(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बा.सी. मर्ढेकर यांची एक कविता

    दवांत आलीस भल्या पहाटी
    शुक्राच्या तोऱ्यात एकदा,
    जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
    तरल पावलांमधली शोभा

    अडलिस आणिक पुढे जराशी
    पुढे जराशी हसलिस; - मागे
    वळुनि पाहणे विसरलीस का?
    विसरलीस का हिरवे धागे?

    लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
    सुंदरतेचा कसा इशारा;
    डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
    सांग धरावा कैसा पारा!

    अनोळख्याने ओळख कैशी
    गतजन्मीची द्यावी सांग;
    कोमल ओल्या आठवणींची
    एथल्याच जर बुजली रांग!

    तळहाताच्या नाजुक रेषा
    कुणि वाचाव्या, कुणी पुसाव्या;
    तांबुस निर्मल नखांवरी अन
    शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या!

    दवांत आलिस भल्या पहाटी
    अभ्राच्या शोभेत एकदा;
    जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
    मंद पावलांमधल्या गंधा.

  • वाराणसीची वाताहत

    चार वर्षांपूर्वी वाराणसी येथील संकटमोचन हनुमान मंदिरात बॉम्बस्फोटांची मालिका घडवल्यानंतर अतिरेक्यांनी पुन्हा एकदा वाराणसीला लक्ष्य केले. यावेळी दशाश्वमेध घाटावर गंगा आरती सुरू असताना इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्यांनी स्फोट घडवून आणला. हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर तोपर्यंत सुस्त असलेले प्रशासन खडबडून जागे झाले. या बॉम्बस्फोटांमधून तरी प्रशासन काही धडा घेणार का हा प्रश्न आहे.

  • रांगोळी घालताना पाहून – कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत

    होते अंगण गोमये सकलही संमार्जिले सुंदर,

    बालार्के अपुली प्रभा वितरली नेत्रोत्सवा त्यावर;

    तीची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली;

    रांगोळी मग त्या स्थळी निजकरे घालावया लागली.

  • गाण्याच्या कहाण्या – नील गगन की छाँव में दिन रैन

    वैशालीतील वन -उपवने चैत्र पालवीच्या आनंदोस्च्छव साजरा करत होती . त्याला तो डेरेदार आम्रवृक्ष पण अपवाद नव्हता . चमकदार सुवर्ण छटा असलेली तपकिरी कोवळी पाने पहाणाऱ्याची नजरबंदी करत होती . याच आम्रवृक्षा खाली ,कोवळ्या आम्रपालवी प्रमाणेच एक कोवळं बाळ रडताना ,झाड जवळून जाणाऱ्या त्या आपत्यहीन दाम्पत्यास दिसले . ते बाळ एक मुलगी होती . त्यांनी तिचा पोटच्या लेकरा प्रमाणे सांभाळ केला . आम्रवृक्षाच्या छायेतील मुलीचे नामकरण केले 'आम्रपाली ' ! कला कलाने वाढत्या वयाबरोबर तिचे 'सौन्दर्य ' पण फुलात गेले ,खुलत गेले . समाज आणि नियतीच्या नजरेत ते 'सौन्दर्य ' सुखद होण्या ऐवजी खुपत गेले . याच तिच्या सौन्दर्याने तिला 'राजनर्तकी ' आणि ---- आणि 'नगरवधू' करून सूड उगवला !

    अशा या आम्रपालीवर याच नावाचा १९६६साली (एफ सी मेहरा -निर्माता . लेख टंडन -दिग्दर्शक )एक सुंदर सिनेमा बनवला होता . अजातशत्रू (सुनील दत्त )आणि आम्रपाली (वैजयंतीमाला )यांची प्रेम कहाणी असणारा . विषय नगरवधूच असल्याने नाच -गाण्यास बेसुमार वाव होता पण या सिनेमात फक्त चार गाणी आहेत ! पण प्रत्यक गाणे एक 'हिरा ' आहे . गुणवत्ता ,गुणवत्ता म्हणतात ती हीच . आज याच सिनेमातील एका गाण्याचा मागोवा घेण्याचा मानस आहे .

    ' नील गगन की छाँव में दिन रैन गले से मिलते हैं
    दिल पंछी बन उड़ जाता हैं, हम खोये खोये रहते हैं '

    हे विरह गीत याच सिनेमातलं . इतर तीन गाणी शैलेंद्रची आहेत . फक्त हे एकच गाणे हसरत जयपुरी यांनी लिहलंय . नितांत सुंदर गीतरचना . गोड शब्दांची लयबद्ध गुंफण . त्याहून सुरेल लताजींचा आवाज ! या सिनेमाची अनेक वैशिष्ट्ये आहेत . या सिनेमात सर्व गाणी लताजीची सोलो सॉंग आहेत ! लताजींच्या आवाजाची रेंज अफाट आहे . त्यांच्या आवाजातील हे गाणं एक अविस्मरणीय ठेवा आहे , आनंद आहे . तसा तो त्यांनी गायिलेल्या सगळ्याच गाण्यात असतो ! तरी प्रत्येक गाण्यात ,ऐकताना काहीतरी नवीन गवसत !अमूल्य , आयुष्यभर जपावंवाटावं असं ! या गाण्यात पण ते आहेच !

    ' जब फूल कोई मुस्काता हैं, प्रीतम की सुगंध आ जाती हैं

    नस नस में भँवर सा चलता हैं, मदमाती जलन तल पाती हैं

    यादों की नदी घिर आती हैं, हर मौज में हम तो बहते हैं '
    या पहिल्या कडव्याची --जब फूल कोई मुस्काता हैं,-- याओळीनें करून जेव्हा-- प्रीतम की सुगंध आ जाती हैं या ओळीला येतात तेव्हा लताजी आपल्या सुरांची पट्टी खाली घेतात . एखादी मनातली गोष्ट सांगताना जसे आपण खालच्या आवाजात सांगतो तसे . पुन्हा --नस नस में भँवर सा चलता हैं --ला सामान्य पट्टीत तर -- मदमाती जलन--ला खालची पट्टी . जणू सूर लहरींच . हा सूर लहरींचा प्रवाह ऐकणाऱ्याला , नायिकेच्या विरहात खेचून नेतो . लताजींनी हि सुरलहरींची आवर्तने दुसऱ्या कडव्यात पण सांभाळी आहेत .

    ' कहता हैं समय का उजीयारा, एक चन्द्र भी आनेवाला हैं
    इन ज्योत की प्यासी अखियन को ,अंखियों से पिलानेवाला हैं
    जब पात हवा से बजते हैं, हम चौंक के राहें तकते हैं '
    हे दुसरे कडवे अर्थाच्या दृष्टीने मोहक आहे . लताजींनी जीव ओतून गायलंय . प्रियकराची अपरात्री वाट पहाणाऱ्या प्रियसीच्या मनाची अवस्था ---जब पात हवा से बजते हैं, हम चौंक के राहें तकते हैं ' या ओळीत अनुभवता येते . !

    या गीताच्या गोडव्याला शंकर -जयकिशन यांनी संगीतबद्ध केलाय . हसरत जैपुरींचे शब्द - लताजींचा स्वर्गीय आवाज - शंकर जयकिशनचे संगीत ,अमरत्वा साठी एखाद्या गाण्यास अजून काय हवे ? असे म्हणतात कि हे गाणे एकट्या शंकरजींनी कंपोज केलाय . या गाण्याची मूळ मेलोडी जपण्यासाठी त्यांनी या गाण्यात मोजक्याच वाद्यांचा वापर केलाय . पखवाज , तबला , वीणा आणि व्हायोलिनचे काही तुकडे , बस ! गाण्याच्या सुरवातीचा पखवाजचा 'तुकडा ' अप्रतिम (एकदम कडक )आहे . या गाण्यास एक मस्त असा प्रवाह आहे . हि गती तबल्यावरला केरवा साकाळू देत नाही .

    हे गाणे 'भूप ' (भूपाळी , भूपाली )रागातील आहे . हा एक खूप गोड राग आहे . मुलायम किंवा ज्याला आपण 'सॉफ्ट मेलोडी ' म्हणतो तसा . यमन ,भूप आणि भैरवी हे संगीतातले प्राथमिक (बेसिक )राग आहेत . संगीत शिकताना हे सुरवातीस चांगले घोटून घेतात . भूप रागाची वेळ रात्रीचा प्रथम प्रहर (७ते १० ). हा राग 'भक्ती ' रस प्रधान आहे . यात 'म ' आणि ' नि ' वर्ज , म्हणजे आरोहात आणि अवरोहांत फक्त पाचच स्वर . पण या रागाच्या चलनात खूप वैविध्य असते ,म्हणून या रागावर बरीच गाणी बेतली जातात /जाऊ शकतात .

    हे गाणे एक राजदरबारातील नृत्य गीत म्हणून वैजयंतीमाला वर चित्रित केले आहे . वैजयंतीमाला . भरतनाट्यमची प्रख्यात नृत्यांगणा . हिंदी सिनेमातली पहिली फिमेल सुपर स्टार . हेमामालिनीच्या आधीची ड्रीम गर्ल ! वैजयंतीमालाचे अभिनय आणि नृत्य कौशल्य वादातीत आहे . तिने या सिनेमात ' ' आम्रपाली ' जिवंत केलीय ! ती या सिनेमा पुरती 'आम्रपाली ' जगलीय !

    या गाण्याचा सुरवातीस आपल्या प्रियकराच्या प्रतीक्षेत असलेल्या 'आम्रपाली ' स दरबारात नृत्य करावे लागते . ' मन एकी कडे आणि तन एकी कडे ' हि मानसिकता आपल्या देहबोलीतून वैजयंतीमालाने अप्रतिम पणे व्यक्त केली आहे . हाफ हार्टटेड नाचासाठी हवी असलेली देहबोली तरी परिपूर्ण नृत्य , हि तारेवरची कसरत वैजयंतीमालाच करू जाणे ! जेव्हा गाण्याच्या शेवटी शेवटी प्रियकर दिसतो ,त्यानंतर आम्रपाली जी 'तन -मन 'झोकून नाचते ,ते पाहिल्यावर आत्तापर्यंतचे नृत्य अपूर्ण होते याची प्रेक्षकांना (आपल्याला )होते ! येथे तिच्या नृत्य आणि मुद्रा-अभिनय कौशल्याला सलाम करावा लागतो !अर्थात यात श्री गोपी किशन यांचे श्रेय नाकारून चालणार नाही . या नृत्याला त्याचा परीसस्पर्श झाला आहे . ते याचे डान्स डायरेक्टर आहेत .

    ' आम्रपाली ' या सिनेमाची अनेक वैशिष्टे आहेत . वैजयंतीमाला ची नृत्ये , कमी गाणी ,आणि ती सर्व लता मंगेशकरांची सोलो ,चार गाण्यात हि दोन गीतकार , यांचा संदर्भ आलाच आहे . या सिनेमातील भव्य सेट्स हा हि एक प्लस point आहे . आचरेकरांनी देखणे सेट्स या सिनेमासाठी दिलेत . बुद्धकालीन वैशाली त्यांनी साकार केलीय . भव्य सेट्स इतकेच ,किंबहुना काकणभर ज्यास्त यातील युद्ध प्रसंगाचे चित्रीकरण आहे . प्रेक्षक प्रत्यक्ष युद्धभूमी अनुभवतो . इतके ते युद्ध प्रसंग 'जिवंत ' वाटतात ! आणि का वाटू नयेत ?या युद्धासाठी सैन्य म्हणून ज्युनियर आर्टिस्ट नव्हे तर --तर आर्मीचे खरे जवान होते आणि घोडदळ सुद्धा आर्मीचे होते ! लेख टंडन यांनी या साठी आर्मीला विशेष विनंती केली होती . या सिनेमाचे अजून एक वैशिष्टय होते ते ,वेशभूषा . बुद्धकालीन कॉस्ट्यूम अभ्यासण्या साठी या सिनेमाच्या कॉस्ट्यूयम डिझायनर यांनी अंजिठ्यास भेट दिली होती . आम्रपालीची स्पेशल ' स्ट्रीप लेस चोली ' खूप फेमस झाली . आजही आम्रपाली ड्रेस ला मार्केट आहे . या सिनेमाच्या कॉस्ट्यूयम डिझायनर होत्या भानुमती अथैया !

    असा हा भव्य -दिव्या सिनेमा , उत्कृष्ट कथा , उत्कृष्ट स्टारकाष्ट , श्रवणीय गीते , उत्तम नृत्ये , ए वन सिनेमाटोग्राफी , उत्तम दिग्दर्शन . सगळंच अत्योत्तम असून हि सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला !दुर्दैव दुसरे काय ? वैजयंतीमालानी हे अपयश खूप मनाला लावून घेतले . 'इंडस्ट्री 'सोडण्याच्या विचारात होती.
    ऐकण्यासाठी सुरेल ,पहाण्यासाठी देखणे, थोडक्यात कानाचे आणि डोळ्याचे पारणे फेडणारे भूप रागातील हे गाणे . या लिंक वर https://www.youtube.com/watch?v=55LRrp3XNA4 पाहू शकता .
    जात जात मला माहित असलेली काही भूप रागातील गाणी
    • पंछी बनू उडती फिरू ----------------चोरी -चोरी १९५६
    • ज्योती कलश छलके ------------------भाभि की चुडिया १९६१
    • पंख होते तो उड आते रे ---------------सेहरा १९६३(माझे आवडते )
    • सायोनारा सायोनारा -------------------लव्ह इन टोकियो १९६६
    • दिल हू SS म हू SSS म करे -----------रुदाली १९९३ (माझे मित्र मंगेश उदगीरकर यांच्या आवडीचे )
    • देखा एक खाब तो ----------------------सिलसिला १९८१
    • इन आखोंकी मस्ती के ,मस्ताने -------उमरावजान १९८१

    आता काही मराठी गाणी

    • घनश्याम सुंदरा
    • उठी उठी गोपाळा
    • ऐरणीच्या देवा तुला
    • देहाची तिजोरी
    • धुंद मधुमती रात रे (माझ्या प्रिय गण्या पैकी एक )
    -- सु र कुलकर्णी ---
    प्रतिक्रियांची वाट पहात आहे . पुन्हा भेटूच . Bye .

  • अमेरिकेतील एक – – Dating Center

    Dating ची संकल्पना ही वैचारीक आणि एका मर्यादेपर्यंत भावनिक स्वातंत्र्याला मान्यता देते.पाश्चिमात्य लोकानी त्यांच्या संस्कृती, सामाजिक, कौटूंबीक जडन घडन इतकी बदलून टाकली की त्या ठिकाणी कुणाच्याही विचारांना, भावनेला आणि म्हणून वागण्याला पायबंद राहात नाही.

  • श्रीकृष्णभक्तीचा प्रसार-प्रचार

    भक्तीमध्ये सतत प्रगतीशील राहिले पाहिजे.

  • असेल हरी तर देईल… (नशायात्रा – भाग ३)

    इयत्ता आठवीपासूनच अभ्यासाकडे दुर्लक्ष करत गेलो होतो, त्यामुळे दहावीत जेमतेम ५० टक्के मार्क्स मिळालेले. कॉलेजला तर आभ्यासाच्या बाबतीत आनंदीआनंदच होता, मित्र, सिनेमा आणि व्यसने अश्या उनाडक्या जोरात सुरु राहिल्या….

  • चपलेचा असाही उपयोग..!!

    देशात महिला किती सुरक्षित आहेत याची जाणीव दिल्ली बलात्काराच्या घटनेनंतर सर्व स्त्रियांना झाली. कुटुंबासाठी अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांना रात्री-अपरात्री नोकरीवरून घरी यायचे असेल तर अशा परिस्थितीत त्यांनी काय करायचे? घाबरून घरी बसणे म्हणजे पळपुटे लक्षण समजण्यात येईल आणि गुन्हेगारांच्या गुन्ह्यात वाढ होईल आणि त्यांचे मनोधैर्य वाढेल. त्यावर ठाण्यात चिल्ड्रन टेक सेंटरच्या विद्यार्थ्यांकडून इलेट्रोनिक ग्यॅझेट तयार करण्यात यश आले आहे. तो उपक्रम चालवणारे पुरषोत्तम पाचपांडे यांना रोबोटिक चप्पल तयार करण्याची कल्पना सुचली.

  • बांगड्या

    संक्रांतीचा सण आला की कासाराच्या दुकानात किंवा डोक्यावर बांगड्यांचा मोठा हारा घेऊन घरोघरी जाऊन बांगड्या भरणारी कासारीण आठवते अजून. आठ पंधरा दिवस ही धामधूम सुरू असते. पाटल्या बिलवर घेऊन दुकानात गेल्यावर आपल्या मापाच्या बांगड्या भरवल्या की कासाराच्या पाया पडून निघायचे अशी पद्धत होती.

  • भृणहत्या, वैद्यकीय व्यवसायाचे व्यापारीकरण वगैरे वगैरे

    जेव्हा वैद्यकीय व्यवसायाचे व्यापारीकरण असा शब्दप्रयोग केला जातो तेव्हा हसावे की रडावे हे कळत नाही. कोणत्या व्यवसायाचे व्यापारीकरण झाले नाही. कोणत्या क्षेत्रास ह्या व्यापारीकरणाने सोडले आहे. सन्माननिय समजली जाणारी क्षेत्रे उदा. न्याय, शिक्षण, सामाजिक इ. क्षेत्रे यापासून मुक्त आहेत असे म्हणता येईल का.