विशेष निमित्ताने विविध वयाच्या आणि नात्याच्या माणसांना शुभेच्छा देण्याचा कल आता वाढतोच आहे. पैशांना काही मोलच राहिले नाही. कितीही पैसे खर्च केले तरी आपल्याला आणि उत्सवमूर्तीला विकत घेतलेली वस्तू आवडेलच याचा नेम नसतो. मग "हटके " असे काही द्यावे असे वाटते.त्यासाठीच मी अलीकडेच काही वेगळ्या वस्तू बनवून दिल्या त्याची ही थोडी झलक !
फक्त महत्वाचे म्हणजे हे काम मिरवून कौतुक करून घेण्याचे आता माझे वय नाही आणि तो उद्देशही नाही. पण याआधी मी जेव्
हा अशी माहिती शेअर केली तेव्हा अनेकांनी तशा वस्तू स्वत: बनवून आनंद घेतला. त्यावरून आपल्याला आणखी चांगल्या वस्तू सुचल्याचे कळवले. कांही मुलींनी सुट्टीत अशा वस्तू बनवून विकल्या आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत जमवली. आनंद वाटण्याचा एवढाच माझा उद्देश आहे .
मला आईवडिलांसारखे असलेल्या परांजपे दांपत्याने नुकताच लग्नाचा साठावा वाढदिवस साजरा केला.त्यांच्यासाठी
मुंडावळ्यांचा ६० आकडा तयार करून सजविलेले पाकीट मलाच भरभरून आशीर्वाद देऊन गेले. ऑफिसमधील एका चेनस्मोकर मित्राला त्याच्या वाढदिवसाला जाड कार्डबोर्डची सिगारेट बनवून त्यात पुष्पगुच्छ अडकवून दिला. देताना अशा शुभेच्छा दिल्या की पुढच्या वाढदिवसापर्यंत मधली ही सिगारेट कायमची जाऊ दे आणि मला थेट पुष्पगुच्छ देता येऊ दे ! एका वकील मित्राला " ऑर्डर ऑर्डर "वाल्या हातोड्यात घालून पुष्पगुच्छ दिला.नुसता नारळ देतांना त्याला जर एखादी नक्षी
दार लेस बांधून दिली तर त्याचे मोल वाढते. ५००/६०० रुपयांचा खरा पुष्पगुच्छ २ /३ दिवसात फेकून द्यावा लागतो.पण हंस / बदकाच्या आकाराच्या टोपल्यात सजवून दिलेला कृत्रिम फुलांचा गुच्छ कांही वर्षे आपली आठवण ठेवतो.
एकाच गुच्छाला दोन मुठी ठेवून बनविलेला गुच्छ हा लग्नाच्या रौप्य महोत्सवासाठी ! तोपर्यंत संसार ही २ मुठींची तलवार नाही हे पटलेले असते.
--मकरंद करंदीकर.
सुप्रसिद्ध क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉट हा त्यावेळी लक्षात राहिला तर तो त्याचा खेळामुळे, बिन्धास बोलण्यामुळे आणि कॉन्टॅक्ट लेन्स मुळे ….
स्वामी निश्चलानंदांची एक रचना
कित्येक वेळी आली आम्हास
जरी बाल्टिक देश खूप जवळ असले तरी ते पाहिल्यावर प्रत्येक देश हा वेगळा भासतो. येथील स्वस्त शॉपिग, बाझार, जेवण, भाषा, संस्कृती पर्यट्कांना आकर्षित करते.
काही माणसांमध्ये समोरच्या व्यक्तीचे अंतर्भूत् गूण ओळखण्याची एक विशेष दृष्टी असते. एकेकाळचा कॉमेडी किंग मेहमूद याच्याकडे ती दृष्टी होती. बरं नुसती दृष्टी असूनही भागत नाही त्या गुणानां संधी कशी व केंव्हा देता येईल याचाही ते विचार करतात. आज चित्रपटसृष्टीतल्या ज्या दिग्गजानांवर आपण मनापासून प्रेम करतो त्यात अमिताभ, आर.डी.बर्मन व राजेश रोशन यांचाही समावेश आहे. आणि या तिघानांही मेहमूदने मूख्य संधी दिली आणि या तिघानाही आपला अमीट ठसा उमटविला. आर.डी. बमर्न खरं तर खूप मोठ्या संगीतकाराचा मुलगा. वडील एस.डी.बमर्नची अनेक गाणी खरं तर स्वत: आरडीने कंपोज केली आहेत. मनात आणले असते तर त्यांनी कोणत्याही चित्रपट निर्मात्याकडे शब्द टाकून आरडीच्या कारकिर्दीची वाट मोकळी केली असती पण ‘स्वत:च्या कर्तृत्वावर काय हवे ते करा’ असं मानणाऱ्या लोकांचा तो काळ असल्यामुळे सचीनदांनी शब्द टाकला नसावा.
मेहमूद हा फक्त एक कॉमेडियनच नाही तर निर्माता-दिग्दर्शक होता. स्ट्रगल करणाऱ्या कलावंताचे कलागूण हेरणारा मोठ्या मनाचा माणूसही होता. त्याने आरडीतले टॅलेंट बरोबर ओळखले. १९६१मध्ये मेहमूदने ‘छोटे नवाब’ नावाचा चित्रपट काढला व त्यात आरडी ला पहिली संधी दिली. यात विविध मूडची ९ गाणी होती. मॉर्डन डान्स, विरह गीत, कॉमेडी गीत, कव्वाली, कब्बडी खेळावरील गीत पैकी अशा सर्व प्रकारची गाणी त्यात होती. पैकी “घर आजा घीर आए….” हे लताचे अप्रतिम क्लासिकल ढंगाचे गाणे आजही ओठावर सहज येते. या चित्रपटा पासून या दोघांच्या मैत्रीस सुरूवात झाली जी शेवट पर्यंत टिकली. पूढे आर.डी. बर्मनने चित्रपटसृष्टीत आपल्या आगळ्या रंगाने व ढंगाने चित्रपट संगीतात धूमाकूळ घतला. गमंत म्हणजे याच आरडीच्या बासू देव चक्रवर्ती व मनोहारी सिंग( बासू मनोहारी) या सहाय्यकानां मेहमूदने आपल्या ‘सबसे बडा रूपैय्या’ या चित्रपटात स्वतंत्र संधी दिली.( आठवा… ना बिबी ना बच्चा, ना बाप बडा ना मैया..द होल थिंग)
१९६१ ला सुरू झालेला हा संगीतमय प्रवास १९९४ ला संपला. ३०० च्या आसपास गाणी देणारे आर.डी बर्मन चिऋपटसृष्टीत पचंम या नावाने ओळखले जात. संगीतातल्या सात सुरात सा आणि प हे दोन स्वर शुद्ध मानले जातात तर बाकीचे पाच स्वर दोन प्रकारात गणले जातात तीव्र आणि कोमल. संगीतातला प अर्थात पचंम ही आरडी ओळख ठरली. लहानपणी त्यानां टुबलू या नावाने सर्व हाक मारीत. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांनी एका गाण्याला चाल लावली ज्याचा पूढे सचिनदानी फंटूश या चित्रपटात वापर केला….”ये मेरी टोपी पलटके आ” हे ते गाणे. तसेच प्यासा ममधील “सर जो तेरा चकराये” याची चाल पण त्यानीच बांधली होती. परदेशी वाद्यां इतकाच देशी वाद्यांचा अप्रतिम वापर पचंम दा करीत असत. पूढे ते, आशाताई, किशोर व गुलजार यानीं चित्रपटसृष्टीला अप्रतिम गाणी दिली………………‘घर आजा घिर आई बदरिया सावरिया’ (छोटे नवाब- लता) मुजरा शैली व सेमी क्लासिकल असलेले हे गाणे मेलडीचेउत्तम उदाहरण आहे……….. ‘दइया ये मैं कहां आ फंसी’ (कारवां-लता) यात हास्य निर्मितीसाठी ऑर्केस्ट्राचा उत्तम वापर केला आहे……….’चुनरी संभाल गोरी’ (बहारों के सपने- मन्नडे व लता) पाश्चीमात्य संगीताचा छाप म्हणून ओळखले जाणाऱ्या पंचमदानी या गाण्यात अस्सल बिहारी मातीचा दरवळ दिलाय. यातील ताल वाद्यांचा मेळ ऐकण्या सारखा आहे…………’पल दो पल का साथ हमारा’(बर्नींग ट्रेन- रफी व आशा) साहिरची ही कव्वाली पचंमदानी केदार रागाचा मुलायम मुलामा देऊन किती सुंदर बांधली आहे…………….’अ आ इ ई मास्टर जी की आ गई चिट्ठी’ (किताब) या गाण्यात तर चक्क मुलांच्या डेस्कच्या ध्वनींचा वापर करून घेतला आहे……………….’मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है’ (इजाज़त- आशा भोसले) हे गाणे जेव्हा गुलजार यांनी पचंमदाकडे पाठवले तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया होती- ‘मला ही सामानाची यादी कशाला पाठवलीत. याला कशी चाल लावायची?’ पण गुलजार यानां माहित होते पचंमदाच याला चाल लावू शकतात आणि झालेही तसेच. या गाण्याने इतिहास रचला…………………………..’तेरे बिना ज़िंदगी से कोई शिकवा तो नहीं’ (आंधी- किशोर लता) यातील मधून मधून पेरलेले संजीव कुमारचे संवाद आणि लता किशोरचा आवाज म्हणजे पचंमदाच्या प्रतिभेचे सर्वोच्च शिखर…………’चांद मेरा दिल’ (हम किसी से कम नहीं)या गाण्यात पाच सहा छोटीछोटी गाणी होती. पाश्चिमात्य आणि भारतीय संगीताचा अनोखा मेळ म्हणजे हे गाणे……………’दम मारो दम’(हरे कृष्ण हरे रामा- आशा) या गाण्यातल्या सुरूवातीच्या गिटारच्या सुरांनी ७० च्या दशकातील पिढी पार वेडी झाली होती……………..’रैना बिती जाए’( अमर प्रेम- लता) हे गाणे जेव्हा मदन मोहन यांनी ऐकले तेव्हा त्यांनी सचिन देव बर्मन यानां फोन केला -‘’हे गाणे तुम्ही अप्रतिम रचले आहे,शुभेच्छा’’ म्हणाले. पण सचिनदा म्हणाले हे मी नाही पचंमने केले आहे तेव्हा मदन मोहन देखिल चकीत झाले………………………………बिती ना बिताई (परीचय- भूपेंद्र व लता)…………पचंमदाच्या गाण्याची यादी खूपच मोठी आहे…
रसिक प्रेक्षकातील प्रत्येकाला त्यांचे किमान एक तरी गाणे हे आवडतेच. ते स्वत: उत्कृष्ट हार्मोनिका व माऊथ ऑर्गन वाजवित असत. सामता प्रसाद या विख्यात तबलजी कडून तबला वादनाचे धडेही त्यांनी गिरवले होते.शोले मधील चल धन्नो अशी साद घालून वसंती जेव्हा टांगा पळवते तेव्हा तबल्याचे कडाडणारे बोल आठवा ते पचंमदानी वाजवले होते. तसेच शोले मधील गब्बर जेव्हा जेव्हा येतो त्यावेळचे पार्श्व संगीत आठवून बघा….काचेच्या ग्लासाने या ध्वनीची निर्मिती त्यांनी केली होती…..त्यांनी स्वत:च्या वेगळ्या आवाजाचा देखील छान वापर करून घेतला………चित्रपट विश्वातील अनेक गुणी कलावंत कमी वयात आपल्याला सोडून गेले. शुद्ध स्वराचे प्रतिक असलेला ‘पंचम’ सूर वयाच्या ५५ व्या वर्षी कोमल होऊन कायमचा विसावला.….
-दासू भगत (२७ जून २०१७)
सुप्रसिद्ध क्रिकेटपटू जॅक कॅलिस

जॅक कालीसचा जन्म १६ ऑक्टोबर १९७५ रोजी दक्षिण आफ्रिकेमधील केप टाऊन येथे झाला. जॅक कॅलिस याने शालेय जीवनापासूनच क्रिकेट खेळण्यास सुरवात केली. जुलै १९९३ मध्ये त्याला अंडर - १७ मधून खेळवले गेले ते स्कॉटलंडच्या अंडर -१९ च्या टीमविरुद्ध . वयाच्या १८ व्या वर्षी तो पहिला फर्स्ट क्लास क्रिकेट सामना खेळला तर वयाच्या १९ व्या वर्षी उन्हाळ्यामध्ये ' पार्कसाईड रोड ' मधून खेळून येताना त्याने ९८.८७ या सरासरीने ७९१ धावा १४ सामन्यांमध्ये केल्या .
जॅक कॅलिस त्याचा पहिला कसोटी सामना खेळला तो इंग्लंडविरुद्ध १४ डिसेंबर १९९५ रोजी . १९९८ ते २००२ या कालखंडमध्ये जॅक कॅलिस सर्वोत्कृष्ट ' ऑल राउंडर ' म्हणून ओळखला गेला. जॅक कॅलिस अजून खेळायचा बाकी आहे म्हटले की निर्णय कधीही फिरू शकतो हे त्याच्या विरुद्ध खेळणाऱ्या टीमला वाटत असे . कारण त्याच्यामध्ये प्रचंड एकाग्रता आणि डळमळीत न होणे हे दोन महत्वाचे गुण होते. ज्यांनी जॅक कॅलिसला खेळताना ' लाईव्ह ' स्क्रीनवर किंवा प्रत्यक्ष पाहिले आहे त्यांना माझे म्हणणे पटेल. जॅक कॅलिस टीम मध्ये असला की विजयाजवळ सहज जात येईल असे वाटत असे. तो १६६ कसोटी सामने खेळला त्यापैकी ८२ सामने जिंकले ४२ अनिर्णित राहिले आणि ४२ सामने दक्षिण आफ्रिका हरली म्हणजे १६६ सामने असताना फक्त ४२ सामने दक्षिण आफ्रिका हरली असेच म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे तो ३२५ एकदिवसीय सामने खेळला त्यापैकी २०८ सामने दक्षिण आफ्रिकेने जिकंले आणि १०२ सामने दक्षिण आफ्रिकेने हरले होते .

जॅक कॅलिस हा पहिला खेळाडू आहे ज्याने १०,००० धावा कसोटी सामन्यांमध्ये आणि १०,००० धावा एकदिवसीय सामन्यांमध्ये केल्या असून कसोटी क्रिकेटमध्ये २०० विकेट्स आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये २०० विकेट्स घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याने ग्रॅमी स्मिथ बरोबर टी २० च्या सामन्यामध्ये पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली आहे. एक बाबतीत जॅक कॅलिस ची बरोबरी सर गारफिल्ड सोबर्स बरोबर करता येईल . सोबर्स यांनी ५८ च्या सरासरीने ८०३२ धावा केल्या आणि २३५ विकेट्स घेतल्या त्या ३४ च्या सरासरीने. तर जॅक कालीसची फलंदाजीची सरासरी होती ५७ तर गोलंदाजीची सरासरी होती ३३. २००८ साल हे त्याच्यासाठी फार महत्वाचे होते कारण शॉन पोलॉक निवृत्त झाला होता आणि जबाबदारी जॅक कॅलिसवर आली होती. सोबर्स हा स्फोटक आणि दणकेबाज खेळ करत असे तर जॅक कॅलिस हा ऑर्थडॉक्स खेळाडू होता. दोघांची दोन टोके होती असेच म्हणावे लागेल. कोलकत्याला त्याने खेळताना अनेकांचा दम काढला होता हे कुणीही विसरणार नाही . कॅलिसने १६६ कसोटी सामन्यांमध्ये १३,२८९ धावा केल्या त्या ५५.३७ या सरासरीने त्यामध्ये ४५ शतके आणि ५८ अर्धशतके होती. कसोटी सामन्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या होती २२४ . त्याचप्रमाणे त्याने कसोटी सामन्यांमध्ये ३२.६५ या सरासरीने २९२ विकेट्स घेतल्या तर एका इनिंगमध्ये ५४ धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या . त्याने कसोटी सामन्यामध्ये २०० झेलही घेतले. तर त्याने ३२८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११,५७९ धावा केलेल्या त्या ४४.३६ या सरासरीने त्यामध्ये त्याची १७ शतके आणि ८६ अर्धशतके होती. एकदिवसीय सामन्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या होती १३९ तर त्याने एका इनिंगमध्ये ३० धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या तर १३१ झेलही पडले.
नीट पाहिले तर जॅक कॅलिस याची कसोटी क्रिकेट आणि फर्स्ट क्लास क्रिकेट यामधील फलंदाजीची सरासरी जवळजवळ सारखी आहे अर्थात हे फारच कमी जणांच्या बाबतीत घडते. त्याने २५७ फर्स्ट क्लास सामन्यामध्ये १९,६९५ धावा केल्या त्या ५४.१० या सरासरीने तर कसोटी सामन्यांमध्ये त्याने १३,२८९ धावा केल्या त्या ५५.३७ या सरासरीने. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने ६२ शतके आणि ९७ अर्धशतके केली त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे २२४ . जॅक कॅलिसने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एका इनिंगमध्ये ५४ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या. त्याचप्रमाणे त्याने २६४ झेलही घेतले.
जॅक कॅलिसला एकदिवसीय सामन्यांमध्ये २४ वेळा ' मॅन ऑफ द मॅच ' मिळाले. आय. सी.सी. ने जॅक कॅलिसचा २००५ मध्ये ' प्लेअर ऑफ द इअर ' म्हणून त्याचा सन्मान केला होता. २००५ मध्ये २००८ मध्ये विझडेनने त्याला ' लिडिंग क्रिकेटियर इन द वर्ल्ड ' संबोधले होते.
जॅक कॅलिसची लहान बहीण जी त्याच्यापेक्षा १० वर्षाने लहान होती ती २००९ च्या आय. पी. एल . मध्ये ' चिअर गर्ल ' होती, त्यावेळी ती भारतात आली होती. निवृत्तीनंतर त्याने एक फाउंडेशनची आपल्या सहकार्यांसमवेत स्थापना केली आणि त्याच्या विभागातील मुलांना तो मदत करतो.
सतीश चाफेकर
टीव्ही पाहताना रिमोटचा वापर अपरिहार्य बनला आहे. पण हल्ली टीव्ही केवळ वाहिन्या पाहण्यासाठीच नव्हे तर इंटरनेट, नेटवर्किंग साईट्स आणि इतरही अनेक अॅप्लीकेशन्साठी वापरला जातो. अशा वेळी ग्राहकाला रिमोटद्वारे टायपींगचीही गरज पडते. म्हणून स्मार्ट फोनचाच रिमोट म्हणून वापर करता यावा यासाठी काही अॅप्लीकेशन्स तयार करण्यात आली आहेत. टीव्ही कंपन्याही अशी अॅप्लीकेशन्स तयार करू लागल्या आहेत.
चॅनेल्स नव्हती,रिमोट नव्हते त्यामुळे जे काही समोर सुरू आहे, ते भक्तिभावाने पाहत सगळं कुटुंब रंगून जायचं…त्यातल्या त्यात टीव्हीचा आवाज कमीजास्त करणं हीच काय ती हालचाल.. तेव्हाचा रिमोट हा घरातील शेंडेफळ असे..
वैशालीतील वन -उपवने चैत्र पालवीच्या आनंदोस्च्छव साजरा करत होती . त्याला तो डेरेदार आम्रवृक्ष पण अपवाद नव्हता . चमकदार सुवर्ण छटा असलेली तपकिरी कोवळी पाने पहाणाऱ्याची नजरबंदी करत होती . याच आम्रवृक्षा खाली ,कोवळ्या आम्रपालवी प्रमाणेच एक कोवळं बाळ रडताना ,झाड जवळून जाणाऱ्या त्या आपत्यहीन दाम्पत्यास दिसले . ते बाळ एक मुलगी होती . त्यांनी तिचा पोटच्या लेकरा प्रमाणे सांभाळ केला . आम्रवृक्षाच्या छायेतील मुलीचे नामकरण केले 'आम्रपाली ' ! कला कलाने वाढत्या वयाबरोबर तिचे 'सौन्दर्य ' पण फुलात गेले ,खुलत गेले . समाज आणि नियतीच्या नजरेत ते 'सौन्दर्य ' सुखद होण्या ऐवजी खुपत गेले . याच तिच्या सौन्दर्याने तिला 'राजनर्तकी ' आणि ---- आणि 'नगरवधू' करून सूड उगवला !
अशा या आम्रपालीवर याच नावाचा १९६६साली (एफ सी मेहरा -निर्माता . लेख टंडन -दिग्दर्शक )एक सुंदर सिनेमा बनवला होता . अजातशत्रू (सुनील दत्त )आणि आम्रपाली (वैजयंतीमाला )यांची प्रेम कहाणी असणारा . विषय नगरवधूच असल्याने नाच -गाण्यास बेसुमार वाव होता पण या सिनेमात फक्त चार गाणी आहेत ! पण प्रत्यक गाणे एक 'हिरा ' आहे . गुणवत्ता ,गुणवत्ता म्हणतात ती हीच . आज याच सिनेमातील एका गाण्याचा मागोवा घेण्याचा मानस आहे .
' नील गगन की छाँव में दिन रैन गले से मिलते हैं
दिल पंछी बन उड़ जाता हैं, हम खोये खोये रहते हैं '
हे विरह गीत याच सिनेमातलं . इतर तीन गाणी शैलेंद्रची आहेत . फक्त हे एकच गाणे हसरत जयपुरी यांनी लिहलंय . नितांत सुंदर गीतरचना . गोड शब्दांची लयबद्ध गुंफण . त्याहून सुरेल लताजींचा आवाज ! या सिनेमाची अनेक वैशिष्ट्ये आहेत . या सिनेमात सर्व गाणी लताजीची सोलो सॉंग आहेत ! लताजींच्या आवाजाची रेंज अफाट आहे . त्यांच्या आवाजातील हे गाणं एक अविस्मरणीय ठेवा आहे , आनंद आहे . तसा तो त्यांनी गायिलेल्या सगळ्याच गाण्यात असतो ! तरी प्रत्येक गाण्यात ,ऐकताना काहीतरी नवीन गवसत !अमूल्य , आयुष्यभर जपावंवाटावं असं ! या गाण्यात पण ते आहेच !
' जब फूल कोई मुस्काता हैं, प्रीतम की सुगंध आ जाती हैं
यादों की नदी घिर आती हैं, हर मौज में हम तो बहते हैं '
या पहिल्या कडव्याची --जब फूल कोई मुस्काता हैं,-- याओळीनें करून जेव्हा-- प्रीतम की सुगंध आ जाती हैं या ओळीला येतात तेव्हा लताजी आपल्या सुरांची पट्टी खाली घेतात . एखादी मनातली गोष्ट सांगताना जसे आपण खालच्या आवाजात सांगतो तसे . पुन्हा --नस नस में भँवर सा चलता हैं --ला सामान्य पट्टीत तर -- मदमाती जलन--ला खालची पट्टी . जणू सूर लहरींच . हा सूर लहरींचा प्रवाह ऐकणाऱ्याला , नायिकेच्या विरहात खेचून नेतो . लताजींनी हि सुरलहरींची आवर्तने दुसऱ्या कडव्यात पण सांभाळी आहेत .
' कहता हैं समय का उजीयारा, एक चन्द्र भी आनेवाला हैं
इन ज्योत की प्यासी अखियन को ,अंखियों से पिलानेवाला हैं
जब पात हवा से बजते हैं, हम चौंक के राहें तकते हैं '
हे दुसरे कडवे अर्थाच्या दृष्टीने मोहक आहे . लताजींनी जीव ओतून गायलंय . प्रियकराची अपरात्री वाट पहाणाऱ्या प्रियसीच्या मनाची अवस्था ---जब पात हवा से बजते हैं, हम चौंक के राहें तकते हैं ' या ओळीत अनुभवता येते . !
या गीताच्या गोडव्याला शंकर -जयकिशन यांनी संगीतबद्ध केलाय . हसरत जैपुरींचे शब्द - लताजींचा स्वर्गीय आवाज - शंकर जयकिशनचे संगीत ,अमरत्वा साठी एखाद्या गाण्यास अजून काय हवे ? असे म्हणतात कि हे गाणे एकट्या शंकरजींनी कंपोज केलाय . या गाण्याची मूळ मेलोडी जपण्यासाठी त्यांनी या गाण्यात मोजक्याच वाद्यांचा वापर केलाय . पखवाज , तबला , वीणा आणि व्हायोलिनचे काही तुकडे , बस ! गाण्याच्या सुरवातीचा पखवाजचा 'तुकडा ' अप्रतिम (एकदम कडक )आहे . या गाण्यास एक मस्त असा प्रवाह आहे . हि गती तबल्यावरला केरवा साकाळू देत नाही .
हे गाणे 'भूप ' (भूपाळी , भूपाली )रागातील आहे . हा एक खूप गोड राग आहे . मुलायम किंवा ज्याला आपण 'सॉफ्ट मेलोडी ' म्हणतो तसा . यमन ,भूप आणि भैरवी हे संगीतातले प्राथमिक (बेसिक )राग आहेत . संगीत शिकताना हे सुरवातीस चांगले घोटून घेतात . भूप रागाची वेळ रात्रीचा प्रथम प्रहर (७ते १० ). हा राग 'भक्ती ' रस प्रधान आहे . यात 'म ' आणि ' नि ' वर्ज , म्हणजे आरोहात आणि अवरोहांत फक्त पाचच स्वर . पण या रागाच्या चलनात खूप वैविध्य असते ,म्हणून या रागावर बरीच गाणी बेतली जातात /जाऊ शकतात .
हे गाणे एक राजदरबारातील नृत्य गीत म्हणून वैजयंतीमाला वर चित्रित केले आहे . वैजयंतीमाला . भरतनाट्यमची प्रख्यात नृत्यांगणा . हिंदी सिनेमातली पहिली फिमेल सुपर स्टार . हेमामालिनीच्या आधीची ड्रीम गर्ल ! वैजयंतीमालाचे अभिनय आणि नृत्य कौशल्य वादातीत आहे . तिने या सिनेमात ' ' आम्रपाली ' जिवंत केलीय ! ती या सिनेमा पुरती 'आम्रपाली ' जगलीय !
या गाण्याचा सुरवातीस आपल्या प्रियकराच्या प्रतीक्षेत असलेल्या 'आम्रपाली ' स दरबारात नृत्य करावे लागते . ' मन एकी कडे आणि तन एकी कडे ' हि मानसिकता आपल्या देहबोलीतून वैजयंतीमालाने अप्रतिम पणे व्यक्त केली आहे . हाफ हार्टटेड नाचासाठी हवी असलेली देहबोली तरी परिपूर्ण नृत्य , हि तारेवरची कसरत वैजयंतीमालाच करू जाणे ! जेव्हा गाण्याच्या शेवटी शेवटी प्रियकर दिसतो ,त्यानंतर आम्रपाली जी 'तन -मन 'झोकून नाचते ,ते पाहिल्यावर आत्तापर्यंतचे नृत्य अपूर्ण होते याची प्रेक्षकांना (आपल्याला )होते ! येथे तिच्या नृत्य आणि मुद्रा-अभिनय कौशल्याला सलाम करावा लागतो !अर्थात यात श्री गोपी किशन यांचे श्रेय नाकारून चालणार नाही . या नृत्याला त्याचा परीसस्पर्श झाला आहे . ते याचे डान्स डायरेक्टर आहेत .
' आम्रपाली ' या सिनेमाची अनेक वैशिष्टे आहेत . वैजयंतीमाला ची नृत्ये , कमी गाणी ,आणि ती सर्व लता मंगेशकरांची सोलो ,चार गाण्यात हि दोन गीतकार , यांचा संदर्भ आलाच आहे . या सिनेमातील भव्य सेट्स हा हि एक प्लस point आहे . आचरेकरांनी देखणे सेट्स या सिनेमासाठी दिलेत . बुद्धकालीन वैशाली त्यांनी साकार केलीय . भव्य सेट्स इतकेच ,किंबहुना काकणभर ज्यास्त यातील युद्ध प्रसंगाचे चित्रीकरण आहे . प्रेक्षक प्रत्यक्ष युद्धभूमी अनुभवतो . इतके ते युद्ध प्रसंग 'जिवंत ' वाटतात ! आणि का वाटू नयेत ?या युद्धासाठी सैन्य म्हणून ज्युनियर आर्टिस्ट नव्हे तर --तर आर्मीचे खरे जवान होते आणि घोडदळ सुद्धा आर्मीचे होते ! लेख टंडन यांनी या साठी आर्मीला विशेष विनंती केली होती . या सिनेमाचे अजून एक वैशिष्टय होते ते ,वेशभूषा . बुद्धकालीन कॉस्ट्यूम अभ्यासण्या साठी या सिनेमाच्या कॉस्ट्यूयम डिझायनर यांनी अंजिठ्यास भेट दिली होती . आम्रपालीची स्पेशल ' स्ट्रीप लेस चोली ' खूप फेमस झाली . आजही आम्रपाली ड्रेस ला मार्केट आहे . या सिनेमाच्या कॉस्ट्यूयम डिझायनर होत्या भानुमती अथैया !
आता काही मराठी गाणी
Copyright © 2025 | Marathisrushti