१९५० ते ७० या काळात भारतीय बॅडमिंटनच्या क्षितिजावर एकच नाव तळपत होते, ते म्हणजे.. नंदू नाटेकर त्याकाळी आपल्या शैलीदार खेळाने नाटेकरांनी बॅडमिंटनमध्ये भारताची ओळख निर्माण केली. देशाबाहेरील स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू. राष्ट्रीय स्पर्धात पुरुष दुहेरीत व एकेरीत मिळून १२ वेळा, तर मिश्र दुहेरीत पाच वेळा त्यांनी अजिंक्यपद मिळवले.हल्ली बॅडमिंटनमधील यशामुळे खेळाडूंना अफाट लोकप्रियता मिळू लागली असली तरी नाटेकर हे भारतीय बॅडमिंटनमधले ‘पहिले सुपरस्टार’ होते असेच म्हणावे लागेल .
July 19, 2021
एकनाथ सोलकर याना सर्व ‘ एक्की ‘ या टोपणनावाने हाक मारत. त्यांचे वडील हिंदू जिमखान्यावर माळी म्हणजे ग्राऊंड्समन होते. एकनाथ सोलकर लहान असताना त्या मैदानावर सामना असेल तर स्कॉरबोर्ड कधीकधी सांभाळायचे. त्यांचे बंधू अनंत सोलकर हे फर्स्ट क्लास क्रिकेट आणि रणजी सामने खेळलेले होते.
July 23, 2021
नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी १९६१-६२ मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध आणि वेस्ट इंडिजच्या विरुद्ध भारतीय नेतृत्व केले होते. त्यामध्ये भारताने दोन सामने जिंकले होते आणि बाकीचे तीन सामने बरोबरीत सुटले होते.
September 11, 2021
डकमॅन म्हणून ओळखल्या जाणार्या (ओळीने २४ कसोट्यांमध्ये शून्यावर बाद) डॅनिएल मॉरिसनचा जन्म आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय त्रिक्रमांचा तपशील.
February 3, 2011
सातत्यासाठी आणि खंबीर नेतृत्वासाठी प्रसिद्ध असलेला इंग्लंडचा विद्यमान कर्णधार.
March 3, 2011
दिलीप सरदेसाई यांनी विदेशी मैदानावर म्हणजे १८ ते २३ फेब्रुवारी १९७१ साली किंग्स्टन मैदानावर वेस्टइंडिनजवरुद्ध पहिल्या इनिंग २१२ धावा केल्या. आणि त्यांनी एक वेगळा रेकॉर्ड केला तो म्हणजे परदेशी भूमीवर पहिले द्विशतक केले.अर्थात तो सामना अनिर्णित राहिला.
July 24, 2021
मार्टिन क्रो हे न्यूझीलंडचे कप्तान असताना त्यांनी १६ कसोटी सामन्यांपैकी २ सामने जिंकले परंतु एकदिवसीय सामन्यांमध्ये ते कप्तान म्हणून जास्त यशस्वी झाले त्यांनी ४४ सामन्यांपैकी २१ सामने जिंकले.
August 28, 2021
रुसी मोदी यांनी ‘ सम इंडियन क्रिकेटर्स ‘ हे पुस्तक लिहिले असून त्यात भारताच्या २३ महत्वाच्या क्रिकेटपटूंवर लिहिले आहे त्याला सर डॉन बर्डमन यांनी ‘ प्रस्तावना ‘ लिहिली असून त्याचा मराठीत अनुवाद बाळ. ज. पंडित यांनी केला असून हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे.
December 3, 2021
भाऊसाहेब निबाळकर यांनी ८० फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये ४८४१ धावा ४७.९३ या सरासरीने केल्या होत्या त्यामध्ये त्यांची १२ शतके आणि २२ अर्ध शतके होती . त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद ४४३ धाव.
December 15, 2021
माधव आपटे सरांच्या शब्दात सांगायचे झाले तर , ‘ क्रिकेट हा अत्यंत क्रूर खेळ ‘ आहे असेच म्हणता येईल . कोणत्या क्षणी काय होईल ते सांगता येणार नाही , तसाच काहीसा प्रकार जयंतीभाई ह्यांच्या बाबतीत घडला होता.
September 2, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti