समर्थावर सन्त एकनाथाच्या वाग्मयाचा प्रभाव असल्याने प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.
January 22, 2022
फाऊंड्रीमध्ये धातुंचे ओतकाम करताना ज्याप्रमाणे प्रथम पॅटर्न तयार करुन नंतर साचा करतात व त्यातून हजारो नग बनवतात. त्याप्रमाणे जे छापायचे त्याच्या प्रतिमेसाठी माध्यम तयार करुन त्याला छपाई यंत्रावर लावून हजारो प्रती छापता येतात.इतिहासजमा झालेल्या रिलीफ छपाई पद्धतीतील लेटर प्रेसवर चित्रे आणि छायाचित्रांसाठी ब्लॉक्स आणि मजकूरासाठी खिळे वापरत.
May 23, 2023
६ मार्च १९७१ रोजी सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण करून आपली कसोटी कारकीर्द सुरू केली होती. त्या वेळी ते भारतीय संघात एक सर्वात लहान वयाचे खेळाडू होते. ज्याने आंतरशालेय, विद्यापीठ, रणजी अशा विविध स्तरांवरील क्रिकेट सामन्यांमध्ये धावांचे डोंगर रचले होते-त्या वेळी गावसकर विंडिजच्या तोफखान्यासारख्या भासणार्याा, अक्षरश: आग ओकणार्यार गोलंदाजांसमोर खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करत असताना या मालिकेतील त्या खेळाडूचा खेळ क्रिकेट रसिकांना थक्क करून सोडणारा होता. संपूर्ण मालिकेत १ द्विशतक आणि ३ शतके यांच्या साहाय्याने १५४.८० च्या सरासरीने एकूण ७७४ धावांचा पर्वत या खेळाडूने रचला.
March 6, 2022
पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर विद्यापीठाचे मुख्य शैक्षणिक संकुल आहे. ४११ एकरांच्या या संकुलामधून विविध पदव्युत्तर विभाग आणि प्रशासकीय कार्यालयांचे कामकाज चालते. विद्यापीठाच्या मुख्य शैक्षणिक संकुलामधील मुख्य इमारत ही समस्त पुणेकरांसाठी शैक्षणिक अस्मितेचे प्रतीक ठरते.
February 10, 2022
१०० पैकी ८०% लोकांना हा खाऊ म्हणजे जीव की प्राण असतो. आज अशा चॉकलेटची आठवण काढण्याचे खास कारण आहे. आज दिनांक २८ जुलै ! आजचा दिवस राष्ट्रीय दुग्धयुक्त चॉकलेट ( National Milk Chocolate Day ) दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस United Kingdom (UK) मध्ये साजरा केला जातो.
July 28, 2020
युरोपियन साहेबाने,’या एतद्देशीय भारतीय काळ्या लोकांना हे सर्कस काढणे, खेळ करणे कधीच शक्य होणार नाही!!’ असे उद्गार काढले!. हे ऐकताच विष्णुपंत छत्र्यांमधील अस्सल भारतीय जागा झाला. कुरुंदवाडच्या संस्थानिकांनी त्याला प्रोत्साहन दिले आणि त्यातूनच भारतीय सर्कसचा पाया रचला जाऊ लागला.
October 5, 2021
राष्ट्रीय युद्ध स्मारकाची निर्मिती करण्याबाबत १९६८ मध्ये चर्चा झाली होती. मात्र, प्रत्यक्षात २०१५ मध्ये या स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात झाली.राष्ट्रीय युद्ध स्मारकात चार वर्तुळ असून, त्यांना ‘अमर चक्र’ ‘वीरता चक्र’ ‘त्याग चक्र’ आणि ‘रक्षक चक्र’ अशी नावे देण्यात आली आहेत.
February 27, 2024
आंतरराष्ट्रीय श्रम संगठन (आयएलओ)नुसार जगभरात २१ कोटीपेक्षा जास्त मुलांकडून बालमजुरी करून घेतल्या जाते. संपूर्ण जगातून ७१पेक्षा जास्त देशांत बालमजूरी होते. विकासशील देशांत बालमजूरीचे प्रमाण सर्वात जास्त आहे. जागतिक पातळीवर विचार केल्यास भारतात बालकामगारांची संख्या खूप अधिक आहे.
June 12, 2021
जगातील कोणत्याही दोन हसणार्याम व्यक्तींमध्ये सहज मैत्री होऊ शकते. मग त्या व्यक्ती कोणत्याही देशाच्या, भाषेच्या, जातीच्या, धर्माच्या, वयाच्या का असेना. हास्य हे जगातील सर्वांशी मैत्री करून देणारे प्रभावी साधन आहे असेही आपण म्हणू शकतो. नेहमी हसा, हसत राहा आणि सर्वांना हसवत राहा……!!!!
May 10, 2022
कडाऊन करण्याची तीन प्रमुख कारणे होती. पहिले उद्दिष्ट म्हणजे, विषाणूची साखळी तोडणे. साखळी तोडली, तर विषाणूचे पेशीविभाजन रोखले जाईल. दुसरे म्हणजे, बाधित व्यक्तिंमध्ये वाढ झाली, तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तयारी करायला आरोग्य यंत्रणेला अवधी मिळेल आणि तिसरे उद्दिष्ट म्हणजे, मानवी वर्तणुकीवर काम करणे. याचा अर्थ पुरुष, स्त्रिया आणि मुलांना हात धुणे, मास्क घालणे आणि सुरक्षित वावराचे नियम पाळण्याची सवय लावणे.
March 24, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti