तर देऊन हत्ती भराभर खाऊ
लागला. संध्याकाळी सूर्य मावळायच्या सुमारास हत्तीचं पोट एवढं भरलं की
त्याला धड उभं रहाता येईना. त्यानं समोर बघितलं तर खारुताई अजूनही
ताडगोळे खातच होती. (शेजारच्या झाडावर मोठी झोप काढून ती परत
ताडगोळ्यांवर आली होती)
हत्ती आवाज करून कण्हला, “खारुताई, धन्य आहे तुझी. आता मी हरलो.
ह्यापुढं खाणं नाही होणार. तू जिंकली आहेस देवी !” आणि सलाम करायला
हत्तीनं सोंड वर केली.
खारीनं आनंदानं उड्या घेऊन हत्तीचे आभार मानले. ती म्हणाली, ” इथून
पुढं दंभाचार करणं सोडून दे.” त्या दिवसापासून आजतागायत हत्तीनं
खारीविषयी सतत आदरच दाखवला आहे.

Author