(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बीजाचे समर्पण पहावे

    बीजाचे समर्पण पहावे,
    स्वतःला देऊन टाकते,
    एक तरु जन्माला यावे,
    म्हणूनच स्वतःला गाडते,---!!

    पुन्हा मातीत रूजून,
    एकदम कात टाकते,
    अंकुराचा स्वरूपाने ,
    मातीच्या कुशीत येते,--!!!

    काळी आई कुरवाळते ,
    सर्व संगोपन करते,
    बघता बघता नजरेत भरते,
    अंकुराचे फोफावणे, --!!!

    अंकुराचा त्याग करून,
    बीज वाढीस लागते,
    रोपट्याच्या स्वरूपात,
    सानुले झाड उगवते ,--!!!

    रोपट्याला फुटती पाने,
    त्यांचेही वर जाणे,
    करता करतां झाड वाढते,
    हिरवेगार, डौलदार दिसते,--!!!

    हळूहळू संपन्न होते,
    घोंस लागती फुलाफळांचे,
    झाड होते मोठे,
    कधी रूप घेते वृक्षाचे,--!!!

    फळे-फुले भरलेले,
    वृक्ष घनदाट डंवरलेले,
    कोसळती किती फळेफुले,
    शेवट पुन्हा बीजरुपे,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      May 15, 2019


  • आई..! तुझे आयुष्य म्हणजे…

    आई ...!

    तुझे आयुष्य म्हणजे...

    आमच्या सुखी जीवनासाठी,

    अनवानी पायाने...

    निखाऱ्यातून ‘चालने’ होते.

    दुष्काळाच्या आगीतून,

    ताऊन-सुलाखून निघालेले,

    चोवीस कॅरेट शुद्ध ‘सोने’ होते.

    अंध्याऱ्या रात्रीतील...

    शुभ्र, शीतल ‘चांदणे’ होते.

    आम्हा सर्वांच्या सुखासाठी,

    स्वतःच, दुःखाचे विष पिऊन,

    विचारमंथनातून मिळवलेले,

    कंठातील अनमोल ‘रत्न’ होते.

    हाल-आपेष्ठा, अपमान सहन करून,

    मनाच्या काळजावर कोरलेले,

    विजयाचे सुंदर ‘स्वप्न’ होते.

    आपल्या सुखी कुटुंबासाठी,

    काबाड-कष्ट, उपास-तापास करून,

    कणा-कणांनी घडवलेले ‘घर’ होते.

    आपुलकी-जिव्हाळा-प्रेम, वात्सल्य-ममतेनी,

    माणसाळलेले माणुसकीचे ‘घरदार’ होते.

    बोचऱ्या थंडीतील उबीचे ‘चादर’ होते,

    कोरडया विहीरीतील पाण्याचे ‘पाझर’ होते.

    - ©️ प्रा. शिवाजी आर. कांबळे
    ☎️ मो.न. 8830800335 ====================================
    Follow me on my Blog ID: https://kshivraj83.blogspot.com/ ===================≈================

      August 24, 2021


  • निवृत्तीची वृती

    माझे म्हणूनी जे मी धरले,
    दूर होई ते मजपासूनी,
    दूर ही जावूनी खंत न वाटे,
    घडत असते कसे मनी ।।१।।

    बहुत वेळ तो घालविला,
    फुल बाग ती करण्यामध्ये,
    विविध फुलांची रोपे लावूनी,
    मनास रमविले आनंदे ।।२।।

    कौतुकाने बांधी घरकूल,
    तेच समजूनी ध्येय सारे,
    कष्ट करूनी मिळवी धन,
    खर्चिले ते ह्याच उभारे ।।३।।

    संसार करूनी वंश वाढवी,
    संगोपन ते करूनी त्यांचे,
    थकूनी जाई देह आता तो,
    चित्त लागते ईश चरणाचे ।।४।।

    ओढ आतां उरली न काही,
    ज्याच्यासाठी तगमगलो,
    निवृत्तीची वृत्ती मिळूनी,
    समाधानी तो होऊ शकलो ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      February 11, 2016


  • ध्येयच्युत

    ध्येयपूर्तीच्या पथातील आम्ही तीन शिलेदार टाकुनी आपुली धनदौलत ही सोडूनी घरदार
    मार्गी येती संकट अगणित तुडवीत गेलो दूर तोडुनि आगुचे बंध रेशमी गंगार्पणी पार

    चालत चालत चाल चाललो । निशीदिनी ध्येयपथी अंतिम होता तुझी भेट पण झालो स्थिर जगती
    स्थापुन आपुले दोन जिवांचे घरकुल सुंदर छान खेळत बसलो सारीपटी या दिनरात्रीचे गान

    कुठे हरवले परंतु माझे जिगरदोस्त दोन पुढे पुढे ते तसेच गेले रात्रीचे उचलुनी वाण
    स्मृती गंधाच्या याच शलाका जाळीत जाती जीवा आज तडफडे जीव तयास्तव तृणवत मम ठेवा

    -- जयंत वैद्य

      July 28, 2010


  • देह देव

    हाडे, मांस, रक्ताने

    शरीर बनविले छान

    सौंदर्य खुलते त्या देहाचे

    जर असेल तेथे प्राण

    प्राण नसे कुणी दुजा हा

    परि आत्मा हेची अंग

    विश्वाचा जो चालक

    त्या परमात्म्याचा भाग

    ईश्वरी सेवा, संकल्प मनीं

    प्रेमभरे देह भजावा

    अंतर बाह्य शुद्धता राखित

    समर्पणाचा भाव असावा

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      January 3, 2020


  • दूरवर गगनी उडत निघाली…

    पक्ष्याचे एक लहानसे पिल्लू आपल्या आईशी बोलत आहे अशी कल्पना करून,----!!!!

    दूरवर गगनी उडत निघाली,
    सगळ्या पक्षांची माला,
    आई, झुंजूमुंजू झाल्यावरती,
    उडू दे ग लांब मला,---!!!

    त्यांच्यासवे फिरेन आकाशी,
    पाहेन रंगीबेरंगी दुनिया,
    होईन मग मी खूप आनंदी,
    विशाल उंच आभाळात या,--!!!

    निळ्या काळ्या ढगांवरती,
    कसे स्वार होऊनिया,
    पक्षी सारे माग काढती,
    उंच गगनात जाऊन या,--!!!

    आपले मोठे पंख पसरुनी,
    जवळ घेऊन आपुल्या पाया, अमर्याद नभा तोंड देती,
    तयार मीही धाडस करण्यां,--!!

    तीक्ष्ण नजरा, ताकद पंखी,
    सावध राहून हालचाल करता,
    जेथे कुठे माळ रानां उतरती, चाणाक्ष ते शत्रूस जोखता,--!!!

    नागसापांची आपल्याला भीती, पाण्याजवळ दक्ष राहता,--!!!
    माणूस निष्ठुर जाळे टाकी,
    करत कैद बघ भाईबंदा,--!!!

    जाण मला या सगळ्याची,
    दक्ष अन् सतर्क राहता,
    मी तर तुमच्या पुढील पिढी, चिमुकला तरी हुशार असतां,--!!

    © हिमगौरी कर्वे.

      January 6, 2020


  • संतुलन

    आकाशीं सुर्य तळपला तेजस्वी त्याची किरणें
    तप्त करुनी जमिनीला वाळून टाकी जीवने ।।

    नभीं मेघ आच्छादतां रोकती रविकिरणे
    तुफान पर्जन्य पडतां महापूर त्याचा बने ।।

    सुटतां भयंकर वारा निघून जाती ढग
    प्रचंड वादळाचा मारा पर्जन्य कसे होईल मग ।।

    वादळास अडविती पर्वत वलय त्याचे रोकूनी
    सारे करिती मदत आनंदी करण्या धरणी ।।

    एकाची शक्ती बनते दुसऱ्यास पुरक
    निसर्गचक्र शोधते संतुलन त्यांत एक ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      November 26, 2016


  • आदिदेव श्री गणेशा !!

    महाबली बालेश अससी तूच दुरजा,
    महं महामती अंबिकेय श्री गणेशा,
    अवतरी सुरेख अंगमळी गौरीनंदन,
    शार्दुल मनोमया तुज साष्टांग वंदन...!!१!!

    ॠध्दी सिध्दी द्वि सुंदर पत्नी,
    पार्वती अलक्ष इष्ट जननी,
    पाश-परशु-अंकुश हे शस्त्र,
    आखूरथ वाहे, नेसे पितांबरी वस्त्र...!!२!!

    यशस्वीन तु, भासे हरिद्ररूपी,
    गोल लंबोदर, चतुर्भुज वाढवी किर्ती,
    अवनीश मोहक कनिष्ठ इशानपुत्र,
    शोभले पिता पुत्रासी नाव भालचंद्र...!!३!!

    शिवानंदन म्हणुनी रूप प्रकटले,
    वरद गजमुख, शुभ्र गजदन्त लाभले,
    अथर्व अवनेश आदिदेव जाहले,
    कवीश गणपती रूद्र प्रिय भावले...!!४!!

    -- कु. श्र्वेता काशिनाथ संकपाळ.
    (१४-०९-२०१९)

    (काही शब्दांचे अर्थ खालीलप्रमाणे :-

    बालेश :- दुष्टांचा नाश करणारा
    दुरजा :- ज्याचा कुणी विनाश करु शकत नाही असा
    महं : ईशाधिपती
    महामती :- बुध्दीची देवता
    अंबिकेय :- पर्वतावर निवास करणारे ईश्र्वर
    शार्दुल:- देवांचा महिपती
    मनोमया :- भक्तांचे ह्रदय जिंकणारा
    अलक्ष :- ईश्वर, देव
    इष्ट :- आवडती या अर्थाने
    आखूरथ :- मुषक (उंदिर) वाहन असलेला
    यशस्वीन:- आनंद आणि यश घेऊन येणारा ईश्वर
    हरिद्ररूपी :- सोनेरी त्वचा असलेला.
    चतुर्भुज:- चार हात असलेला.
    अवनीश:- सगळ्या जगावर राज्य करणारा.
    कनिष्ठ:- लहान
    इशानपुत्र:- शंकराचे नाव
    वरद :- तेजस्वी
    अथर्व:- सर्व अडथळे पार करणारा
    अवनेश :- धरतीचा अधिपती.
    आदिदेव:- ज्या देवतेची सर्वात आधी उपासना केली जाते असा
    कवीश :-श्री. गणेशाचे नाव.
    रूद्रप्रियं:- शिव प्रिय असा तो श्री गणेश ., ई.)

      September 19, 2019


  • लुब्ध प्रीतीत भाव लपून आहे

    लुब्ध प्रीतीत भाव लपून आहे
    सांग दर्पणा चेहेरा मूक का आहे?
    प्राजक्त फुलांत गंध बहरुन आहे
    सांग रातराणी हितगून तुझे अबोल का आहे?
    प्रत्येक प्रश्नास उत्तर कधीच नसते
    सांग सखे मग तू काय शोधत आहे?
    नजरेतल्या भावनांचे अर्थ मिटून आहे
    नात्यांत प्रेम माया का हरवून आज आहे?
    प्रत्येक अर्थाचे पड अंतरात व्यापून आहे
    न कळतात जाणिवा माणूस निःशब्द का आहे?
    टपोरे चांदणे चंद्र साथीस बहरुन आहे
    आकाश पाण्यातले प्रतिबिंब का धूसर आहे?
    समजावल्या मनास कितीक मन परी वेडे आहे
    स्वैर होते मन अवखळ दोष तनास का लागत आहे?
    आयुष्याच्या पटावर डाव रोज नव्याने आहे
    का खेळवते नियती विधिलिखित का रुसून आहे?
    माझीच मी एकाकी अबोल मिटून आहे
    हृदयातल्या भावनांचा का दाह पेटला आहे?
    शाश्वत असे न आयुष्यात काही कुठले
    परी मन ओले भिजून हरवून कोठे आहे?
    एक हास्य गाली अबोल लाजून भाव आहे
    सुखाचे धागे भवती दुःख हृदयात का लपून आहे?
    आहे असे हे जीवन रोज खेळ रंगतो आहे
    न सुटते गणित काही गुणसूत्र सारे चुकून का आहे?
    आयुष्य रंगमंच खुला हा नाटकं जीवनी व्यापून आहे
    माहीत सारे मनास परी माणूस सुख शोधीत का आहे?
    -- स्वाती ठोंबरे.

      November 11, 2021


  • देवाचिया दारीं

    देवाचिया दारीं, मनाचा मुजरा,

    झुकवूनिया मान, हासे तो चेहरा ।। धृ ।।

    जाई जेव्हां मंदिरी,

    घेतां प्रभू दर्शन,

    आनंदानें नाचते,

    हर्षित चंचल मन,

    नयन साठविती, त्या मंगल ईश्वरा,

    देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।१।।

    नदीनाले धबधबा,

    उंच उंच वृक्ष वेली,

    कोकीळ गाती, मोर नाचे,

    इंद्रधनुष्याच्या खाली,

    रोम रोमातूनी शिरे, निसर्गाचा फवारा,

    देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।२।।

    दु:खी – कष्टी दुबळा,

    दीनवाणा दिसे,

    प्रभूच्याच आज्ञेने,

    भोग भोगीत असे,

    जातां हृदय भरूनी, करि आसवांचा मारा,

    देवाचिया दारी मनाचा मुजरा ।।३।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      September 30, 2019