महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
रायचूर हे कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले महत्त्वाचे शहर आहे. हे शहर कृष्णा आणि तुंगभद्रा या नद्दांच्या मध्ये वसलेले आहे. बंगलोरपासून ४०९ किलोमीटरवर ते वसलेले असून पूर्वी ते निझामाच्या अधिपत्याखाली होते.
February 8, 2017
सोलापूर हे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. हे दक्षिणेतील प्रवेशद्वार आहे.
July 26, 2016
आसाममधील कार्बी अँनलाँग जिल्ह्यातील एक शहर बोकजन. आसाम आणि नागालँडच्या सीमेवर असलेले हे शहर दिमापूरपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून १३८ मीटर उंचीवर वसलेले हे शहर अॅटोनोमस जिल्हा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. १९९३६ इतकी या शहराची लोकसंख्या आहे.
March 10, 2017
जम्मू आणि काश्मीर राज्यातील लेह शहरपासून ५ कि.मी. अंतरावर चंगस्पा येथे प्रसिध्द शांती स्तूप आहे. लडाख शांती स्तूप समितीने पांढर्या दगडापासून सन १९८५ मध्ये भिक्षु ग्योम्यो नाकामुटा यांच्या नेतृत्वात बांधण्यात आलेल्या या स्तुपाची निर्मिती केली.
December 15, 2016
स्लोव्हेनियाचे प्रजासत्ताक (स्लोव्हेन: Republika Slovenija) हा मध्य युरोपामधील एक देश आहे. स्लोव्हेनियाच्या पश्चिमेला इटली, उत्तरेला ऑस्ट्रिया, ईशान्येला हंगेरी तर पूर्व व दक्षिणेला क्रोएशिया हे देश आहेत. नैऋत्येला स्लोव्हेनियाला भूमध्य समुद्राचा लहानसा समुद्रकिनारा लाभला आहे. लियुब्लियाना ही स्लोव्हेनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
March 8, 2019
महाराष्ट्र राज्यातील प्राचीन यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. निरगुडा नदीकाठी वसलेले हे शहर चुन्याच्या व्यापाराचेही प्रमुख ठिकाण आहे.
November 28, 2024
दुबई येथील बुर्ज खलिफा टॉवर हे जगातील सर्वाधिक उंच इमारत म्हणून ओळखले जाते. या टॉवरची उंची ८१८ मीटर एवढीआहे. यापूर्वी तैपई १०१ ही ५०८ मीटर उंचीची इमइरत सर्वाधिक उंच समजली जात होती.
July 29, 2016
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरानजीक असलेली बुटीबोरी औद्योगिक वसाहत ही आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे.
April 9, 2016
सिंधुदूर्ग महाराष्ट्र राज्यातील सागरतटीय जिल्हा आहे, व याचे प्रशासकीय केन्द्र सिंधुदुर्ग नगरी, ओरस येथे आहे. पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किल्ले (३७), जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे.
June 26, 2015
उड्डपी हे दक्षिण -पश्चिम कर्नाटकातील जिल्हा मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे, इथले कृष्ण मंदिर प्रसिध्द असून वैष्णव संत माधवाचार्य यांनी ते स्थापन केले आहे वादळात अडकलेल्या एका व्यापारी जहाजाला सुखरुप किनार्यावर येण्यासाठी माधवाचार्याँ मदत केली होती यामुळे खुश झालेल्या व्यापार्यांनी हे मंदिर बांधण्यास मोठी मदत केली.
उड्डपी शहरात तुलू ही स्थानिक भाषा येथे मोठ्या प्रमाणात बोलली जाते. त्याचबरोबर कोकणी व कन्नड या भाषाही येथे बोलल्या जातात या शहरातील लोकांचे दरडोई उत्पन्न संपूर्ण कर्नाटकात सर्वाधिक आहे.
सिंडिकेट बँक व कॉपोरिशन बँक या बँकांची स्थापना याच शहरात झाली आहे.
March 3, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti